बिरबलाची मस्करी मराठी गोष्ट, Birbalachi Maskari Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे, मजेत ना. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बिरबलाची मस्करी मराठी गोष्ट (Birbalachi maskari story in Marathi). बिरबलाची मस्करी हि मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी बिरबलाची मस्करी मराठी गोष्ट (Birbalachi maskari story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

बिरबलाची मस्करी मराठी गोष्ट, Birbalachi Maskari Story in Marathi

अकबर बिरबल मराठी गोष्टी: बुद्धिमत्ता, हुशारी आणि सर्वात चतुर असा कोण होऊन गेला असा आपण विचार केला तर कोणाच्या सुद्धा मनात येते ते नाव म्हणजे बिरबल. सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी बिरबल हा सर्वात मौल्यवान रत्न मानला जात असे.

परिचय

जर तुम्हाला स्वतः मानसिकदृष्ट्या आणि बुद्धीने हुशार व्हायचे असेल तर प्रत्येक आलेली अडचण हि कशी सोडवता येते हे शिकण्यासाठी अकबर बिरबलच्या कथांपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. आमच्या कथांच्या या भागात आम्ही काही निवडक अकबर-बिरबलाच्या मराठी गोष्टी दिल्या आहेत, त्या कथा वाचा, ज्यामुळे तुम्हाला त्याचा योग्य फायदा मिळेल.

बिरबलाची मस्करी मराठी गोष्ट

एकदा अकबराने बिरबलाची मस्करी करायचे ठरवले. सम्राट अकबर कोर्टात आपले स्वप्न सांगत होता. अकबर आणि बिरबल अंधाऱ्या रात्री चालत असताना या स्वप्नाची सुरुवात झाली. एवढा अंधार होता कि ते एकमेकांना पाहू शकले नाहीत आणि ते एका खड्ड्यात पडले.

Birbalachi Maskari Story in Marathi

सम्राटअकबर म्हणाला, “सुदैवाने मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि बिरबल गटाराच्या खड्ड्यात पडला. हे ऐकताच सर्व दरबार हसू लागला. सर्वांना वाटले कि अकबराने बिरबलाची चांगलीच मस्करी केली.

पण तेवढ्यातच बिरबल म्हणाला महाराज, आश्चर्यकारकपणे, मलाही तेच स्वप्न पडले होते, परंतु हे स्वप्न अर्धे होते. जेव्हा आपण त्या खड्यामधून बाहेर आलो तेव्हा दोघेही भरून गेलो होतो आणि बाहेर कुठेच पाणी नव्हते. मग आपण एकमेकांना साफ करण्यासाठी मी तुम्हाला चाटू लागलो आणि तुम्ही मला. अशाप्रकारे मी मध खाली तर तुम्ही काय ते मी सांगूही शकत नाही.

हे ऐकताच सम्राट अकबर लज्जास्पद झाला आणि त्याने पुन्हा कधीही बिरबलाची मस्करी न करण्याचा विचार केला.

तात्पर्य

आपल्यापेक्षा हुशार असलेल्या व्यक्तीची कधीही मस्करी करू नये.

तर हि होती बिरबलाची मस्करी मराठी गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला बिरबलाची मस्करी मराठी गोष्ट (Birbalachi maskari story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment