चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट, Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट (chal re bhoplya tunuk tunuk story in Marathi). चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट (chal re bhoplya tunuk tunuk story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट, Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला चांगले आई वडील, मित्र, पुस्तके यांची सोबत असेल आवश्यक आहे. लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट

एका गावात एक म्हातारी राहत होती. एकदा तीने आपल्या लेकीकडे जाण्याचे ठरवले. तिच्या लेकीचे घर डोसऱ्या गावात होते. गावाला जाण्यासाठी मध्ये एक जंगल लागत होते.

Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story in Marathi

म्हातारी हि आपल्या लेकीकडे जायला निघाली. म्हातारी हळू हळू काठी टेकत, टेकत रस्त्याने जात होती. थोडा वेळ चालल्यानन्तर तिला जंगल लागले. जंगलात गेल्यानन्तर तिला वाटेत कोल्हा भेटला. कोल्हा तिला म्हणाला थांब म्हातारे आता तुला खातो, मी पण खूप दिवस पासून भेकेलेलो आहे आणि तू मस्त आयतीच मला शिकार चालून आली आहेस. पण म्हातारी हि खूप हुशार होती.

म्हातारी कोल्ह्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट जरा सुद्धा भरणार नाही. त्यापेक्षा मी सांगते ते ऐक, मी आता लेकीकडे चालले आहे, थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, तूपरोटी खाते, जाडजूड होते आणि नन्तर मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे बोलणे पटले.

म्हातारी आता पुढे निघाली. तिला थोड्या वेळाने वाटेत वाघ भेटला. तो सुद्धा म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, बरे झाले तू मला भेटलीस. थांब आता मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला सुद्धा म्हणाली ‘मला खाऊन तुला काहीच होणार नाही आणि तुझे पोट सुद्धा भरणार नाही.

त्यापेक्षा अजून थोडे दिवस थांब. मी आता लेकीकडे जात आहे, लेकीकडे जाते, तूपरोटी खाते, जाडजूड होते, मग मला खा. वाघाला सुद्धा तिचे म्हणणे पटले. वाघाची समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे जायला गेली .

म्हातारी खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन जाडजूड झाली. थोडया दिवसांनी तिला वाटले की आता आपण आपल्या घरी जावे. आता तिला आठवले की आपली वाट कोल्हा आणि वाघ बघत आहे. ते दोघे आपल्याला जाताना खाणार.

तिने येताना वाटेत जे घडले ते सर्व आपल्या लेकीला सांगितले, मग लेकीने तिला एक भाला मोठ्ठा जादूचा भोपळा दिला. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला.

ती आपल्या आईला म्हणाली यात बस आणि यात बसून जा. म्हातारी त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक’. भोपळा रस्त्याने निघाला.

वाटेत वाघाने भोपळा पाहिला. वाघाने भोपळ्याला थांबवले आणि विचारले थांब भोपळ्या, तुला या वाटेने जाताना कोणी म्हातारी दिसली का? आतून म्हातारी म्हणाली ‘कोण म्हातारी आणि कशाची म्हातारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला.

थोडे पुढे गेल्यावर वाटेत तिला कोल्हा भेटला. कोल्हा सुद्धा तिची वाट बघत होता. तो म्हणाला ‘भोपळ्या थांब, तू इकडे जाताना म्हातारीला पाहिलेस का? आतून म्हातारी म्हणाली ‘कोण म्हातारी आणि कशाची म्हातारी.’

म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.

अशी होती आपली हुशार म्हातारी. तिने आपल्या हुशारीने कोल्हा आणि वाघाच्या तावडीत न सापडता भोपळयात बसून सुखरूप आपल्या घरी पोचली.

तात्पर्य

युक्तीचा वापर केला कि मोठ्या शत्रूंचा सुद्धा सामना करता येतो.

तर हि होती चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट. मला आशा आहे की चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट (chal re bhoplya tunuk tunuk story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

इतर महत्वाचे लेख

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍

Leave a Comment

error: Content is protected.