कष्टाचे फळ मराठी गोष्ट, Kashtache Fal Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कष्टाचे फळ मराठी गोष्ट (kashtache fal story in Marathi). कष्टाचे फळ मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी कष्टाचे फळ मराठी गोष्ट (kashtache fal story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

कष्टाचे फळ मराठी गोष्ट, Kashtache Fal Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

कष्टाचे फळ मराठी गोष्ट

खूप वर्षांपूर्वी एक गावात एक शेतकरी राहत होता. वयानुसार तो म्हातारा होत चालला होता. त्याला आता एकच चिंता सतावत होती. त्याला चार मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती, ती मुले कधीच काम करत नव्हती. त्यांनी आयुष्यभर फक्त आपल्या वडिलांच्या पैशावर मजा करणे एवढेच केले होते. त्यांना काम करणे माहीतच नव्हते.

म्हाताऱ्याच्या मनात नेहमी हीच चिंता लागून राहिलेली असे कि मी गेल्यानन्तर यांचे कसे होणार, यांची शेती कोण करणार, यांना कोण लग्न करण्यासाठी मुलगी देईल का आणि त्यांचा संसार कसा चालणार.

Kashtache Fal Story in Marathi

एके दिवशी शेकार्यकडे एक त्याचा मित्र आला होता. त्याने त्याला एक युक्ती सांगितली. म्हाताऱ्याने सर्व मुलांना बोलवले आणि सांगितले कि आता माझे दिवस जवळ आले आहेत आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.

मी खूप वर्षांपूर्वी आपल्या शेतात सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा पुरून ठेवला आहे. तुम्ही तो हंडा खणून काढा आणि सर्वांनी मिळून ते पैसे वाटून घ्या.

आता खूप दिवस झाल्यामुळे तो हंडा कुठे पुरला होता हे माझ्या लक्षात नाही. तुम्ही सर्व शेत खणून काढा आणि तो हंडा शोधा.

दुसऱ्या दिवशी त्या चारही मुलांनी सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. त्यांना आता खूप राग आला होता.

बाजूच्या शेतकऱ्याने त्यांना सांगितले आता शेत खणून झाले आहे तर यात आता धान्य पेरा, आता पावसाचे दिवस आहे आणि धान्य चांगले येईल. हे ऐकून त्यांनी तेथे धान्य पेरले.

त्यावर्षी पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना खूप उत्पन्न मिळाले. त्यांनी ते सर्व धान्य बाजारात जाऊन विकले व त्यामधून त्यांना खूप पैसे मिळाले.

आता आपल्या मुलांना बघून म्हातारा म्हणाला मी तुम्हाला याचा धनाबद्दल सांगत होतो ते हेच होते आणि जर तुम्ही अशीच मेहनत दरवर्षी केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन भेटत राहील.

तात्पर्य

आपण केलेल्या कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.

तर हि होती शेतकरी आणि त्याची आळशी मुले मराठी गोष्ट. मला आशा आहे की कष्टाचे फळ मराठी गोष्ट (kashtache fal story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment