बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती, Buddha Purnima Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बुद्ध पौर्णिमा वर मराठी निबंध (Buddha Purnima information in Marathi). बुद्ध पौर्णिमा वर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी बुद्ध पौर्णिमा वर मराठी निबंध (Buddha Purnima essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती, Buddha Purnima Information in Marathi

आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. ज्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे मुख्य धर्म आहेत. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे सण असतात. हिंदू मध्ये दीपावली, मुस्लिम मध्ये बकरी ईद, तसेच बौद्ध धर्माचा मुख्य सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा बौद्ध धर्मातील गौतम बुद्धांचा जन्म दिवस म्हणून साजरा केली जाते.

परिचय

बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धम्माचा प्रमुख उत्सव आहे. बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री लोक हा सण साजरा करतात. बौद्ध धर्मात याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. हा सण बौद्ध धर्माचे सौंदर्य वाढवतो. या कारणामुळे बौद्ध धर्माचे लोक हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात.

बुद्ध पौर्णिमेचा इतिहास

वैशाख महिन्यात लुंबिनी नावाच्या ठिकाणी शुद्धोधन आणि मायावती यांच्या घरी सिद्धार्थ यांचा जन्म झाला होता. हेच सिद्धार्थ मोठे होऊन यांना गौतम बुद्ध किंवा महात्मा बुद्ध लोक म्हणायला लागले. गौतम बुद्ध यांच्या जन्माच्या सात दिवसांनंतर त्यांची आई मायादेवी यांचा मृत्यू झाला होता. आपल्या आईच्या मृत्यूनंतर गौतम बुद्ध यांचा सांभाळ त्यांची सावत्र आई तिने केला होता.

Buddha Purnima Information in Marathi

आपल्या वयाच्या १९ व्या वर्षात गौतम बुद्ध यांनी आपल्या घराचा त्याग केला आणि भक्ती करण्यासाठी ते घरातून निघून गेले. लगातार सात वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केल्यानंतर गौतम बुद्ध यांना त्यांच्या ३५ व्या जन्मदिवशी वैशाख महिन्यामध्ये त्यांना एका पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपला उपदेश त्यांनी सारनाथ येथे दिला होता.

गौतम बुद्ध यांचे निधन वयाच्या ऐंशीव्या वर्षी विषारी अन्नाचे सेवन केल्यामुळे झाले. गौतम बुद्धांनी आयुष्यभर केलेल्या आपल्या कार्यामुळे ते बौद्ध पौर्णिमा हा सण दिवस धर्माच्या लोकांसाठी खूप विशेष आहे

हा उत्सव साजरा करण्याची परंपरा

बुद्ध पौर्णिमा ही एक अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेची सुरुवात सकाळी प्रार्थना करून होते. त्याच्या नंतर सर्व लोक दिवे लावतात आणि बुद्धांच्या फोटोला फुले वाहिली जातात. तसेच पिंपळाच्या झाडाचे पूजन केले जाते. पिंपळाच्या झाडाच्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हटले जाते. अशाप्रकारे जमलेले सर्व लोक एकेक करून गौतम बुद्धांची पूजा करतात आणि उत्साहात सहभागी होतात.

या दिवशी लोक गौतम बुद्धांच्या मंदिरांमध्ये पूजापाठ करतात तसेच झेंडा सुद्धा फडकवतात. या दिवशी गौतम बुद्धांच्या सर्व मंदिरांना एकदम रंगीबेरंगी रोषणाईने सजवलेले असते. भारत देशांमध्ये बौद्ध जयंती हा उत्सव प्रामुख्याने बिहार राज्यात खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या राज्यांमध्ये गौतम बुद्धांची भव्य मंदिर आहेत.

इतर देशात साजरी होणारी बौद्ध पौर्णिमा

बौद्ध धर्माचे लोक दरवर्षी हा उत्सव साजरा करतात. बौद्ध धर्माचे लोक जिथे जिथे राहतात तिथे तिथे बौद्ध जयंती साजरी करतात. नेपाळ, बांगलादेश, थायलंड, श्रीलंका यादेशात सुद्धा बौद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्धांच्या जन्माच्या दिवसाच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. भारताप्रमाणेच तैवान सरकारने सुद्धा बौद्ध जयंती दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. हा उत्सव आशियातील बऱ्याच देशांमध्ये साजरा केला जातो आणि हा सण बौद्ध धर्माचा सर्वात पवित्र सण आहे.

बुद्ध जयंती या दिवशी होणारे विधी आणि उत्सव

जरी बुद्ध पौर्णिमा संपूर्ण भारतात साजरी केली असली तरी त्याचे मुख्य ठिकाण आहे बिहार. बिहार येथे गौतम बुद्धांचे खूप मोठे मंदिर आहे. हे ठिकाण गौतम बुद्धांसाठी प्रसिद्ध आहे. ज्या प्रकारे हिंदू लोक आपल्या स्वतःच्या उत्सवाच्या वेळी दिवे लावून आपला उत्सव साजरा करतात, त्याच प्रकारे बौद्ध धर्माचे लोकही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिवे लावून गौतम बुद्धाची जन्म तिथी साजरी करतात. या दिवशी बौद्ध धर्माचे लोक दूरवरून येतात आणि एकमेकांना भेटतात.

गौतम बुद्धांचे अनुयायी दोन प्रकारचे असतात एक म्हणजे संन्यासी लोक जी भिक्षा मागून आपले जीवन जगतात आणि दुसरे म्हणजे गृहवस्तीचे लोक आपले पारिवारिक जीवन जगत असतात, अशा लोकांना उपासक असे म्हणतात. या दिवशी संन्यासी आणि उपासक दोन्ही प्रकारचे अनुयायी गौतम बुद्धांची पौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र येतात.

या दिवशी बौद्ध धर्माचे लोक गौतम बुद्धांची गाणी गातात, प्रार्थना म्हणतात. ज्या लोकांना गौतम बुद्धा बद्दल खूप माहिती आहे ते प्रवचन भाषण येतात देऊन आपले विचार व्यक्त करतात. तसेच काही लोक छोटेसे मेळावे आयोजित करतात.

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी सर्व लोक पांढरे कपडे घालतात आणि पिंपळाच्या झाडाला फुले वाहतात, दिवे वाहिले जातात. पिंपळाच्या झाडा समोर मेणबत्त्या लावल्या जातात. पिंपळाच्या झाडा समोर मेणबत्त्या लावण्याचे कारण म्हणजे याच पिंपळाच्या झाडासमोर गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते.

या दिवशी सर्व जण एकमेकांच्या घरांमध्ये जातात, एकमेकांना त्यांनी बनवलेले गोड जेवण भरवतात. विशेष म्हणजे या दिवशी खीर बनवली जाते.

गौतम बुद्धांची जयंती निमित्त हा दिवस सर्वात पवित्र मानतात, हा दिवस साजरा केल्यानंतर सर्व लोक आनंदाने आपापल्या घरी जातात अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो.

गौतम बुद्धांची शिकवण

गौतम बुद्ध यांनी आपल्या उपदेशात चार सत्य गोष्टी सांगितले आहेत, ज्या चार गोष्टींवर बौद्ध धर्माचा पाया रचलेला आहे.

बौद्ध धर्माचे तीन रत्न

  1. बुद्ध
  2. धम्म
  3. संघ

चार परम सत्य

  1. पहिले परम सत्य मानवाचे दुःख आहे
  2. दुसरे परम सत्य दुःखाचे कारण आहे
  3. तिसरे परम सत्य दुःखाचे निदान आहे
  4. चौथे परम सत्य दुःख हे निदानाचे साधन आहे

आठ पथ

  1. सम्यक दृष्टी
  2. सम्यक संकल्प
  3. सम्यक वाणी
  4. सम्यक कर्मांत
  5. सम्यक आजीव
  6. सम्यक व्यायाम
  7. सम्यक स्मृती
  8. सम्यक समाधी

बुद्ध धर्माचे दहा शील

  1. आयुष्यामध्ये कधी कोणाची हत्या करू नका
  2. आयुष्यामध्ये कधीच चोरी करू नका
  3. अनावश्यक पैसे जवळ ठेवू नका
  4. जीवनामध्ये कोणतीही नशा करू नका
  5. नाच-गाणी करू नका
  6. अवेळी जेवू नका
  7. पैशाचा साठा करून ठेवू नका
  8. अंथरून धरून बसू नका
  9. महिलांच्या जवळ जाऊ नका
  10. नेहमी सत्याची साथ द्या

तर हा होता बुद्ध पौर्णिमा वर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास बुद्ध पौर्णिमावर मराठी निबंध (essay on Buddha Purnima in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

2 thoughts on “बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती, Buddha Purnima Information in Marathi”

    • खूप खूप धन्यवाद संदीप पाठकजी, तुमच्या अशा कंमेंट्सने आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल.

      Reply

Leave a Comment