नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चमकणारा चेंडू मराठी गोष्ट (chamaknara chendu story in Marathi). चमकणारा चेंडू मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी चमकणारा चेंडू मराठी गोष्ट (chamaknara chendu story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.
चमकणारा चेंडू मराठी गोष्ट, Chamaknara Chendu Story in Marathi
मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.
परिचय
लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.
चमकणारा चेंडू मराठी गोष्ट
खूप खूप वर्षांपूर्वी एक लहान गाव होते ज्या गावात सर्व लोक खूप आनंदी होते. मुले त्यांच्या घरांच्या बागेत झाडांखाली खेळत असत.
त्याच गावात सचिन नावाचा एक मेंढपाळ मुलगा त्याच्या वडिलांसह राहत होता. तो दररोज सकाळी आपल्या शेळ्यांचा कळप डोंगरावर घेऊन जात असे आणि त्यांना रोज पोटभरून चारून आणत असे. एका दिवशी सचिन असाच आपल्या शेळ्यांना घेऊन रानात गेला असताना एका झाडाखाली बसून आपली बासरी वाजवत होता. त्याला अचानक एका झाडाच्या झुडूपामागे एक वेगळाच प्रकाश दिसला. जेव्हा तो झाडाजवळ आला तेव्हा त्याला एक पारदर्शक आणि अतिशय चमकणारा चेंडू दिसला.
या आधी त्याने असा चेंडू कधीच बघितला नव्हता. सचिनने तो चेंडू नीट हातात घेतला, आपल्या हातात पकडताच चेंडूतून एक आवाज आला मी तुमच्या मनाची इच्छा कोणतिही करू मागू शकता आणि मी ती पूर्ण करेन.
सचिनला यावर विश्वासच बसत नव्हता की त्याने प्रत्यक्षात आवाज ऐकला होता. ततो खूप घाबरून गेला कि नक्की काय झाले आहे, जेव्हा त्याने खात्री केली की खरोखर हा आवाज हा चमकणाऱ्या चेंडूंमधून येत आहे, तेव्हा तो खूप गोंधळून गेला.
सचिनच्या आता इतक्या इच्छा होत्या की तो नक्की कोणती इच्छा मागावी हाच विचार करत राहिला. नंतर तो स्वतःच म्हणाला कि आता तर हा चेंडू आपलाच आहे तर आपणच एक काम करू, अजून एक दिवस थांबू आणि नीट विचारू करून मागू. त्याने तो चेंडू एका पिशवीत ठेवला आणि शेळ्या गोळा करून आनंदाने गावात परतला. त्याने ठरवले की तो कोणालाही याबद्दल सांगणार नाही.
दुसऱ्या दिवशीही सचिनने आपल्या सर्व इच्छा मागितल्या आणि बघता बघता तो श्रीमंत झाला. आता त्याच्याकडे त्याने मागितलेले सर्व काही होते. त्याच्या स्वभावातील बदल पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. एक दिवस एक मुलगा सचिन रानात गेला असता त्याच्या एका मित्राने हा नक्की काय करतो म्हणून त्याचा पाठलाग केला आणि त्याला पण समजले कि सचिन हा हे सर्व त्या जादूच्या चेंडूंमुळे करत आहे.
तो त्याच्या कळपाच्या मागे गेला आणि एका झाडामागे लपला. सचिन कधी झोपायला जाईल या क्षणाची त्या मुलाने वाट पाहिली. जेव्हा सचिन थोड्या वेळाने झोपी गेला तेव्हा मुलगा तो चेंडू घेऊन पळून गेला. जेव्हा तो गावात आला तेव्हा त्याने सर्व लोकांना बोलावले आणि त्यांना तो चेंडू दाखवला.
गावातील नागरिकांनी हातात जादूचा चेंडू घेतला आणि आपली इच्छा मागायला सुरुवात केली. एका व्यक्तीने चेंडू घेतला आणि ओरडला, मला सोने हवे आहे. दुसऱ्याने चेंडू घेतला आणि जोरात म्हणाला, मला खूप सारे दागिने हवे आहेत. काहींना अशी इच्छा होती की त्यांच्या जुन्या घरांऐवजी त्यांचा स्वतःचा राजवाडा असावा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, पण तरीही गावातील नागरिक आनंदी नव्हते.
आता त्यांना दुःखच होत होते कि कारण ज्या व्यक्तीकडे राजवाडा होता त्याच्याकडे सोने नव्हते आणि ज्या व्यक्तीकडे सोने होते त्याच्याकडे महाल नव्हता. या कारणामुळे गावातील नागरिक एकमेकांवर चिडले आणि एकमेकांशी बोलणे बंद केले. ज्या गावात मुले खेळत असत ती मैदाने आता ओसाड पडू लागली. सर्वत्र फक्त राजवाडे होते.
फक्त सचिन आणि त्याचे कुटुंब आनंदी आणि समाधानी होते. रोज सकाळी आणि दुपारी तो बासरी वाजवायचा. एक दिवस गावातील मुले तो चमकणारा चेंडू बॉल सचिनकडे गेली. मुले सचिनला म्हणाली, जेव्हा आमचे एक छोटेसे गाव होते, तेव्हा आम्ही सर्व आनंदी आणि आनंदी होतो. आता आपण सर्व दुःखी आहोत. आलिशान राजवाडे आणि दागिने फक्त आपल्याला दुःख देतात. तेव्हा सचिनने त्यांना सांगितले जर तुम्हाला खरोखरच सर्व काही पुन्हा नको असे तर मी तुमची इच्छा पूर्ण करिन. सचिनने चेंडू हातात घेतला, आणि आपले गाव पूर्वीसारखेच होईल अशी इच्छा व्यक्त केली. एका क्षणात, राजवाडे नाहीसे झाले, हिरव्या बागा दिसू लागल्या आणि झाडांनी भरलेले तेच जुने गाव तिथे होते. पुन्हा एकदा लोक आनंदाने जगू लागले आणि मुले झाडांच्या सावलीखाली खेळू लागली.
तात्पर्य
आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण आनंदी असले पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीसाठी हाव करू नये.
तर हि होती चमकणारा चेंडू मराठी गोष्ट. मला आशा आहे की चमकणारा चेंडू मराठी गोष्ट (chamaknara chendu story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.