नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गाढव आणि कुत्रा मराठी गोष्ट (gadhav ani kutra story in Marathi). गाढव आणि कुत्रा मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी गाढव आणि कुत्रा मराठी गोष्ट (gadhav ani kutra story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.
गाढव आणि कुत्रा मराठी गोष्ट, Gadhav Ani Kutra Story in Marathi
मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.
परिचय
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला चांगले आई वडील, मित्र, पुस्तके यांची सोबत असेल आवश्यक आहे. लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.
गाढव आणि कुत्रा मराठी गोष्ट
एका गावात एक धोबी राहत होता. त्याच्याकडे एक गाढव आणि कुत्रा होता. गाढव आणि कुत्रा या दोघांनीही त्याच्या मालकाला अनेक प्रकारे मदत केली.
एका रात्री काही चोरटे त्या धोब्याचे घर फोडायला आले होते. ते बघून कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. धोबी उठला आणि शेजारीही उठले. सर्वांना उठलेले बघून आपण पकडले जाऊ शकतो हे समजून चोर पळून जायला लागले.
रस्त्यावर बरेच लोक रस्त्यावर जमा झाले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांनी पकडले. धोबीवाला म्हणाला, मला माझ्या कुत्र्याने आज मोठ्या आर्थिक संकटापासून वाचवले आहे.
मला खात्री आहे की जर माझा कुत्रा भुंकला नसता तर चोरांनी मला लुटले असते. प्रत्येकाने कुत्र्याची स्तुतीही केली. त्या दिवसापासून गाढवाने विचार करायला सुरुवात केली, कुत्रा खूप उपयुक्त प्राणी आहे असे गाढवाला वाटायला लागले.
गाढवाने ठरवले की तो आपल्या मालकाला म्हणजे धोब्याला दाखवून द्यावे कि मी सुद्धा कुत्र्याप्रमाणेच उपयुक्त आहे. काही दिवसांनी पुन्हा एकदा काही चोर त्यांच्या गावात चोरी करायला आले.
चोरांनी एक एक घर शोधायला सुरुवात केली. धोब्याच्या घराजवळ कुत्रा बघताच त्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या घराकडे नेला. चोरांनी दुसरे घर लुटायचा विचार केला. कुत्रा झोपी गेला होता पण बाहेर बांधलेले गाढव हे सर्व बघत होते.
गाढवाने आता विचार केला कि हीच वेळ आहे धोब्याला दाखवून द्यायचे कि मी सुद्धा खूप उपयोगी आहे. जर मी सुद्धा कुत्र्याप्रमाणे ओरडलो तर सर्व जागे होतील आणि चोर पकडले जातील. असा विचार करून गाढवाने जोरजोरात ओरडायला लागले.
अशा रात्रीच्या वेळी गाढवाचे ओरडणे ऐकून धोब्याची झोपमोड झाली, त्याला खूप राग आला होता आणि त्याने खूप एक मोठी काढली. त्याने रंगाच्या भारत काठीने गाढवाला खूप मारले.
धोब्याला बघून चोर पळून गेले पण गाढवाने खूप मार खाल्ला. थोड्या वेळाने कुत्रा गाढवाकडे आला आणि म्हणाला, कधीच आपले काम सोडून दुसऱ्याचे काम करता बसू नये. माझ्यासारखे होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपले स्वतःचे काम करणे चांगले आहे.
गाढवाला कळले की कुत्रा बरोबर सांगत आहे. त्यानंतर गाढव कधीच कुत्र्याच्या मध्ये आला नाही.
तात्पर्य
कधीच आपण आपले काम सोडून दुसऱ्यासारखे होण्याचा प्रयत्न करू नये.
तर हि होती गाढव आणि कुत्रा मराठी गोष्ट. मला आशा आहे की गाढव आणि कुत्रा मराठी गोष्ट (gadhav ani kutra story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.