आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे क्रिकेट खेळाची माहिती मराठी निबंध essay on cricket in Marathi. क्रिकेट खेळाची माहिती मराठी हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी क्रिकेट खेळाची माहिती मराठी निबंध, essay on cricket in Marathi वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
क्रिकेट वर मराठी निबंध, Essay On Cricket in Marathi
क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात बॅट आणि बॉलचा वापर करावा लागतो. क्रिकेट हा जगातील सर्वात प्रसिद्ध अशा खेळांपैकी एक आहे.
परिचय
क्रिकेट मध्ये प्रत्येकी ११ खेळाडूंचा समावेश असलेल्या दोन संघांचा समावेश आहे. सर्वाधिक धावा करणे हे खेळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच उद्देशाने व्यवस्थित बनवून तयार केलेल्या मैदानात खेळपट्टीवर खेळला जातो. इंग्लंड आणि भारतात क्रिकेट हा खेळ खूप प्रसिद्ध आहे.
आजकाल क्रिकेट हा एक व्यायसायिक खेळ म्हणून सुद्धा नावारूपाला आला आहे. अनेक प्रसिद्ध खेळाडू चांगली कमाई करत आहेत. सुरुवातील कसोटी क्रिकेट म्हणून चालू झालेले क्रिकेट आता एकदिवसीय, २०-२० क्रिकेट, १०-१० ओव्हर्स क्रिकेट अशा अनेक स्वरूपात पाहायला मिळत आहे.
क्रिकेटचे प्रकार
क्रिकेटचे अनेक प्रकार असल्याने त्या प्रत्येक फॉरमॅटचा चाहतावर्ग वेगळा आहे. काही लोकांना त्यांच्या रोमांचक असे कसोटी सामने पाहणे आवडते. काहीजण २०-२० सामने पाहतात ज्यांना कमी वेळचे सामने पाहणे आवडतात. हे सामने अत्यंत मनोरंजक असतात.
कसोटी सामना हा क्रिकेटचा एक प्रकार आहे जो पारंपारिक आहे. कसोटी सामने पाच दिवस चालतात आणि या सामन्यात दोन देश एकमेकांविरुद्ध खेळतात. दुसरा प्रकार म्हणजे काही देशांच्या अंतर्गत सुद्धा संघ असतात जिथे रणजी क्रिकेट, काउंटी क्रिकेट असे सुद्धा बोलतात. त्यांचा कालावधी तीन ते चार दिवसांचा असतो.
एकदिवसीय मर्यादित षटकांचे क्रिकेट हा आणखी एक प्रकार आहे जेथे ५०-५० ओवरचे सामने खेळवले जातात. दोन संघ ५० ओव्हर्स खेळून प्रथम फलंदाजी करताना जास्त धावा करतात आणि समोरचा संघ विरोधी संघाला कमीत कमी धावा करण्यास रोखायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या डावात समोरचा संघ धावांचे दिलेले आव्हान पार करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे सर्वात जास्त धावा करणारा संघ विजयी म्हणून घोषित केला जातो. कधी कधी सामन्यात काही व्यत्यय आल्यास सामना निकाली लावण्यास डक वर्थ- लुईस पद्धत लागू करतात.
एकदिवसीय सामन्यानंतर क्रिकेटचे सर्वात मनोरंजक प्रकार म्हणजे २०-२०. हे क्रिकेटचे सर्वात मनोरंजक रूप आहे. यात फक्त २० षटके खेळतात. २०-२० सामने हे ३-४ तासांमध्ये संपणारे आणि अनेक देशात हे २०-२० चे रूप खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरात इंडियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग अशा अनेक लीग अनेक देश आयोजित करतात.
भारतातील क्रिकेटची प्रसिद्धी
हॉकी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ असला तरी आपल्या देशात सर्वांच्या मनावर राज्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ चाहत्यांमध्ये खूप उत्साह निर्माण करतो. भारतात क्रिकेट हा धर्म आहे आणि खेळाडूंना देवता मानले जाते. आपल्या देशात सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव मानले जाते. क्रिकेट हा भारतातील सर्वात जास्त पाहिला जाणारा खेळ आहे आणि जेव्हा कधी मोठे सामने असतात तेव्हा आल्या देशातील लोक आपले ऑफिस, कामांमधून सुद्धा सुट्टी घेताना आपण पाहिले आहे.
क्रिकेटमुळे होणारे नुकसान
क्रिकेटची बेफाम आवड अनेक वेळा लोकांसाठी आणि क्रिकेटपटूंसाठी धोकादायक ठरली आहे. जेव्हा आपला देश वर्ल्ड कप हरला तेव्हा आपल्या देशातील लोकांनी आपल्या खेळाडूंचे पुतळे जाळले होते. घरे फोडली होती, खेळाडूंना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. शिवाय चाहते त्यांचा राग किंवा आपुलकी दाखवण्यासाठी सर्वकाही धोक्यात घालतात. आपला देश हरला म्हणून काही लोकांनी आपला जीव सुद्धा धोक्यात घातला आहे.
भारतातील क्रिकेट मंडळ
विविध प्रकारच्या खेळातील क्रिकेटचा आनंद जगभरातील लोकही घेतात. अनेक मोठमोठे व्यायसायिक देखील लोकप्रियता मिळवण्यासाठी आता क्रिकेटमध्ये गुंतवणूक करत आहेत.
भारतीय नियामक क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात मोठे मंडळ आहे. भारतीय नियामक क्रिकेट बोर्ड हे इंडियन प्रीमियर लीग सुद्धा आयोजित करते. थोडक्यात, आपल्या देशात क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून एक भावना आहे, असे म्हणणे सुरक्षित आहे. हे लोक चांगल्यासाठी एकत्र येतात. यामुळे इतर देशांसोबतचे आपले नातेही मजबूत होते.
निष्कर्ष
क्रिकेट खेळाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा खेळ खेळाच्या भावनेने खेळला आणि विजय-पराभव याचा विचार न करता खेळाचा आनंद घेणे महत्वाचे आहे. खेळातील बंधुभावाची भावना आणि तंदुरुस्त खेळाडू क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतात. हा लोकप्रिय खेळ उत्तरोत्तर वाढवण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या देशात चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून भारताचे नाव क्रीडा जगतात अग्रस्थानी व्हावे.
तर हा होता क्रिकेट खेळाची माहिती मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास क्रिकेट खेळाची माहिती मराठी लेख, essay on cricket in Marathi आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.