मराठी कोडे व त्याचे उत्तर, Marathi Puzzles With Answers

Marathi puzzles with answers – नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन मराठी कोडी व त्यांची उत्तरे (Marathi puzzles with answers).

मराठी कोडे व त्याचे उत्तर, Marathi Puzzles With Answers

कोडे: हिरवी पेटी एका काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली.
उत्तर: भेंडी

कोडे: हजार येती, हजार जाती, हजार बसती पारावर,
अशी नार ती जोराची, एकाच वेळी हजार घेती ऊरावर.
उत्तर: बस /ट्रेन.

कोडे: एक सोन्याची सुरी,
भुईत पुरी, आणि वर पटकार गमजा करी.
उत्तर: गाजर

Marathi Puzzles With Answers

कोडे: सुपभर लाह्या आणि त्यात एक रुपया
उत्तर: चंद्र आणि चांदण्या

कोडे: सगळे गेले रानात,
आणि एक झिपरी पोरगी घरात.
उत्तर: केरसुणी

कोडे: मुकूट याच्या डोक्यावर,
घातलाय जांभळा­ झगा अंगावर.
उत्तर: वांगे

कोडे: एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर आहे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?
उत्तर: सीताराम

कोडे: प्रश्न असा आहे कि उत्तर काय.
उत्तर: दिशा

कोडे: पुरूष असून सुद्धा पर्स वापरतो,
वेडा नसून सुद्धा सारखे कागद फाडतो.
उत्तर: कंडक्टर/ बस वाहक

कोडे: पाणी नाही, पाऊस नाही,
तरी रान कसे हिरवे,
कात नाही, चुना नाही,
तरी तोंड कसे रंगलेले.
उत्तर: पोपट

कोडे: पाटिल बुवा राम राम, तुमच्या दाढी मिशा लांब लांब
उत्तर: कणीस

कोडे: बाहेरून पांढरे पातेले पण आत पिवळा भात
उत्तर: अंडे

कोडे: दोन भाउ शेजारी, पण भेट नाही जन्मान्तरी
उत्तर: डोळे

कोडे: तिघे जण वाढायला आणि बाराजण जेवायला
उत्तर: घड्याळ

कोडे: तीन पायांची ठेवली आहे तिपाई, त्यावर बसला एक शिपाई
उत्तर: चूल आणि तवा

कोडे: तिखट, मीठ, मसाला आणि वर चार शिंगे कशाला
उत्तर: लवंग

कोडे: चार खंडांचे आहे एक शहर,
चार विहीरी त्यात नाही पानी, १८ चोर त्या शहरी आहे एक राणी
आला एक शिपाई, सगळ्यांना मारुन एका विहीरीत टाकी
सांगा काय आहे ?
उत्तर: कॅरम बोर्ड खेळ

कोडे: कोकणातुन आली एक नार,
तिचा पदर होता हिरवागार,
तिच्या­ काखेला आहे प्वार
उत्तर: काजू

कोडे: कोकणातुन आला एक रंगू कोळी,
त्याने आणली भिंगू चोळी,
शिंपीण म्हणते शिवू कशी,
परटीण म्हणते धुवू कशी,
आणि राणी म्हणते घालू कशी
उत्तर: कागद

कोडे: कोकणातुन आला एक भट ,
धर की आपट
उत्तर: नारळ

कोडे: कुट कुट काडी पोटात नाडी,
राम जन्मला हातजोडी
कृष्ण जन्मला हात जोडी
उत्तर: देव्हाऱ्यातील घंटी

कोडे: काळ्या रानात एक हत्ती मेला
त्याचा प्रुष्टभाग सगळ्यांनी ऊपसून नेला
उत्तर: कापुस

कोडे: काट्याकुट्याचा बांधला एक मोठा भारा,
कुठे जातोस रे ढबुण्या पोरा
उत्तर: फणस

कोडे: कांड्यावर कांडी
आहेत सात कांडी,
त्या वर ठेवली समुद्राची अंडी
उत्तर: ज्वारीचे कणीस

कोडे: एवढस कार्ट
घर कसं राखतं
उत्तर: कुलूप

कोडे: इथेच आहे पण कधीच दिसत नाही
उत्तर: वारा

कोडे: आहे मला तोंड परंतु मी काहीच खात नाही,
दिसते मी झोपलेली, पण असते सारखी पळतही,
माझ्याशिवाय तुमचे, जगणेच शक्य नाही
मी कोण काढा शोधुन,नाहीतर हेच म्हणा माझ्या मागून
उत्तर: नदी

कोडे: आटंगण पटंगण
लाल लाल रान,
अन् बत्तीस पिंपळांना
एकच पान
उत्तर: तोंड

तर हि होती काही मराठी कोडी आणि त्यांची उत्तरे (Marathi puzzles with answers). जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment