एकीचे बळ मराठी गोष्ट, Ekiche Bal, Unity is Strength Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकीचे बळ मराठी गोष्ट (ekiche bal, unity is strength story in Marathi). एकीचे बळ मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी एकीचे बळ मराठी गोष्ट (ekiche bal, unity is strength story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

एकीचे बळ मराठी गोष्ट, Ekiche Bal, Unity is Strength Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला चांगले आई वडील, मित्र, पुस्तके यांची सोबत असेल आवश्यक आहे. लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

एकीचे बळ मराठी गोष्ट

एका गावात एक वृद्ध राहत होता आणि त्याला तीन मुलगे होते. जरी त्याला खूप शेती, घर चांगले असेल तरी तो आनंदी नव्हता. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याची मुले.

Ekiche Bal, Unity is Strength Story in Marathi

त्याची मुले नेहमी छोट्या छोट्या कारणांवरून एकमेकांशी भांडत करत असत. म्हातारा खूप आजारी पडला होता. एके दिवशी म्हातारा आपल्या मुलांना म्हणाला. मी एक बाहेर एक लाठ्यांचा गठ्ठा ठेवला आहे तो तम्ही इकडे घेऊन या. मुलांनी बाहेर ठेवलेला गठ्ठा आत आणला.

म्हातार्‍याने आपल्या सर्व मुलांना बोलावून घेतले आणि त्यांना तो बोलला आता हा तुम्हा सर्वांसमोर काठ्यांचा गठ्ठा आहे. पप्रत्येकाने तो हातात घ्या आणि तुमची सर्व ताकत लावून मोडायचा प्रयत्न करा.

एक एक मुलाने लाठ्यांचा गठ्ठा तोडण्याचा प्रयत्न केला पण एकाला सुद्धा तो गठ्ठा तोडण्यात यश आले नाही. ते सर्वजण अयशस्वी झाले.

आता म्हातारा त्यांना म्हणाला, “आता हा गठ्ठा सोडा आणि सर्वानी एक एक काठी घ्या. आता सर्वांनी आपल्याकडे असलेली काठी तुमच्या शक्तीप्रमाणे तोडा. प्रत्येक मुलाने एक एक काठी घेतली आणि एकदम सहजपणे ती काठी तोडली.

म्हातारा आपल्या मुलांना आता म्हणाला आता यातून काय शिकलात एकमेकांशी तुम्ही भांडू नका. तुम्ही सर्व एकत्र राहा. तुम्ही एकत्र असाल तर तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. तुम्ही नेहमी आनंदी आणि मजबूत असाल.

या गोष्टींमधून तिन्ही मुलांनी एक धडा घेतला आणि शेवटपर्यंत ते एकत्र राहिले.

तात्पर्य

आपण सर्व एकत्र असू तर आपल्याला कोणीही हानी पोहचवू शकत नाही. एकीचे बळ सर्वश्रेष्ठ आहे.

तर हि होती एकीचे बळ मराठी गोष्ट. मला आशा आहे की एकीचे बळ मराठी गोष्ट (ekiche bal story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

6 thoughts on “एकीचे बळ मराठी गोष्ट, Ekiche Bal, Unity is Strength Story in Marathi”

    • खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशाच कमेंट्समुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असते.

      Reply

Leave a Reply to Marathi Social Cancel reply