लांडगा आला रे आला मराठी गोष्ट, Landga Ala Re Ala Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लांडगा आला रे आला मराठी गोष्ट (landga ala re ala story in Marathi). लांडगा आला रे आला मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी लांडगा आला रे आला मराठी गोष्ट (landga ala re ala story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

लांडगा आला रे आला मराठी गोष्ट, Landga Ala Re Ala Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला चांगले आई वडील, मित्र, पुस्तके यांची सोबत असेल आवश्यक आहे. लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

लांडगा आला रे आला मराठी गोष्ट

एका गावात एक मेंढपाळ मुलगा राहत होता. तो रोज आपल्या मेंढ्या चरायला घेऊन रानात जात असे. तो रोज मेंढरांना टेकडीवरच्या कुरणात घेऊन जायचा आणि चरायला सोडायचा.

Landga Ala Re Ala Story in Marathi

मेंढपाळ मुलगा आपले काम एकदम नीट करत होता. पण त्या सगळ्या ओळखीच्या मेंढ्यांना रोज त्याच जागी नेऊन चरायला गेल्याने तो कंटाळला होता. त्याला वाटले की फक्त आपल्या मनाचा आनंद घेण्यासाठी काहीतरी मस्करी करावी. घाबरलेल्या आवाजात तो मोठ्याने ओरडला लांडगा आला रे आला. लांडगा आला आहे मला मदत करा. लांडगा मेंढ्या खात आहे.

गावकरी शेतात काम करत होते. मेंढपाळाचा घाबरलेला आवाज ऐकून ते जे काही हातात होते जसे काठी, कुडाळ, फावडे घेऊन लांडग्याला मारण्यासाठी टेकडीकडे धावले.

पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की मेंढ्या आरामात चरत आहेत आणि मेंढपाळ मुलगा हसत आहे. लांडगा कुठे आहे? असे गावकरी रागाने म्हणाले. पण मेंढपाळ हसतच राहिला. त्याला खूप गम्मत वाटली.

त्याने दुसऱ्या दिवशी सुद्धा अशीच गम्मत केली, दुसऱ्या दिवशी सुद्धा गावकरी धावत आले पण त्यांना लांडगा काही दिसला नाही.

तिसऱ्या दिवशी मेंढपाळ मेंढ्यांना चरण्यासाठी डोंगराळ शेतात घेऊन गेला. तो झाडाखाली बसून बासरी वाजवत असताना त्याला गुरगुरण्याचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले तर काही अंतरावर एक खरोखर मोठा भयंकर लांडगा गुरगुरणाऱ्या मेंढ्याकडे जात होता.

मेंढ्यांनी एक भयानक लांडगा आपल्या दिशेने येताना पाहिला तेव्हा त्या इकडे तिकडे पळू लागल्या. मेंढपाळ मुलगा घाबरला. तो जोरात ओरडू लागला, लांडगा आला, लांडगा आला, मला मदत करा.

यावेळी तो खूप घाबरला होता. तो मदतीसाठी ओरडत होता. तो थरथर कापत आशेने गावाकडे पाहत होता. पण गावकऱ्यांना वाटलं की मेंढपाळ पोरं चेष्टा करत असेल. ते आले नाहीत.

जेव्हा लांडग्याने मेंढपाळ मुलाला भीतीने थरथर कापताना पाहिले तेव्हा त्याला समजले की आता कोणीच येणार नाही. लांडग्याने मेंढीची मान पकडली आणि बघता बघता ते मेंढीला घेऊन जंगलात पळून गेला. मेंढपाळ रडत राहिला.

मेंढपाळ मुलाने रडत रडत गावकऱ्यांकडे येऊन हि सर्व गोष्ट सांगितली. आपण केलेल्या कृत्याचा त्याला मनापासून पश्चाताप होत होता. गावकऱ्यांनी त्याला खूप फटकारले. मुलाने आपल्या मूर्ख कृतीबद्दल माफीही मागितली आणि वचन दिले की भविष्यात तो अशी मस्करी परत कधीच करणार नाही.

तात्पर्य

खोट्याच्या खऱ्या बोलण्यावरही लोक विश्वास ठेवत नाहीत.

तर हि होती लांडगा आला रे आला मराठी गोष्ट. मला आशा आहे की लांडगा आला रे आला मराठी गोष्ट (landga ala re ala story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment