मी पाहिलेली आग मराठी निबंध, Mi Pahileli Aag Marathi Nibandh

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी पाहिलेली आग या विषयावर मराठी निबंध (mi pahileli aag Marathi nibandh). मी पाहिलेली आग या विषयावर लिहलेला हा मराठी निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मी पाहिलेली आग या विषयावर मराठी निबंध (mi pahileli aag Marathi nibandh) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

मी पाहिलेली आग मराठी निबंध, Mi Pahileli Aag Marathi Nibandh

मी पाहिलेली आग मराठी निबंध: उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आमची शाळा बंद होती. मी माझ्या मित्रांसोबत गावी फिरायला आलो होतो. गावात जवळच औद्योगिक क्षेत्र होते आणि खूप कंपन्या होत्या.

Mi Pahileli Aag Marathi Nibandh

एका मोठ्या कंपनीच्या समोरून जात असताना अचानक मला आग, आग असे ओरडताना लोक दिसू लागले, आग विझवणारी फायर ब्रिगेडच्या गाडीचा सायरन ऐकू आला.

मी मागे वळून पाहिले असता मला एका उंच इमारतीतून धुराचे लोट दिसले. माझे सर्व मित्र तेव्हा इमारतीच्या दिशेने धावले. अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि लोक मदतीचा हात पुढे करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत होते. काही लोक इमारतीच्या छतावर चढले होते. ते इतके गरम होते की छतावर पाय ठेवता येत नव्हते.

कारखाण्याच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काही लोक अडकले होते. आगीचे लोट त्यांच्या जवळ येऊ लागल्याने ते घाबरले. त्यातील एकाने खिडकीतून उडी मारली. सुदैवाने खाली असलेल्या लोकांनी गाद्या ठेवल्या असल्यामुळे किरकोळ जखमांसह तो बचावला.

आग लागलेल्या इमारतीच्या बाजूला एक छोटी इमारत आहे. काही तरुणांनी दोन्ही इमारतींच्या मध्ये क्रेन आणली आणि शिडीच्या मदतीने पूल बनवला. तेव्हा त्यांनी अडकलेल्या व्यक्तींना पुलावरून सुरक्षितपणे चालण्यास मदत केली.

जवळजवळ पन्नासहून अधिक लोकांना दुसऱ्या इमारतीमध्ये सुरक्षितपणे आणण्यात आले.

आगीची बातमी समजताच जिल्हाधिकारी आणि त्यांचे एक पथक आले. वर अडकलेल्या लोकांना क्रेनमधून वाचवण्यात आले. एक पोलीस अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता इमारतीच्या टेरेसवर जाऊन २ अडकलेल्या लोकांना सुखरूप घेऊन आला.

सुमारे १०० एक लोकांचे प्राण वाचले होते पण जोरदार वाऱ्याने आग अधिक चालली होती. सर्व लोक बाहेर आल्यानंतर अग्निशमन दलांनी पुन्हा आपले काम करण्यास सुरुवात केली.

तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व मशीनरी जळून राख झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पन्नासहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हे इतके भयानक दृश्य होते की मी कधीही विसरू शकणार नाही.

तर हा होता मी पाहिलेली आग या विषयावर मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास मी पाहिलेली आग हा निबंध माहिती लेख (mi pahileli aag Marathi nibandh) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment