सायबर सिक्युरिटी मराठी निबंध, Cyber Security Essay in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सायबर सिक्युरिटी मराठी निबंध (cyber security essay in Marathi). सायबर सिक्युरिटी मराठी निबंध हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी सायबर सिक्युरिटी मराठी निबंध (cyber security essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

सायबर सिक्युरिटी मराठी निबंध, Cyber Security Essay in Marathi

सायबर सिक्युरिटी किंवा सायबरसुरक्षा म्हणजे आपली माहिती, इंटरनेट नेटवर्क, प्रोग्राम आणि इतर कोणीतरी ऑनलाईन माहिती अनधिकृत लोकांपासून वाचवणे किंवा त्याची चोरी होण्यापासून संरक्षण करणे.

परिचय

आजच्या जगात, काही सुरक्षा धोक्यांमुळे आणि सायबर हल्ल्यांमुळे सायबर सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. आपलय कंपनीची माहिती चोरी होण्यापासून वाचण्यासाठी अनेक कंपन्या सॉफ्टवेअर विकसित करतात. हे सॉफ्टवेअर तुमच्या माहितीचे संरक्षण करते. सायबरसुरक्षा महत्त्वाची आहे कारण ती केवळ माहितीच नाही तर आपल्या सिस्टमला व्हायरसच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तसे पाहिले गेले तर जगात अमेरिका आणि चीननंतर भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे म्हणजे काय

संगणक, इंटरनेट, मोबाईल किंवा इतर तांत्रिक उपकरणे इत्यादींचा वापर करून एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या गटाकडून तुमच्या माहितीशी छेडछाड करणे याला सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा म्हणतात. असे हे हल्लेखोर सायबर गुन्हे करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून असंख्य सॉफ्टवेअर आणि कोड वापरतात.

Cyber Security Essay in Marathi

असे लोक मालवेअर आणि अनेक प्रकारच्या व्हायरसच्या वापराद्वारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर डिझाइनमधील कमकुवत जागा शोधून तुमच्या सिस्टमचा ऍक्सेस घेतात. हॅकिंग हा संरक्षित संगणक प्रणालीच्या संरक्षणास तडा देण्याचा आणि त्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा एक सामान्य मार्ग आहे.

सायबर क्राईम कसे करतात

सायबर क्राईम थेट घडू शकतात म्हणजे, संगणक व्हायरस पसरवून थेट अशा संगणकांना लक्ष्य करणे. इतर प्रकारांमध्ये DOS प्रकाराने अशा संगणकावर हल्ला करून त्याची सिस्टम बंद पडली जाते. मशीन किंवा नेटवर्क वापरणाऱ्या लोकांना सेवा न देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. हे इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या होस्टच्या सेवा निलंबित करते जे तात्पुरते किंवा कायमचे असू शकतात.

मालवेअर किंवा व्हायरस हे संगणक ऑपरेशनमध्ये व्यत्यय आणण्यासाठी, संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी किंवा खाजगी संगणक प्रणालींमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे. हे सहसा कोड, स्क्रिप्ट, सक्रिय सामग्री आणि इतर सॉफ्टवेअरच्या स्वरूपात तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकरवर पाठवले जाते किंवा तुमच्या कडून कोणत्याही धोक्याच्या वेबसाईटवरुन ते डाउनलोड होऊन जाते ज्याची तुम्हला कल्पना सुद्धा नसते. मालवेअरचे सुद्धा अनेक प्रकार आहेत जसे कि ट्रोजन हॉर्सेस, रूटकिट्स, वर्म्स, ऍडवेअर इ.

सायबर गुन्ह्यांचा आणखी एक मार्ग म्हणजे संगणक नेटवर्क किंवा उपकरणापासून स्वतंत्र असणाऱ्या संस्थानांवर हल्ले करणे. त्यात आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. देशाची अर्थव्यवस्था अस्थिर करणे, बँकिंग सुरक्षा आणि व्यवहार प्रणालीवर हल्ला करणे, फसवणूक करून पैसे काढणे, क्रेडिट/डेबिट कार्ड डेटा संपादन करणे, आर्थिक चोरी इ. यांचा समावेश असतो. असे गुन्हे हे मोठ्या प्रमाणात बँकांवर झाल्याचे पाहायला मिळते.

सायबर क्राईम मुळे होणारे नुकसान

सायबर क्राईम हे खूप धोकादायक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यात आपली गोपनीय माहिती कोणीतरी अनोळखी माणसाच्या हाती लागते. अशावेळी माहिती चोरी करणे, दुसऱ्या कोणाला विकणे, माहिती मध्ये बदल करणे, माहिती पुसून टाकणे असे अनेक धोके आहेत. याद्वारे वेबसाइट किंवा सेवेच्या कार्यात अडथळा आणला जातो. कधीकधी मुलींचा अपमान करण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी अश्लील सामग्री वापरणे, पोर्नोग्राफी पसरवणे, ई-मेलची धमकी देणे, बनावट ओळखपत्र तयार करणे, यांचा समावेश होतो. आजकाल जातीय हिंसाचार भडकवणे आणि दंगली भडकवणे यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

सध्याच्या काळात होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सर्वांना असे वाटत आहे कि काही वर्षांनी जगात सायबर युद्ध सुद्धा होऊ शकते. आपण आता सुद्धा काहीवेळा अशा बातम्या ऐकतो जेव्हा कोणत्या तरी देशाने दुसऱ्या देशाची गोपनीय माहिती चोरी केली. मध्यंतरी आपण सुद्धा ऐकले होते कि चीन काही मोबाईल अँप्स च्या मदतीने भारतीय लोकांची माहिती चोरी करत होता असा संशय होता. जेव्हा कोणतेही राज्य दुसर्‍या राष्ट्राविरुद्ध लढण्यासाठी राज्याच्या धोरणाचे साधन म्हणून इंटरनेट-आधारित अदृश्य शक्तीचा वापर सुरू करते तेव्हा त्याला सायबर युद्ध म्हणतात.

सायबर क्राईम पासून आपण सुरक्षित कसे राहाल

तुमची माहिती सुरक्षित आहे हे जाणून तुम्ही तुमची सुरक्षितता वाढवण्यासाठी करू शकता ती सर्वात सोपी गोष्ट म्हणजे तुमचे पासवर्ड बदलणे. तुमच्यासाठी प्रत्येक वेबसाईट वर लॉगिन करताना वेगळा पासवर्ड वापरावा. तसेच तुम्ही प्रत्येक साइटसाठी युनिक, सुरक्षित पासवर्ड बनवून देणाऱ्या अँप्सचा सुद्धा वापर करू शकता.

ज्या साईटवर तुम्ही आता काही काम करत नाही त्या साईटवरील तुमचे खाते बंद करून टाका. तुमच्या खात्याचा, इंटरनेट बँकिंग किंवा दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटचा पासवर्ड कधीच कोणाला देऊ नका किंवा कुठे लिहून ठेवू नका. नेहमी तुमचा मोबाईल, संगणक अद्ययावत ठेवा.

निष्कर्ष

आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सायबर सुरक्षा ही जगातील सर्वात मोठी गरज आहे कारण सायबर क्राईम देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक आहेत. तुमची सिस्टम आणि नेटवर्क सुरक्षा सेटिंग्ज नेहमी अपडेट करण्यासाठी आणि योग्य अँटी-व्हायरस वापरण्यासाठी केवळ सरकारनेच नाही तर नागरिकांनीही लोकांमध्ये जागरूकता पसरवली पाहिजे जेणेकरून तुमची सिस्टम आणि नेटवर्क सुरक्षा सेटिंग्ज व्हायरस आणि मालवेअर-मुक्त राहतील. हे सर्व व्यवस्थित असेल तर तुम्ही सुद्धा संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित असाल.

तर हा होता सायबर सिक्युरिटी मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास सायबर सिक्युरिटी मराठी निबंध हा लेख (cyber security essay in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment