हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट, Elephant and Ant Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट (elephant and ant story in Marathi). हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट (elephant and ant story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट, Elephant and Ant Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला चांगले आई वडील, मित्र, पुस्तके यांची सोबत असेल आवश्यक आहे. लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट

एका जंगलात एका ठिकाणी मुंग्यांचे एक भले मोठे वारूळ होते. मुंग्यांची राणी खूप मेहनती होती. भल्या पहाटे ती ति अन्नाच्या शोधात बाहेर पडायची.

Elephant and Ant Story in Marathi

त्याच जंगलात एक गर्विष्ठ हत्तीही राहत होता. तो जंगलातील सर्व प्राण्यांना त्रास देत असे. कधी तो घाणेरड्या नाल्यातून पाणी आपल्या सोंडेत घेऊन येत असे नि सर्व प्राण्यांवर टाकत असे, तर कधी आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून त्यांना घाबरवायचा.

मुंग्याचे वारूळ हे हत्तीच्या नेहमीच्या रस्त्यात येत असे. त्या हत्तीला या मुंग्यांचा खूप राग येत असे. जेव्हा तो त्यांना पाहत असे तेव्हा तो त्यांना आपल्या पायाने चिरडायचा.

एके दिवशी मुंगी राणीने हत्तीला नम्रपणे विचारले की तू इतरांना त्रास का देतोस? ही सवय चांगली नाही.

हे ऐकून हत्तीला राग आला आणि त्याने मुंगीला धमकावले की तू खूप लहान आहेस, तुझ्या जिभेला लगाम ठेव, मला काय चांगले आणि काय खराब हे शिकवू नकोस नाहीतर तुलाही चिरडून टाकीन.

हे ऐकून मुंगी गप्प झाली, पण त्याने मनातल्या मनात हत्तीला चांगला धडा शिकवायचे ठरवले. तिने आपला हा बेत सर्व आपल्या सहकारी मुंग्यांना सांगितला.

एके दिवशी नेहमीप्रमाणे हत्ती त्याच रस्त्याने येऊ लागला. त्याने पुन्हा एकदा त्या वारुळावर आपला पाय ठेवला, आणि पुन्हा मुंग्यांना चिरडू लागला.

आधीच ठरल्याप्रमाने जवळच असलेल्या झुडपात लपलेल्या मुंग्यांनी संधी पाहून गुपचूप हत्तीच्या सोंडेत शिरल्या. मग त्या सर्व मिळून हत्तीला चावू लागल्या.

हत्ती अस्वस्थ झाला. त्याने आपली सोंड खूप जोरात हलवली, जोराने जमिनीवर आपटली, पण काहीच उपयोग झाला नाही.

हत्ती आता वेदनेने ओरडू लागला आणि रडू लागला. ते पाहून मुंगी म्हणाली हत्ती दादा, तू इतरांना त्रास देतोस, त्यामुळे तुला खूप मजा येते, मग आता तू स्वतःला त्रास होत आहे तर का रडत आहेस?

हत्तीला आपली चूक कळली आणि त्याने मुंगीची माफी मागितली की आतापासून तो कधीही कोणाला दुखावणार नाही.

सर्व मुंग्यांना त्यांची दया आली. सर्व मुंग्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, कोणालाही कधीही लहान आणि कमकुवत समजू नये.

हे ऐकून हत्ती म्हणाला की मला धडा मिळाला आहे. आता आपण सर्व एकत्र राहू आणि कोणीही कोणाला त्रास देणार नाही.

तात्पर्य

कुणालाही कधीही लहान आणि कमकुवत समजू नका.

तर हि होती हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट. मला आशा आहे की हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट (elephant and ant story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment