हरभजन सिंग माहिती मराठी, Harbhajan Singh Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हरभजन सिंग यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Harbhajan Singh information in Marathi). हरभजन सिंग यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी हरभजन सिंग यांच्यावर मराठीत माहिती (Harbhajan Singh biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

हरभजन सिंग माहिती मराठी, Harbhajan Singh Information in Marathi

हरभजन सिंग हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. क्रिकेट व्यतिरिक्त त्याने काही चित्रपटांमध्ये काही भूमीला सुद्धा केल्या आहेत. हरभजन सिंग एक ऑफ स्पिनर असून त्याने श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या पाठोपाठ ऑफ स्पिनरने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त कसोटी विकेट घेतल्या आहेत.

परिचय

हरभजन सिंग याने १९९८ च्या सुरूवातीस कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००१ मध्ये बॉर्डर-गावस्कर चषकात ३२ विकेट्स घेत संघाचा महत्वाचा फिरकीपटू म्हणून स्वत:ला स्थापित केले. हरभजन सिंग हा कसोटी क्रिकेटमधील हॅटट्रिक खेळणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. २०११ चा विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा तो भाग होता.

Harbhajan Singh Information in Marathi

२००९ मध्ये हरभजन सिंग ला भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वैयक्तिक जीवन

हरभजन सिंगचा जन्म ३ जुलै १९८० ला एका शीख कुटुंबात झाला. त्याचे वडील सरदार सरदेवसिंग बॉल बेअरिंग आणि व्हॉल्व बनवण्याचा कारखाना होता. हरभजन सिंग हा एकुलता एक होता आणि त्याला पाच बहिणी होत्या. तो आपल्या वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालत होता पण त्याला वडिलांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला दिला.

क्रिकेट प्रशिक्षक चरणजित सिंह भुल्लर यांनी आधी हरभजनला फलंदाज म्हणून प्रशिक्षण दिले होते. २००० मध्ये आपल्या वडिलांच्या निधनानंतर हरभजन वर कुटुंबाची सर्व जबाबदारी पडली.

हरभजन सिंगने आपली दीर्घकाळची मैत्रीण, अभिनेत्री गीता बसरा हिच्याशी २९ ऑक्टोबर २०१५ रोजी जालंधरमध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी २ अपत्ये आहेत.

डोमेस्टिक क्रिकेट करिअर

हरभजन सिंगने वयाच्या १५ व्या वर्षी १९९५-९६ च्या १६ वर्षांखालील संघात पदार्पण केले. त्याने ४६ धावा देत ७ गडी आणि १३८ धावा देत ५ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे पंजाबने हरियाणा विरुद्ध नऊ गडी राखून विजय मिळवला. त्याने दिल्लीविरुद्धच्या पुढच्या सामन्यात ५६ धावा केल्या आणि त्यानंतर हिमाचल प्रदेश विरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात ७९ धावा देत तब्बल ११ गडी बाद केले.

हरभजनने १९९७ मध्ये रणजी करंडक स्पर्धेत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने दोन सामन्यांत ७५ धावा देत ५ आणि ४४ धावा देत ७ गडी बाद केले.

हरभजनने १९९८ मध्ये १९ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने सहा सामन्यांत ८ विकेटस घेतल्या. केनियाविरुद्ध खेळताना त्याने ५ धावा देत ३ गडी बाद केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

डोमेस्टिक क्रिकेटमधील आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर हरभजनची निवड झाली. त्याने आपले कसोटी पदार्पण तिसऱ्या कसोटीत केले. ऑस्ट्रेलियाविरुध्द तिसऱ्या कसोटी मध्ये तो फक्त ४ आणि ० धावा करू शकला. त्याला गोलंदाजीमध्ये सुद्धा काही असे यश मिळाले नाही, त्याला १३६ धावा देत फक्त २ विकेट्स मिळवता आल्या.

महत्वाचे टप्पे

आपल्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबातील एकुलता एक मुलगा म्हणून त्याला आपल्या कुटुंबाकडे सुद्धा लक्ष घालावे लागत होते. त्याने क्रिकेट सोडणे आणि ट्रक चालविण्याचा सुद्धा विचार केला होता. १९९७ मध्ये तो अतिशय खराब फॉर्म मध्ये होता.

श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळताना पाच सामन्यांमध्ये त्याला फक्त आठ विकेट्स घेता आल्या. अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला पण त्यात हरभजन ला ५७ धावा देत फक्त एक गडी बाद करता आला होता.

२००१ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मध्ये भारताचा महत्वाचा गोलंदाज अनिल कुंबळे जखमी झाला. कर्णधार सौरव गांगुलीने हरभजनला संघात समाविष्ट करण्याची मागणी केल्यावर त्याला परत संघात घेण्यात आले. हरभजनने पहिल्या कसोटी सामन्यात चांगली सुरुवात करत ८ धावा देत ३ गडी बाद केले. पण मॅथ्यू हेडन आणि ऍडम गिलख्रिस्ट यांनी प्रतिहल्ला करत फक्त ३२ शतकात १९७ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजय मिळविला.

ऑस्ट्रेलियाचा विजयी मालिका रोखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारताला म्हणावी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने १ बाद १९३ अशी धावसंख्या उभारली. अंतिम सत्रात रिकी पॉन्टिंग , गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्नसह पाच विकेट्स घेऊन हरभजनने ऑस्ट्रेलियाला २५२ धावांवर ७ गडी बाद करत रोखले. याच कसोटीत कसोटी हॅटट्रिकचा दावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. विजयासाठी मोठे आव्हान घेऊन उतरलेल्या भारताने खराब फलंदाजी केली, पण व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्यातील ३७६ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८४ धावांचे आव्हान दिले. हरभज सिंगने ४ गडी बाद करत हा सामना भारताला जिंकून दिला.

हरभजन सिंगने संपूर्ण मालिकेत ३२ विकेट्स घेतल्या. त्याला या कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर चा पुरस्कार देण्यात आला.

२००३ च्या क्रिकेट विश्वचषकात हरभजन सुद्धा होता. दहा सामन्यांमध्ये त्याने ११ बळी घेतले होते. त्याने कधीही एका सामन्यात दोनपेक्षा जास्त विकेट घेतल्या नव्हत्या आणि ४० पेक्षा जास्त धावा दिल्या नव्हत्या. अंतिम सामन्यात गांगुलीने क्षेत्ररक्षणाची निवड केली आणि आठ षटकांत ४९ धावा २ विकेट घेणारा हरभजन एकमेव भारतीय गोलंदाज होता. याउलट ऑस्ट्रेलियाने २ गडी बाद ३५९ धावा केल्या जो वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक स्कोअर होता. हा सामना भारताने 125 धावांनी हरला होता.

आयसीसी विश्वचषक ट्वेंटी-२० स्पर्धेत हरभजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन केले. त्याने भारताच्या सर्व सहा सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हरभजनने मायकेल क्लार्कला बोल्ड करत आपल्या सामन्याच्या १८ व्या षटकात केवळ तीन धावा देत सामना भारताच्या बाजूने झुकवला.

२००९ च्या विश्वचषक स्पर्धेत हरभजन हा भारतीय संघाचा सदस्य होता. परंतु भारताने सुपर ८ च्या फेरीत त्यांनी आपले तीनही सामने गमावले आणि त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला. हरभजनने त्या मालिकेत ५ गडी बाद केले.

२०१० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये हरभजनने सर्वाधिक १३ बळी टिपले होते. त्यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ६ गडी बाद करत भारताला ३-१ असा विजय मिळवीन दिला.

नोव्हेंबर २०१० मध्ये न्यूझीलंडच्या भारत दौर्‍यादरम्यान हरभजनने अहमदाबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात आपले पहिले कसोटी शतक झळकावले. त्याच्या ११५ धावांच्या मदतीने हा सामना भारताने जिंकला. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यानंतरच्या कसोटीत त्याने भारताच्या पहिल्या डावात नाबाद १११* धावा केल्या.

संघातून वगळले

आपल्या खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन दौर्‍यासाठी आणि २०१२ मध्ये बांगलादेशमधील आशिया चषक स्पर्धेसाठीही हरभजनची निवड झाली नाही. न्यूझीलंडविरुद्ध वर्षभराच्या अंतरानंतर त्याला कसोटी संघात परत घेण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०१२ च्या मालिकेनंतर हरभजनला कसोटी संघातून वगळण्यात आले. इंग्लंडमधील २०१७ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी हरभजनला पुन्हा भारतीय संघातून वगळण्यात आले. त्याने याला धोनी कारणीभूत आहे अशी टिप्पणी केली.

इंडियन प्रीमियर लीग कारकीर्द

हरभजनने दक्षिण आफ्रिकेत २००९ मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या संपूर्ण हंगामात १२ गडी बाद केले. तो या स्पर्धेत सर्वात किफायतशीर गोलंदाज होता.

2010 मध्ये आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात त्याने १७ बळी मिळवत सर्वात जास्त गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. अंतिम फेरीत त्याला कोणताही बाली मिळवता आला नाही आणि हा सामना त्यांनी हरला होता.

मुंबई इंडियन्सच्या प्रभावी गोलंदाजीचा हरभजन एक महत्वाचा भाग होता. २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा जेतेपदावर आपले नाव कोरले. हरभजन सिंग याचा भाग होता. त्याच्या नेतृत्वात २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने प्रथमच अंतिम सामना जिंकत चॅम्पियन्स लीग ३१ धावांनी जिंकली.

आयपीएल २०१२ चा हंगाम त्याच्यासाठी तितकासा यशस्वी नव्हता, परंतु कर्णधार असताना त्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले. २०१८ मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले. २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जबरोबरचा करार संपल्याचे हरभजन सिंगने जाहीर केले आहे. २०२१ च्या आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने हरभजन ला खरेदी केले आहे.

केलेले रेकॉर्डस् आणि मिळालेले सन्मान

  • कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय
  • भारताचा सर्वात यशस्वी ऑफस्पिनर, ४१७ विकेट
  • २००३ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित
  • २००९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

तर हा होता हरभजन सिंग यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास हरभजन सिंग यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Harbhajan Singh information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment