भुवनेश्वर कुमार माहिती मराठी, Bhuvneshwar Kumar Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भुवनेश्वर कुमार यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Bhuvneshwar Kumar information in Marathi). भुवनेश्वर कुमार यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी भुवनेश्वर कुमार यांच्यावर मराठीत माहिती (Bhuvneshwar Kumar biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

भुवनेश्वर कुमार माहिती मराठी, Bhuvneshwar Kumar Information in Marathi

भुवनेश्वर कुमार सिंग हा एक आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो गोलंदाजी, फलंदाजी असा एक उत्कृष्ठ ऑलराउंडर आहे. आपल्या भारतीय संघाव्यतिरिक्त तो उत्तर प्रदेश क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून खेळतो.

[table id=7 /]

परिचय

भुवनेश्वर कुमार हा उजव्या हाताने गोलंदाजी करताना चेंडू अत्यंत चांगल्या पद्दतीने आत आणि बाहेर स्विंग करू शकतो. तो एक जलद मध्यम गोलंदाज आहे आणि गरज पडल्यास आपल्या फलंदाजीद्वारे सुद्धा योगदान देऊ शकतो. त्याने अनेक वेळा आपली फलंदाजी दाखवून दिली आहे.

Bhuvneshwar Kumar Information in Marathi

डिसेंबर २०१२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण सामन्यात त्याने तीन गडी बाद केले आणि त्यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत त्याने पदार्पण केले. फेब्रुवारी २०१८ मध्ये खेळताना आपल्या टी -२० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द पाच विकेट्स घेतल्यानंतर भुवनेश्वर कुमार हा खेळाच्या सर्व प्रकारात जसे कि कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये पाच विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

वैयक्तिक जीवन

भुवनेश्वर कुमारचा जन्म हा मेरठमध्ये 5 फेब्रुवारी १९९० मध्ये झाला. त्याची बहीण रेखा अधाना तिने त्याला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित केले आणि भुवनेश्वर कुमार फक्त १३ वर्षाचा असताना त्याला क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये नेले.

भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे नाव किरण पाल सिंह आहे तर आईचे नाव इंद्रेश सिंह आहे. त्याचे वडील सब इन्स्पेक्टर आणि आई गृहिणी आहे. भुवनेश्वर कुमारने आपली लहानपणाची मैत्रीण नुपूर हिच्यासोबत २३ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न केले आहे, त्याची पत्नी व्यवसायाने इंजिनियर आहे.  

डोमेस्टिक करिअर

भुवनेश्वर कुमार हा डोमेस्टिक क्रिकेट उत्तर प्रदेश संघाकडून खेळतो. तो दुलिप चषकासाठी मध्य विभागाकडून सुद्धा खेळला आहे. भुवनेश्वर कुमारने वयाच्या १७ व्या वर्षी बंगाल विरुद्ध खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

उत्तर विभागाविरुद्धच्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात खेळताना भुवनेश्वर कुमारने फक्त ३ च्या सरासरीने धावा देत १ गडी सुद्धा बाद केला होता. या सामन्यात अंतिम फळीतील फलंदाज असताना सुद्धा त्याने आपल्या ४ साथीदारांसोबत भागीदारी करत ३१२ चेंडूत १२८ धावा केल्या होत्या. त्याच्या त्या सामन्यात आपल्या बाकी सहकाऱ्यांपेक्षा सर्वोच्च धावा होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. २००८-०९  मध्ये रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद केले होते.

आंतरराष्ट्रीय करिअर

परविंदर अवानाच्या इंग्लंड विरुद्धच्या खराब कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमारला पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी-२० सामन्यात संधी देण्यात आली. हा सामना बंगलोर येथे खेळवला गेला. भुवनेश्वर कुमारने त्या सामन्यात फक्त २.२ च्या सरासरीने ४ षटकांत फक्त ९ धावा देऊन पाकिस्तानचे ३ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारने नासिर जमशेद , अहमद शहजाद आणि उमर अकमल यांना तंबूचा रास्ता दाखवला.

त्याने त्याच्या एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजला बाद करत आपला पहिला बळी मिळवला होता. अशाप्रकारे भुवनेश्वर कुमारची कामगिरी हळू हळू बहरत गेली आणि भारताला विजय मिळत गेले. 

कसोटी पदार्पण

भुवनेश्वर कुमारने आपले कसोटी पदार्पण २०१३ मध्ये बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेत २०१३ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यात ६ बळी घेतले होते. या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ व्या विकेटसाठी त्याने एमएस धोनीबरोबर विक्रमी भागीदारी सुद्धा केली होती. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने ३८ धावा बनवल्या होत्या.

कुमारने २२ फेब्रुवारी २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या पहिल्या डावात त्याला कोणतीही विकेट मिळाली नाही. नंतर, भारताच्या फलंदाजी दरम्यान त्याने त्याच कसोटीत एमएस धोनीबरोबर ९ व्या विकेटसाठी १४० धावांची मोठी भागीदारी केली. याच भागीदारीमुळे भारताला १९२ धावांची आघाडी मिळाली.

या भागीदारीदरम्यान त्याने अनेक विक्रम केले आणि मोडले. जेव्हा तो ९७ चेंडू मध्ये ३८ धावा काढून बाद झाला तेव्हा पूर्ण मैदानातील लोकांनी त्याला औभे राहून मानवंदना दिली होती. जेव्हा दुसर्‍या डावात भारत मैदानात उतरला तेव्हा त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे त्याचा पहिला सामना कोणताही बळी न मिळवता गेला.

दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, एड कोवान आणि शेन वॉटसनला बाद करत आपले विकेट्सचे खाते खोलले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने महत्त्वपूर्ण ६  विकेट घेतल्या.

चॅम्पियन्स चषक आणि तिरंगी मालिका

कुमार २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्‍या भारतीय संघाचा सुद्धा भाग होता. आयसीसी आणि क्रिकइन्फोने त्याला ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ चा पुरस्कार दिला होता.

९ जुलै २०१३ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेत त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने फक्त ८ धावा देत ४ बळी मिळवले होते. ज्यामुले भारत विजयी झाला. सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे या स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरिज चा पुरस्कार देण्यात आला.

महत्वाचे टप्पे

२०१५ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमार फिट नसल्यामुळे खेळू शकला नाही.

२०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून दिली. त्याचा आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंट मध्ये समावेश केला गेला. क्रिकइन्फो या वेबसाइटने त्याची सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय टीममध्ये सुद्धा निवड केली होती.

जानेवारी २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ४ बळी मिळवत आणि ३० , ३३ धाव करत सामनावीराचा किताब पटकावला होता.

१८ फेब्रुवारी २०१८ मध्ये भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाला २८ धावांनी विजय मिळवून दिला. २४ धावा देऊन ५ बळी हि त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली. टी-२० मध्ये ५ विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज सुद्धा बनला.

२४ फेब्रुवारी २०१८ मध्ये कुमारने तिसरा सामना खेळताना २ बळी मिळवले आणि दक्षिण आफ्रिकेवर तीन सामन्यांच्या मालिकेत १-२ असा आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने आपला एकदिवसीय सामन्यांमधील १०० वा बळी घेतला.

इंडियन प्रीमियर लीग करिअर

२००८-०९ रणजी चषक मधील आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघाने आपल्या संघात घेतले.

२०११ मध्ये त्याला पुणे वॉरियर्स इंडिया संघाने घेतले. पुणे वॉरियर्स इंडिया संघ बंद झाल्यानंतर २०१४ मध्ये त्याला  सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात घेतले.

त्याच्या २०१४, २०१६, २०१७ मधील चांगल्या कामगिरीबद्दल क्रिकइन्फोने आयपीएल अंतिम इलेव्हन संघामध्ये त्याला सामील करून घेतले.

२०१६ मध्ये त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २०१६ चे आयपीएल जेतेपद जिंकले. या हंगामात त्याने मोलाचे योगदान दिले होते. त्या हंगामात त्याने सर्वात जास्त २३ बळी मिळवले होते आणि पर्पल कॅप सुद्धा जिंकली होती. २०१७ इंडियन प्रीमियर लीगमध्ये कुमारने सलग दुसऱ्या वर्षी २६ बळी मिळवित पर्पल कॅप सुद्धा जिंकली.

आयपीएलच्या १० वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त त्याला क्रिकइन्फो अष्टपैलू आयपीएल इलेव्हनमध्येही नाव देण्यात आले.

२०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबादने कुमार ह्यांना २०१८ च्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित केले. सनरायझर्स हैदराबादच्या संघाला फायनल पर्यंत अंतिम सामन्यात धडक मारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

तर हा होता भुवनेश्वर कुमार यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास भुवनेश्वर कुमार यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Bhuvneshwar Kumar information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment