आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इशांत शर्मा यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Ishant Sharma information in Marathi). इशांत शर्मा यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी इशांत शर्मा यांच्यावर मराठीत माहिती (Ishant Sharma biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.
इशांत शर्मा माहिती मराठी, Ishant Sharma Information in Marathi
इशांत शर्मा हा एक प्रसिद्ध भारतीय गोलंदाज आहे. इशांत शर्माने कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
[table id=17 /]
परिचय
आपल्या वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याची निवड करण्यात आली होती. २०११ मध्ये, १०० कसोटी विकेट्स घेणारा तो पाचवा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध इशांत शर्मा हा १०० एकदिवसीय विकेट मिळविणारा पाचवा वेगवान भारतीय खेळाडू ठरला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत इशांतने कसोटी क्रिकेटमधील आपला 300 वा गडी बाद केला. याच मालिकेत इशांतने आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता.
वैयक्तिक जीवन
इशांत शर्माचा जन्म २ सप्टेंबर १९८८ मध्ये देही येथे झाला. इशांत शर्माच्या वडिलांचे नाव विजय शर्मा आणि आईचे नाव ग्रिशा शर्मा आहे. इशांत चा जन्म आहे एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्याने आपले शिक्षण गंगा इंटरनॅशनल स्कूल येथून पूर्ण केले. दहावी नन्तर त्याने आपले सर्व लक्ष क्रिकेटकडे दिले. त्याने २०१६ मध्ये बास्केटबॉल प्लेअर प्रतिमा सिंग सोबत लग्न केले आहे.
डोमेस्टिक आणि प्रथम श्रेणी कारकीर्द
इशांत डोमेस्टिक क्रिकेट हा दिल्लीकडून खेळला. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांत १४ डावात ६८ बळी घेतले आहेत .
इशांतने २००६ साली इंग्लंड आणि २००६-०७ मध्ये पाकिस्तान या देशांचा १९ वर्षाखालील संघात खेळ दाखवला होता. त्याने भारतासाठी तीन युवा कसोटी आणि सहा युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. २००८ मध्ये आपल्या केलेल्या दमदार कामगिरीच्या आधारावर त्याला त्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने सर्वात जास्त पैसे देत खरेदी करत असलेला गोलंदाज म्हणून संघात घेतले होते.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
२००७ मध्ये इशांत शर्माची बांगलादेश दौर्यासाठी कसोटी संघात निवड झाली आणि त्याला वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलच्या जागी खेळण्यासाठी संधी देण्यात आली. त्याने दुसर्या कसोटीत एका निर्धाव षटकासह तीन षटके फेकली आणि बळी न घेता केवळ पाच धावा दिल्या. नंतर, त्याला जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये होणाऱ्या इंग्लंड दौर्यासाठी बोलावण्यात आले.
डिसेंबर २००७ मध्ये झहीर खान , आरपी सिंग आणि श्रीशांत यांच्या दुखापतीमुळे पाकिस्तानच्या भारत दौर्यादरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात इशांतची संघात पुन्हा निवड करण्यात आली. बंगळुरूमधील तिसर्या कसोटी सामन्यात शर्माने ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारताच्या संघात स्थान मिळाले.
२००८ मध्ये बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी दरम्यान मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटीत पुन्हा एकदा भारताने झहीर खान आणि आरपी सिंग या आपल्या मुख्य वेगवान गोलंदाजांना संघात घेत इशांतला बाहेर ठेवले. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात जखमी झहीर खानची जागा घेण्यासाठी पुन्हा इशांत शर्माची निवड करण्यात आली. तिसऱ्या कसोटी सामन्यात सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगला बाद करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने या मालिकेत ६ गडी बाद केले.
२००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, इशांत हा १६ गडी बाद करत मालिकेतील अग्रगण्य गोलंदाज ठरला होता. भारताने हि मालिका २-० ने जिंकल्यामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. त्याने मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगला तीन वेळा बाद केले होते.
२०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना आपल्या कारकिर्दीतील सर्वात चांगला खेळ दाखवत ७४ धाव देत ७ गडी बाद केले आणि भारताला ९५ धावांनी विजय मिळवून दिला. ऑगस्ट २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात शर्माने आपला २५० वा कसोटी बळी मिळवला. पाचव्या कसोटीत त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३ बळी घेतले आणि त्यानंतर कपिल देव यांच्या इंग्लंडमधील एका भारतीय गोलंदाजाकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने त्या स्पर्धेत दुसर्या क्रमांकाचा विकेट घेणारा म्हणून त्याने १८ गडी बाद केले.
ऑगस्ट २०१९ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्याने पहिल्या कसोटीत ५ गडी बाद करत हा विक्रम ९ वेळा केला. याच मालिकेच्या दुसर्या कसोटी सामन्यात इशांतने फलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठोकले. फेब्रुवारी २०२१ मध्ये इशांतने इंग्लंड विरुद्ध खेळताना आपला १०० वा कसोटी सामना पूर्ण केला. इशांत शर्मा हा १०० कसोटी सामने खेळणारा एकमेव चौथा भारतीय गोलंदाज ठरला.
आयपीएल कारकीर्द
इशांत शर्माने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक आयपीएल फ्रँचायझींकडून खेळला आहे. कोलकाता नाईट रायडर्स ते डेक्कन चार्जर्स ते सनरायझर्स हैदराबाद ते रायझिंग पुणे सुपरजायंट ते किंग्ज इलेव्हन पंजाब ते आता दिल्ली कॅपिटल्स.
२००८ मध्ये त्याने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला त्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने सर्वात जास्त पैसे देत खरेदी करत असलेला गोलंदाज म्हणून संघात घेतले होते. २०११ च्या आयपीएलच्या लिलावात इशांतला डेक्कन चार्जर्सने विकत घेतले होते. त्याने त्या वर्षी १२ सामन्यांत ११ बळी घेतले.
२०१८ मध्ये इशांत शर्मा किंग्ज इलेव्हन पंजाब कडून खेळला. डिसेंबर २०१८ त्याला दिल्ली संघाने विकत घेतले आणि आता तो दिल्ली संघाकडून खेळत आहे.
केलेले रेकॉर्डस् आणि पुरस्कार
- १०० कसोटी मिळवणारा पाचवा वेगवान गोलंदाज
- २०२० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित
तर हा होता इशांत शर्मा यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास इशांत शर्मा यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Ishant Sharma information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.