अनिल कुंबळे माहिती मराठी, Anil Kumble Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अनिल कुंबळे यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Anil Kumble information in Marathi). अनिल कुंबळे यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी अनिल कुंबळे यांच्यावर मराठीत माहिती (Anil Kumble biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

अनिल कुंबळे माहिती मराठी, Anil Kumble Information in Marathi

अनिल कुंबळे हे एक भारतीय क्रिकेट प्रशिक्षक, कर्णधार, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आहेत. त्यांनी भारतीय संघासाठी जवळपास १८ वर्षे क्रिकेट खेळले.

परिचय

अनिल कुंबळे यांनी अनेक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान गोलंदाज म्हणून अनिल कुंबळे यांना ओळखले जाते.

Anil Kumble Information in Marathi

अनिल कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ६१९ बाली मिळवले आहेत आणि हा आतापर्यंतच्या क्रिकेटच्या खेळात सर्वाधिक बाली मिळवण्याच्या यादीत अनिल कुंबळे यांचा तिसरा क्रमांक आहे. १९९९ साली पाकिस्तान विरुद्ध खेळताना अनिल कुंबळे यांनी पाकिस्तानचे सर्वच्या सर्व दहा फलंदाज बाद केले होते. अनिल कुंबळे यांना लोक जंबो या टोपण नावाने ओळखतात.

वैयक्तिक जीवन

अनिल कुंबळे यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७० रोजी बंगलोर येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव कृष्णा स्वामी आणि आईचे नाव सरोजा होते. अनिल कुंबळे यांना दिनेश कुंबळे नावाचा एक भाऊ सुद्धा आहे. अनिल कुंबळे यांनी चेतना कुंबळेशी लग्न केले आहेत आणि त्यांना तीन मुले आहेत.

अनिल कुंबळे यांनी आपले प्राथमिक शिक्षण होली सेंट इंग्लिश स्कूल येथून पूर्ण केले आणि हायस्कूल नॅशनल हायस्कूल बसवणगुडी येथून केले. त्यांनी नॅशनल कॉलेज बसवणगुडी येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. अनिल कुंबळे यांनी आपले अभियांत्रिकी पदवी शिक्षण राष्ट्रीय विद्यालय कॉलेज येथून पूर्ण केले.

करिअर

अनिल कुंबळे यांनी कर्नाटक संघाकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

डोमेस्टिक करिअर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

अनिल कुंबळे यांनी कर्नाटक संघाकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्यांनी हैदराबाद विरुद्ध ओपनिंग ची जोडीची विकेट घेऊन एकूण ४ गडी बाद केले. त्यांच्या याचा कामगिरीच्या जोरावर त्यांना पाकिस्तान अंडर १९ च्या संघात निवडण्यात आले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांनी श्रीलंका विरुद्ध येथे शारजा खेळताना पदार्पण केले. त्याच वर्षी इंग्लंड दौर्‍यावर तीन टेस्ट सामन्यांच्या मालीकेसाठी त्याची आवड करण्यात आली. मॅनचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या त्या कसोटीत पहिल्या डावात त्याने १०५ धाव देत एकूण ३ गडी बाद केले ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला.त्याच वर्षी भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर त्याने दुसऱ्या कसोटीत आठ विकेट्स घेऊन आपली जागा सुनिश्चित केली. त्याने स्वत:ला एक उत्तम फिरकीपटू म्हणून स्थापित केले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १८ विकेट्स घेतल्या.

कुंबळेने पहिल्या १० सामन्यात पहिले ५० कसोटी बळी घेतले जो त्यावेळी एक विक्रम होता. २७ नोव्हेंबर १९९३ रोजी ईडन गार्डनवर वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना फक्त १२ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. जानेवारी १994 मध्ये जेव्हा श्रीलंकेने भारत दौरा केला तेव्हा कुंबळेने आपल्या कारकिर्दीच्या १४ व्या सामन्यात पहिले दहा गडी बाद केले आणि श्रीलंकेचा एक डाव आणि ११ धावांनी पराभव केला.

१९९६ चा विश्वचषक

१९९६ चे वर्ष हे अनिल कुंबळेसाठी अत्यंत यशस्वी ठरले. या वर्षी त्याने एकूण ६१ विकेट्स घेतल्या. १९९६ सालच्या सर्व गोलंदाजांमध्ये तो ९० विकेट्स घेऊन प्रथम क्रमांकावर होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी कुंबळेची भारतीय संघात निवड करण्यात आली. भारताने त्या विश्वचषकात खेळलेल्या सातही सामन्यांमध्ये कुंबळे खेळला. कुंबळेने या सात सामन्यात १५ विकेट घेऊन या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. केनिया विरुद्ध चषकातील आपला पहिला सामना खेळताना कुंबळेने २ धावा देऊन तीन बळी घेतले. त्यामुळे हा सामना भारताने सात गडी राखून आरामात जिंकला होता.

उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताची लढत पाकिस्तानविरुद्ध होती. या सामन्यात कुंबळेने ४८ धावांत ३ महत्वाचे गडी बाद केले आणि भारताला हा सामना जिंकून दिला.

कारकिर्दीतील महत्वाचे टप्पे

ऑक्टोबर १९९६ मध्ये भारत अडचणीत असताना अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टायटन चषकात ५२ धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.

फेब्रुवारी १९९७ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना पाच कसोटी आणि चार एकदिवसीय मालिकेच्या संघात सुद्धा कुंबळेचा समावेश होता. त्याने एकूण १९ बळी मिळवले.

एकाच डावात १० बळी मिळवणारा कुंबळे हा जिम लकेर च्या नंतर दुसरा खेळाडू आहे. असा पराक्रम अजून कोणीही करू शकला नाही.

ऑक्टोबर २००४ मध्ये शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यानंतर आणि कपिल देव यांच्यानंतर दुसरा भारतीय गोलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी मिळविणारा कुंबळे स्पिनर ठरला.

२००६ मध्ये शेन वॉर्ननंतर २००० धावा करणारा आणि ५०० कसोटी बळी मिळविणारा अनिल कुंबळे दुसरा खेळाडू ठरला.

सर्वात जास्त लेग बिफोर विकेट बळी घेण्याचा जागतिक विक्रमही कुंबळेच्या नावावर आहे.

मार्च २००६ मध्ये इंग्लंडच्या भारत दौर्‍याच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याने स्टीव्ह हार्मिसनला बाद करून आपला ५०० वा कसोटी बळी मिळवला. ५०० बळी मिळवणारा कुंबळे हा पहिला भारतीय आणि पाचवा आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहे.

आपल्या कारकीर्दीत एका डावात सर्व दहा बळी मिळवताना कसोटी शतक झळकाविणारा कुंबळे हा एकमेव कसोटी क्रिकेटपटू आहे.

कुंबळेने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत ४०८५० चेंडूची गोलंदाजी केली आहे, जे मुरलीधरनच्या ४४०३९ चेंडूनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

जानेवारी २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळे आपला ६०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय गोलंदाज आणि जगातील तिसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अनिल कुंबळेने २००८ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट , प्रथम श्रेणी क्रिकेट व सेवानिवृत्तीची घोषणा केली. त्याने आपला शेवटचा सामना नवी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळला.

आयपीएल करिअर

आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्तीनंतर कुंबळे इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून २००८ सालापासून खेळू लागला. त्याने २००९ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना एका षटकांत पाच गडी बाद केले होते. २००९ मध्ये त्याच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव करत डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या फायनलच्या सामन्यात स्थान मिळवले.

२०१० मध्ये अनिल कुंबळे च्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश धडक मारली होती. पण रॉयल चॅलेंजर्सचा त्या उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता. कुंबळेने जानेवारी २०११ रोजी इंडियन प्रीमियर लीगमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला आरसीबीने संघाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून नेमले. सध्या अनिल कुंबळे पंजाब किंग्जच्या संघाचा संचालक आहे.

अनिल कुंबळेची गोलंदाजीची शैली

अनिल कुंबळे हा एक उजव्या हाताने गोलंदाजी करणारा लेग स्पिनर आहे. रिचर्ड हॅडली, शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यासह कुंबळे हा असा गोलंदाज आहे ज्याने पैकी एका कसोटी डावात ३० पॆक्षा जास्त वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.

क्रिकेट संघटनांमध्ये सहभाग

२१ नोव्हेंबर २०१० रोजी, अनिल कुंबळे यांची कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

१२ ऑक्टोबर २०१२ रोजी कुंबळे यांची आयसीसी क्रिकेट समितीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर कुंबळेला आणखी तीन वर्षे आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आले.
कोचिंग करिअर

२४ जून २०१६ पासून बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेला एक वर्षासाठी नियुक्त केले होते, परंतु कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आपला राजीनामा दिला होता.

प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाने अनिल कुंबळेची यांच्या मार्गदर्शनांतर्गत पहिली मालिका वेस्ट इंडीज विरुद्ध जुलैमध्ये खेळली जिथे भारताने चार कसोटी सामने खेळताना २-० असा वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यांनतर भारताने इंग्लंडला सुद्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० असे पराभूत केले.

मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या दरम्यान खेळताना भारताने पहिला सामना हरले असताना शेवटच्या तीन कसोटींपैकी दोन कसोटींमध्ये विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली होती.

नावावर असलेले रेकॉर्डस्

  • कसोटी सामन्याच्या एकाच डावात १० बळी मिळवण्याचा विक्रम
  • कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू
  • सर्वाधिक भारतीय वन डे विकेट्स ३३७
  • एकाच वर्षात १९९६ मध्ये सर्वात जास्त विकेट्स मिळवनारा भारतीय गोलंदाज, ६१ विकेट्स
  • एका विशिष्ट मैदानावर सर्वाधिक वन डे विकेट घेण्याचा विक्रम, शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये ५६ बळी
  • संपूर्ण कसोटी कारकीर्दीत ४०८५० चेंडूची गोलंदाजी करण्याचा विक्रम

मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • १९९५ मध्ये अर्जुन पुरस्कार
  • १९९६ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर चा पुरस्कार
  • २००५ मध्ये पद्मश्री, भारत सरकारचा नागरी पुरस्कार
  • २००९ मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार ५ धाव देऊन ५ बळी मिळवल्याबद्दल
  • २०१५ मध्येआयसीसी हॉल ऑफ फेम क्रिकेट क्रीडा पुरस्कार
  • बेंगळुरूच्या एमजी रोडमधील एका मोक्याच्या रस्त्याला अनिल कुंबळे यांचे नाव आहे.

अनिल कुंबळे हा भारताकडून खेळलेला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. कसोटी सामन्यात त्याने ३५ वेळा ५ आणि त्यापेक्षा जास्त बळी मिळवले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने दोन वेळा पाच गडी बाद केले आहेत.

तर हा होता अनिल कुंबळे यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास अनिल कुंबळे यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Anil Kumble information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment