दिनेश कार्तिक माहिती मराठी, Dinesh Karthik Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनेश कार्तिक यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Dinesh Karthik information in Marathi). दिनेश कार्तिक यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी दिनेश कार्तिक यांच्यावर मराठीत माहिती (Dinesh Karthik biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

दिनेश कार्तिक माहिती मराठी, Dinesh Karthik Information in Marathi

दिनेश कार्तिक हा एक भारतीय संघाचा क्रिकेटपटू आणि आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा विद्यमान उपकर्णधार आहे .

परिचय

आपल्या भारताच्या संघाव्यतिरिक्त तो तमिळनाडू क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे. २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघातून त्याने पदार्पण केले . इंडियन प्रीमियर लीगमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक कॅच घेतल्याचा विक्रम करत त्याने एमएस धोनीच्या विक्रमाला टाकले आहे.

वैयक्तिक जीवन

दिनेश कार्तिकचा जन्म हा झाला १ जुन १९८५ मध्ये चेन्नई , तामिळनाडू येथे झाला. त्याने आपल्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

Dinesh Karthik Information in Marathi

२०१२ मध्ये कार्तिकचे निकिता वंजारा बरोबर लग्न झाले होते. दिनेश कार्तिक आणि निकिताचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला. २०१३ मध्ये कार्तिकने भारतीय स्क्वॉश प्लेयर दीपिका पल्लीकलशी लग्न केले.

डोमेस्टिक क्रिकेट कारकीर्द

दिनेश कार्तिकने २००२ साली एक विकेटकीपर म्हणून बडोद्याविरुद्ध खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. त्याने पाच सामन्यात १७९ धावा केल्या. त्याने ११ झेल घेतले पण, वारंवार विकेटकीपिंगच्या चुकांमुळे त्याला शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले.

२००३-०४ च्या रणजी सिजनसाठी कार्तिकची पुन्हा निवड करण्यात आली. त्याने दोन शतकांसह ४३८ धावा केल्या आणि २० झेल टिपले. रेल्वेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने १२२ धावा केल्या. मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद १०९ धाव करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

२००४ च्या १९ वर्षाखाली क्रिकेट विश्वचषकात कार्तिकची भारतीय संघात निवड झाली होती. २००९ मध्ये ते रणजी करंडकातील सहा सामन्यांमध्ये तामिळनाडूचा कर्णधार होता. कार्तिकने ओरिसाविरुद्ध खेळताना १५२ आणि पंजाबविरुद्ध ११७ धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

कसोटी कारकीर्द

ऑक्टोबर २००४ मध्ये पार्थिव पटेलला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मुंबई येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कार्तिकने पदार्पण केले. त्याने दोन डावात फक्त १४ धावा केल्या पण त्याची कीपिंग करण्याची कला सर्वांना आवडली.

कार्तिकची कसोटी कारकीर्द म्हणावी तशी चांगली सुरु झाली नाही. पदार्पणानंतरच्या दहा कसोटींमध्ये कार्तिकने फक्त २५५ धावा केल्या. त्यात फक्त एक अर्धशतक होते. त्याच्या या खेळामुळे त्याला कसोटीमध्ये एक बॅक-अप विकेटकीपर आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून निवडले गेले.

२००७ मध्ये धोनीच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर, कार्तिकला त्याच्याऐवजी न्यूझीलंडमधील तिसर्‍या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध संधी मिळाली. त्याने वसीम जाफरसह डावाची सलामी देत पहिल्या डावात ६३ धावा केल्या. आपल्या अनुभवाचा उपयोग करत त्याने शतकी भागीदारीची सलामी दिली. दुसऱ्या डावात कार्तिकने नाबाद ३८ धावा केल्या कारण संघ 169 धावांवर बाद झाला.त्याच्या फलंदाजीबरोबरच त्याच्या विकेटकीपिंगचेही कौतुक केले.

कार्तिक हा २००७ नंतर कसोटी मालिकेत नियमित सलामीवीर बनला होता. लॉर्ड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कार्तिकने दुसर्‍या डावात ६० धावा केल्या. ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या दुसर्‍या कसोटीत कार्तिकने ७७ आणि २२ धावा केल्या. ओव्हलमधील झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ९१ धावा केल्या. त्याने या मालिकेत २६३ धावा केल्या. भारताकडून मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

जुलै २००८ मध्ये श्रीलंका दौर्‍यासाठी धोनी हा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला कसोटी संघात विकेटकीपर म्हणून पुन्हा बोलावण्यात आले. कार्तिक पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला, परंतु त्याला हवी तशी फलंदाजी करता आली नाही.

एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द

एप्रिल २००६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात धोनीला विश्रांती देण्यासाठी कार्तिकला एकदिवसीय संघात बोलावण्यात आले. त्यानंतर कार्तिकला वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी राखीव विकेटकीपर म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले.

दिनेश कार्तिक हा आपल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत ९४ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामने खेळला. त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये आणि महत्त्वपूर्ण ट्रॉफीमध्ये दोन्ही एकदिवसीय सामने तसेच टी -२० मध्ये भारतीय संघासाठी अनेकदा सामना जिंकणारी खेळी खेळली आहे.

खांद्याच्या समस्येमुळे बाहेर गेलेल्या वीरेंद्र सेहवागच्या जागी कार्तिकला वेस्ट इंडीजच्या चार सामन्यांच्या भारत दौर्‍यावर पुन्हा संधी मिळाली. सलामीवीर म्हणून त्याने चांगली खेळी करत भारताला मालिका २-१ अशी जिंकुन दिली.

डिसेंबर २००९ धोनी वर दोन सामन्यांसाठी बंदी घातल्यानंतर कार्तिकची संघात निवड करण्यात आली. पुढील दोन सामन्यात कार्तिकने ५० हुन जास्त धावा करत भारताला जिंकण्यात मदत केली.

१० डिसेंबर २०१७ रोजी कार्तिकने श्रीलंकेविरुद्ध १८ चेंडूंचा सामना करत एकसुद्धा धाव काढली नाही , हा नकोसा एकदिवसीय विक्रम त्याच्या नावावरआहे.

२०१८ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने आठ बॉलमध्ये नाबाद २९ धावा करत सामना जिंकणारी खेळी खेळली. अखेरच्या दोन षटकांत भारताला ३४ धावांची गरज असताना फलंदाजीसाठी येत असताना कार्तिकने शेवटच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना एका षटकारासह सामना आणि स्पर्धा जिंकली.

इंडियन प्रीमियर लीग कारकीर्द

इंडियन प्रीमियर लीगमध्ये कार्तिकने २००८ पासून खेळायला सुरुवात केली. त्याने आपल्या पाहिल्या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून खेळताना १४५ धावा केल्या. २००९ मध्ये त्याने २८८ धावा केल्या.

२०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात विकत घेतले होते. २०१२ मध्ये कार्तिक हा मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. तो मुंबई इंडियन्स बरोबर २०१२ आणि २०१३ या दोन मोसमात खेळला. २०१४ मध्ये पुन्हा दिल्लीने त्याला खरेदी केले. २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि २०१६, २०१७ मध्ये गुजरात लायन्सने खरेदी केले.

२०१८ मध्ये त्याला कोलकाता नाइट रायडर्स संघाने विकत घेतले. त्याने २०१८ मध्ये आपल्या संघाला अंतिम ४ संघात नेले होते. २०२० मध्ये, कोलकाता संघाचा खूप खराब खेळ झाला. कार्तिकने अर्ध्या सिजनमध्येच इयन मॉर्गनकडे कर्णधारपद दिले.

समालोचन कारकीर्द

दिनेश कार्तिक मार्च २०२१ मध्ये आयोजित भारत-इंग्लंड टी-२० आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान समालोचन करत एक नवीन सुरुवात केली.

तर हा होता दिनेश कार्तिक यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास दिनेश कार्तिक यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Dinesh Karthik information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment