नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सिंह आणि हुशार ससा मराठी गोष्ट (lion and clever rabbit story in Marathi). सिंह आणि हुशार ससा मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी सिंह आणि हुशार ससा मराठी गोष्ट (lion and clever rabbit story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.
सिंह आणि हुशार ससा मराठी गोष्ट, Lion and Clever Rabbit Story in Marathi
मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.
परिचय
लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.
सिंह आणि हुशार ससा मराठी गोष्ट
एका जंगलात एक शक्तिशाली सिंह राहत होता. तो अत्यंत निर्दयी होता आणि रोज इतर प्राण्यांची निर्दयीपणे हत्या करून त्यांना खात असे.
एके दिवशी सर्व प्राणी सिंहाकडे शरण गेले. ते सर्व प्राणी त्याला म्हणाले हे आमच्या राजा, तुम्ही दररोज आमच्यापैकी अनेकांना विनाकारण मारता. तुमची भूक भागवण्यासाठी दिवसातून एक प्राणी पुरेसा आहे. आम्ही आजपासून, आम्ही तुम्हाला दररोज आमच्यापैकी एक प्राणी स्वतःहून तुमचे भोजन म्हणून देत जाऊ. अशा प्रकारे, तुम्हाला शिकार करावी लागणार नाही आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा त्रास होणार नाही.
हे ऐकून सिंह त्यांच्या निर्णयाशी सहमत झाला. तो बोलला हे ठीक आहे, पण मी तुम्हाला ताकीद देतो, जर मला दररोज एक प्राणी मिळाला नाही तर मी तुमच्या प्रत्येकाला जिवंत सोडणार नाही.
अशा नंतर सर्व प्राण्यांनी कोणी कधी जाणार हे ठरवले. रोज एक प्राणी जेवण म्हणून सिंहाकडे पाठवला जात असे. त्यामुळे इतरांना सिंहाच्या हल्ल्याची कोणतीही भीती नसल्यामुळे सर्व प्राणी आनंदाने जंगलात फिरत होते.
असाच एक दिवशी एका सशाची पाळी आली. ससा खूप हुशार होता. त्याने विचार केला असे पण आपण मारणार आहे तर आरामात जाऊ. तो हळू हळू आरामात चालला होता.
वाटेत ससा एका विहिरीवर आला. त्याने विहिरीच्या काठावरून खाली डोकावले आणि जेव्हा त्याने स्वतःचे प्रतिबिंब पाहिले तेव्हा त्याला एक युक्ती सुचली.
ससा हळू हळू गुहेकडे निघाला. त्याने सिंहाला पाहिले, तर तो रागाने लालबुंद झाला होता. सिंह भुकेलेला आणि चिडलेला होता. तो दिवसभर त्याच्या अन्नाची वाट पाहत होता. त्याने आता सर्व प्राण्यांना ठार मारायचा विचार सुद्धा केला होता. तो असा विचार करत असताना, ससा सिंहाजवळ आला आणि नम्रपणे वाकला.
चिडलेला सिंह आता ओरडायला लागला आणि म्हणाला तू एक खूप लहान प्राणी आहेस. तू फक्त उशीराच नाही आलास तर आता बाकीच्या प्राण्यांच्या मृत्यूला सुद्धा घेऊन आला आहेस. मी आधी तुला मारून माझी भूक भागवीन, आणि मग बाकीच्या सर्व प्राण्यांना माझ्याशी असे केल्याबद्दल ठार करीन.
सशाने त्याला नम्रपणे उत्तर दिले, हे आमच्या राजा हा माझा दोष नाही किंवा इतर कोणत्याही प्राण्याचा दोष नाही. कृपया मला मारण्यापूर्वी माझे बोलणे आधी ऐकून घ्या. आज माझी पाळी असल्याने मी येत होतो. तसेच मी लहान असल्यामुळे आणि तुझी भूक भागवू शकणार नाही म्हणून माझ्याबरोबर आणखी चार ससे पाठवले होते.
वाटेत आम्हाला एक सिंह भेटला जो त्याच्या गुहेतून बाहेर आला आणि आम्हाला खाणार असे म्हणाला. आम्ही त्याला विनवणी केली की आम्ही दररोज वचन दिल्याप्रमाणे आमच्या राजाची भूक पूर्ण करणार आहोत.
तो गर्जना करत म्हणाला, मीच आता या जंगलाचा स्वामी आहे. आजपासून तुम्ही मला हे सर्व प्राणी देत जा, त्या तुमच्या राजाला मी आता मारून टाकतो. तुमचा राजा हा भित्रा आहे आणि जर नसेल तर त्याला सामर्थ्याच्या चाचणीसाठी माझे आव्हान त्याने स्वीकारावे. असे बोलून त्याने ४ सशांना बंदी बनवून ठेवले आणि मला पाठवले.
ससा विनम्रपणे म्हणाला, हेच कारण आहे की आम्ही पाच जणांपैकी फक्त मीच एका इथे आलो आहे. मी याच कारणासाठी उशीरा आलो आहे.
हे ऐकल्यावर सिंह आणखी चिडला. तो गर्जना करत म्हणाला, मला लगेच या ढोंग्याकडे घेऊन जा. मी त्याचा नाश करून त्यानंतरच माझा राग शांत होईल.
सशाने पटकन उत्तर दिले, हे राजा मी तुम्हाला आधीच सांगितले आहे कि हा सिंह खूप मोठ्या गुहेत राहतो. शिवाय, मी त्याला स्वतः पाहिले आहे, तो खूप मोठा दिसत होता.
सिंह म्हणाला तू घाबरू नकोस, मला आता घेऊन चल. नंतर सशाने सिंहाला त्याच्या विहिरीकडे नेले.
तिथे पोहचल्यावर, ससा विहिरीच्या दिशेने दाखवला आणि सिंहाला म्हणाला, इथेच या विहिरीत सिंह लपून बसला आहे.
मूर्ख सिंह विहिरीच्या काठावर उभा राहिला आणि त्याने खाली पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले. त्याला वाटले की खरेच कोणीतरी आत दुसरा सिंह लपून बसला आहे. त्याने सर्व पराक्रम आणि रागाने त्याच्या प्रतिबिंबावर गर्जना केली. विहिरीतून पुन्हा प्रतिध्वनी आली.
हे ऐकल्यावर सिंह चिडला आणि त्याने स्वतःच्या प्रतिबिंबावर हल्ला करण्यासाठी विहिरीत उडी मारली. तो खोल विहिरीच्या पाण्यात पडला आणि बुडाला.
सशाची योजना यशस्वीरित्या यशस्वी झाल्यामुळे तो खूप आनंदित झाला. त्याने इतर प्राण्यांकडे परत जाऊन काय घडले ते सांगितले.
इतर प्राण्यांनी सशाच्या हुशारीचे कौतुक केले.
तात्पर्य
संकटकाळात आपण आपल्या बुद्धीचा योग्य वापर केला तर कोणत्याही संकटाला आपण तोंड देऊ शकतो.
तर हि होती सिंह आणि हुशार ससा मराठी गोष्ट. मला आशा आहे की सिंह आणि हुशार ससा मराठी गोष्ट (lion and clever rabbit story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.