हार्दिक पंड्या माहिती मराठी, Hardik Pandya Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हार्दिक पंड्या यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Hardik Pandya information in Marathi). हार्दिक पंड्या यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी हार्दिक पंड्या यांच्यावर मराठीत माहिती (Hardik Pandya biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

हार्दिक पंड्या माहिती मराठी, Hardik Pandya Information in Marathi

हार्दिक पंड्या हा एक प्रसिद्ध भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे जो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गुजरात – बडोदा आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळतो.

[table id=19 /]

परिचय

हार्दिक पंड्या एक अष्टपैलू आणि वेगवान गतीने फलंदाजी करणारा खेळाडू आहे. हार्दिक पंड्या हा उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने वेगवान मध्यम गोलंदाजी करतो. त्याचा मोठा भाऊ क्रुणाल पांड्या हा सुद्धा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि तो सुद्धा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.

वैयक्तिक जीवन

हार्दिक पांड्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरात मध्ये सूरत येथे झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव हिमांशू पंड्या होते आणि त्यांचा कार घेण्यासाठी कर्ज देण्याचा एक छोटासा व्यवसाय होता. हार्दिक हा ५ वर्षाचा असताना त्यांनी आपला व्यवसाय बंद केला आणि ते वडोदरा येथे आले. हार्दिक हा लहानपनापासूनच एक चांगला खेळाडू होता. आपल्या मुलांना चांगल्या क्रिकेट प्रशिक्षण सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी दोघांना सुद्धा किरण मोरेच्या क्रिकेट अकॅडमिमध्ये क्रिकेटच्या ट्रेनिंग साठी प्रवेश घेऊन दिला.

हार्दिक हा फक्त पर्यंत शाळेत गेला, नववी मधून त्याने शाळा सोडल्यानंतर आपले सर्व लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले. हार्दिक हा आपल्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत लेग स्पिनर होता पण बडोद्याचे त्याचे प्रशिक्षक सनथ कुमार यांच्या आग्रहाने तो वेगवान गोलंदाजीकडे वळला. तेव्हापासून तो वेगवान गोलंदाज बनला.

हार्दिकने १ जानेवारी २०२० रोजी एक भारतीय वंशाची सर्बियन नर्तक आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविझशी लग्न केले. हार्दिक पंड्या याला एक अगस्त्य पंड्या नावाचा मुलगा सुद्धा आहे.

डोमेस्टिक करिअर

हार्दिक पंड्याने आपले डोमेस्टिक क्रिकेटमध्ये २०१३ मध्ये पदार्पण केले. तो त्या वर्षीपासून बडोदा क्रिकेट संघाकडून खेळू लागला. २०१२-२०१३ च्या सिजनमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यात बडोद्याच्या संघात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती .

जानेवारी २०१३ मध्ये त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना आपल्या नाबाद ८६ धावांच्या खेळीत आठ षटकार ठोकले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द

हार्दिक पंड्याने १६ ऑक्टोबर २०१६ रोजी न्यूझीलंडविरूद्ध खेळताना आपले एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात सामना जिंकणारी खेळी करत तो संदीप पाटील , मोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यानंतर एकदिवसीय सामन्यात तो सामनावीर म्हणून निवडलेला चौथा भारतीय खेळाडू ठरला . त्याने त्या सामन्यात खेळताना फलंदाज म्हणून ३२ चेंडूंत ३६ धावा केल्या.

२०१८ मध्ये त्याने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचे सलामीची फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर त्याने ४३ चेंडूत ७६ भावांची खेळी केली होती.

क्रिकइन्फोने त्यांची २०१७ च्या एकदिवसीय इलेव्हनमध्ये निवड केली होती.

कसोटी कारकीर्द

हार्दिकने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी फलंदाज म्हणून भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. परंतु स्टेडियममध्ये नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मुकावे लागले. जुलै २०१७ मध्ये झालेल्या श्रीलंकेच्या दौर्‍यावर त्याची निवड करण्यात आली. श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्यात हार्दिक पांड्याने आपले पहिले कसोटी शतक झळकावले आणि दुपारच्या जेवणापूर्वी आपल्या डावात कसोटी शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज म्हणून त्याने हा विक्रम नोंदविला. त्याने एका षटकात २६ धावा करत एका शतकामध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्याचा विक्रमदेखील नोंदविला आहे.

टी २० क्रिकेट कारकीर्द

हार्दिक पांड्याने २७ जानेवारी २०१६ मध्ये आपल्या अवघ्या वयाच्या २२ व्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना २ बळी मिळवून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. त्याने ख्रिस लिनला बाद करत आपला पहिला बाली मिळवला होता.

श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध रांची येथे झालेल्या दुसर्‍या टी-२० सामन्यात त्याने युवराज सिंग आणि एमएस धोनीच्या आधी येऊन फलंदाजी करताना १४ चेंडूत २७ धावा फटकावल्या. आशिया चषक २०१५ मध्ये पंड्याने १८ चेंडूत ३१ धाव करत भारताला बांगलादेशविरुद्ध एक सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेले होते. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पुढील सामन्यात त्याने ८ धावा देत ३ गडी बाद केले.

बांगलादेश विरुद्ध २३ मार्चला झालेल्या वर्ल्ड टी-२० सामन्यात हार्दिक पंड्याने शेवटच्या ३ चेंडूत दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि बांगलादेशला एका धावेने पराभूत केले होते. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ३४ धावा देत ४ बळी मिळवले. त्याची हि आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तसेच फलंदाजी करताना त्याने १४ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे एकाच सामन्यात तीसपेक्षा जास्त धाव आणि ४ गडी बाद करणारा हार्दिक हा पहिला भारतीय ठरला.

इंडियन प्रीमियर लीग कारकीर्द

२०१५ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या सिजनमध्ये मोसमात त्याने ८ चेंडूत २१ धावा फटकावल्या आणि मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला हरवले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

नंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सने अव्वल 4 संघांच्या यादीत रहावे म्हणून खेळताना त्याने ३१ चेंडूत ६१ धावा करत आपल्या संघाला एक चांगला विजय मिळवून दिला होता.

२०१७ मध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना शेवटच्या शतकात हार्दिकने गोलंदाज अशोक दिंडाविरुध्द ३० धावा फटकावून विक्रम केला होता. २०१८ च्या आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने रु. 11 कोटी रुपयांना विकत घेतले.

२०१९ हंगामात त्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने खूप चांगला खेळ केला. त्याने १६ सामने खेळत त्याने ४०२ धावा केल्या आणि १४ बळी घेतले. त्याच्या या धावसंख्येत त्याने २८ चौकार आणि २९ षटकार खेचले होते.

तर हा होता हार्दिक पंड्या यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास हार्दिक पंड्या यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Hardik Pandya information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment