मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध, Mi Pahilela Railway Apghat Marathi Nibandh

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध (mi pahilela railway apghat Marathi nibandh). मी पाहिलेला रेल्वे अपघात या विषयावर लिहलेला हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध (mi pahilela railway apghat Marathi nibandh) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध, Mi Pahilela Railway Apghat Marathi Nibandh

रेल्वे आणि अपघात हे सारखे होताच असतात. त्याला अनेक कारणे आहेत जसे कि सिंगल यंत्रणा काम न करणे, ड्राइवर चा दोष, खराब वातावरण, पाऊस इत्यादी.

परिचय

गेल्या काही महिन्यांत अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. या अपघातांमुळे जीवित आणि मालमत्तेचे झालेले नुकसान प्रचंड आहे. दिवाळीच्या आधी १० दिवस कोकणकन्या एक्सप्रेसला पनवेल जवळ अपघात झाला. ही घटना पहाटेच्या वेळी घडली.

अपघात झाला हे कसे समजले

पनवेल जवळ दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याने, एक मोठा आवाज झाला. या आवाजाने आम्ही बिल्डिंग मधून बाहेर आलो आणि इकडे टाके बघू लागलो पण काही समजले नाही. नंतर लोकांनी सांगितले तेव्हा समजले असे झाले आहे. दोन गाड्यांची टक्कर झाल्याचे कळले. लोक सर्व लगेच जमा झाले आणि अपघाताच्या ठिकाणी धावले.

मी पाहिलेला रेल्वे अपघात

अपघातस्थळीचे दृश्य अतिशय दुःखद आणि दयनीय होते. कोकणकन्या एक्सप्रेसचे इंजिन पूर्णपणे तुटून गेले होते. दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. गाड्यांमधील प्रवाशांना सुद्धा गंभीर जखमा झाल्या होत्या.

रेल्वे अपघातात झालेले नुकसान

काही जण गंभीर जखमी झाल्यामुळे बेशुद्ध झाले होते, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांचे मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला.

Mi Pahilela Railway Apghat Marathi Nibandh

काहींचे हातपाय गमावले होते तर काहींना प्रचंड रक्तस्त्राव होत होता. सर्व सामान हे विखुरलेले होते. अपघाताच्या ठिकाणी प्रवाशांचे सामान पसरलेले होते.

रेल्वे अपघातात लोकांनी केलेली मदत

जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. व्हॅन आणि रुग्णवाहिका बचावासाठी आल्या. या अपघातातील पीडितांना लवकरच प्रथमोपचार देण्यात आले. काही प्रवाशांना रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले तर काही गंभीर जखमी नसलेल्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.

रेल्वे अपघाताच्या ठिकाणाजवळ राहणाऱ्या लोकांनी अन्न आणि औषधेही आणली होती. लोक त्यांचे नातेवाईक आणि मित्र ओळखण्यासाठी अनेक ठिकाणाहून आले होते. संपूर्ण घटनास्थळ पीडित, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते आणि पीडितांचे नातेवाईक यांनी भरलेले होते. हे सर्वात दुःखद आणि हृदयद्रावक दृश्य होते.

रेल्वे अपघाताचे कारण

नंतर लोकांनी अपघाताचे कारण विचारले. खराब हमामनामुळे आणि चुकीचा सिग्नल दिल्यामुळे अपघात झाल्याचे समजले. आमच्या परिसरातील हा सर्वात दयनीय आणि विनाशकारी अपघात होता.

निष्कर्ष

रेल्वे हि मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते पण कधी कधी हीच रेल्वे अपघात झाला तर विनाश सुद्धा घडवून आणते. जरी यात तिची चूक नसली तरी कधीकधी अशा अपघातांना सामोरे जावे लागते.

मी तो अपघात पहिल्यापासून सुन्न झालो होतो. ८ दिवस मला नेहमी तेच लोक दिसत होते. रेल्वे अपघात होऊ नये हे खूप महत्वाचे आहे आणि सर्वांनी अपघात झालाच तर सर्व अपघात ग्रस्तांना मदत केली पाहिजे.

तर हा होता मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास मी पाहिलेला रेल्वे अपघात हा मराठी माहिती निबंध लेख (mi pahilela railway apghat Marathi nibandh) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment