आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज कसा लिहावा (loan EMI kami karnyasathi arj in Marathi) माहिती लेख. कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख अशा सर्व लोकांसाठी उपयोगी आहे जे बँकेचे व्यवहार करतात.
तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याच्या काही कामासाठी कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज कसा लिहावा (loan EMI kami karnyasathi arj in Marathi) वाचून तसा अर्ज लिहून बँकेत देऊ शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये अर्ज उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज कसा लिहावा, Loan EMI Kami Karnyasathi Arj in Marathi
जर तुम्ही कर्ज घेतले असेल आणि काही कारणास्तव तुम्ही पूर्ण कर्जाचा हफ्ता भरू शकत नसाल. त्यानंतर, तुम्ही तुमच्या परिस्थितीबद्दल बँकेला कळवावे आणि त्यांना पत्राद्वारे कर्जाचा ईएमआय कमी करा, कर्जाचा हफ्ता कमी करा किंवा कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवा अशी विनंती करू शकता.
परिचय
बँकेला तुमची विनंती पटली असेल, तर ते तुमच्या कर्जाचा कालावधी कमी ईएमआयसह वाढवू शकतात. याला कर्जात बदल करणे असे म्हणतात. कर्ज पुनर्रचना पत्र लिहणे हा कर्जामध्ये बदल करण्याची विनंती करण्याचा एक औपचारिक मार्ग आहे.
शैक्षणिक कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज
प्रति,
शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
पुणे
विषय: शैक्षणिक कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज
आदरणीय सर/मॅडम,
नमस्कार, मी सचिन पाटील, तुमच्या बँकेतून मी शैक्षणिक कर्ज काढले असून मी मागच्या २ वर्षांपासून त्याचा नियमित हफ्ता भरत आहे. मला तुम्हाला हे सांगावेसे वाटते कि गेल्या काही महिन्यांपासून मी खूप अडचणींचा सामना करत आहे.
माझे वडील नुकतेच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाले आहेत आणि त्यांना दर महिन्याला २०००० रुपये खर्च येत आहे. हा सर्व खर्च भागवणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. सध्या मागचे ३ महिने मी खूप ठिकाणावरून पैसे गोळा करून माझा कर्जाचा हफ्ता भरला आहे. मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आता माझ्याकडे तुमच्या बँकेचा कर्जाचा हफ्ता भरणे हे अशक्य होऊन बसले आहे.
जोपर्यंत आम्ही आमच्या सध्याच्या परिस्थितीतून बरे होत नाही तोपर्यंत मी माझा दर महिन्याचा हफ्ता १०००० वरून ५००० करावा अशी विनंती करत आहे. सर्व काही ठीक झाल्यावर मी माझा नियमित कर्जाचा हफ्ता पुन्हा चालू करेन. मला आशा आहे की तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्याल आणि माझी विनंती मान्य कराल.
तुमच्या संदर्भासाठी मी खाली बँक खात्याचे तपशील दिले आहेत:
सचिन पाटील
मोबाईल नंबर: XXXXXXXXXX
कर्ज खाते क्रमांक: XXXXXXXXXX
आपला आभारी,
सचिन पाटील
शैक्षणिक कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज
प्रति,
शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
पुणे
विषय: गृह कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी पत्र
आदरणीय सर/मॅडम,
नमस्कार, मी सचिन पाटील, तुमच्या बँकेतून मी माझ्या नवीन घरासाठी कर्ज काढले आहे. मला तुमच्या बँकेने ३० लाख रुपये कर्ज २० वर्षासाठी दिले असून हे कर्ज मी नियमित रूपाने मागच्या ५ वर्षांपासून भरत आहे. मला तुम्हाला हे सांगावेसे वाटते कि गेल्या काही २ महिन्यांपासून मी खूप अडचणींचा सामना करत आहे.
२ महिन्यापूर्वी माझा ऑफिसवरून येथा एक लहान अपघात झाला होता. अपघात झाल्यापासून मी गेले २ महिने सुट्टीवर आहे. माझा पगार पूर्णपणे बंद आहे आणि अशावेळी मला तुमच्या बँकेचा कर्जाचा हफ्ता भरणे हे खूप अवघड होऊन बसले आहे.
जोपर्यंत मी नीट बरा होत नाही आणि नोकरीवर पुन्हा रुजू होत नाही तोपर्यंत माझा दर महिन्याचा हफ्ता थांबवावा किंवा कमी करावा अशी विनंती करत आहे. सर्व काही ठीक झाल्यावर मी माझा नियमित कर्जाचा हफ्ता पुन्हा चालू करेन. मला आशा आहे की तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्याल आणि माझी विनंती मान्य कराल.
तुमच्या संदर्भासाठी मी खाली बँक खात्याचे तपशील दिले आहेत:
सचिन पाटील
मोबाईल नंबर: XXXXXXXXXX
कर्ज खाते क्रमांक: XXXXXXXXXX
निष्कर्ष
तर हा होता कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज कसा लिहावा माहिती लेख. मला आशा आहे की आपणास कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख (loan EMI kami karnyasathi arj in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.