मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध, Mi Pahileli Circus Marathi Nibandh

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी पाहिलेली सर्कस या विषयावर मराठी निबंध (mi pahileli circus Marathi nibandh). मी पाहिलेली सर्कस या विषयावर हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मी पाहिलेली सर्कस या विषयावर मराठी निबंध (mi pahileli circus Marathi nibandh) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध, Mi Pahileli Circus Marathi Nibandh

मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध: गेल्या महिन्यात प्रसिद्ध रॉयल सर्कस आमच्या गावी आली होती. सर्कसच्या मालकांना शहराबाहेर आमचे शाळेचे मैदान भाड्याने मिळाले होते. संपूर्ण मैदान त्यांनी छताने झाकले होते.

Mi Pahileli Circus Marathi Nibandh

संपूर्ण मैदानावर काही वेगवेगळे विभाग केले होते, काही प्राण्यांसाठी होते तर काही कामगारांसाठी होते. सर्कस दाखवण्यासाठी एक प्रचंड तंबू तयार केला होता.

मी आणि माझा भाऊ आत गेल्यावर मला वाघ, हत्ती आणि इतर प्राण्यांच्या चित्रांनी रंगवलेले प्रचंड दरवाजे दिसले. संपूर्ण मैदान हे दिव्यांनी उजळले होते. मी आत प्रवेश केला. लोकांना बसायला अनेक जागा होत्या. सर्व जागा लोकांनी भरून गेल्या होत्या. पुरुष, महिला आणि मुले उत्सुकतेने शो सुरू होण्याची वाट पाहत होते. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरु झाला.

बँड वाजू लागल्यावर एक रिंगमास्टर एका वाघाला घेऊन आला. रिंगमास्टर म्हणजे तास वाघ करू लागला. रिंगमास्टरने सांगितल्याप्रमाणे वाघ स्टुलावर पाय ठेवुन सर्वाना सलाम देऊ लागला. वाघ झाला कि सिंह हत्ती सुद्धा प्राणी आणेल गेले. एक हत्ती त्याच्या मागच्या पायांवर उभा होता. आणखी एक हत्ती एका माणसाच्या छातीवर ठेवलेल्या फळीवरुन चालत होता तर हत्तींपैकी एक रिंगणात फिरत होता. अस्वले सायकल चालवत होती.

प्राण्यांचा कार्यक्रम झाला कि रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेली मुले मुली नाचत येऊन प्रेक्षकांना अभिवादन करू लागली. सर्व मुलींनी गोल गोल फिरत आणि उंच दोरीवरून चालत सर्वांना खुश केले. रंगबिरंगी पोषाख केलेले विदूषक मध्येच येऊन आपल्या वेगवेगळ्या नकला करून सर्वांना हसवत होते.

यांनतर सुरु झाला उंच झुल्यावरून इकडून तिकडे उद्या मारण्याचे कौशल्य. एवढ्या उंचीवरून सहजपणे इकडून तिकडे उद्या मारताना पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होऊन श्वास रोखून हा खेळ पाहत होते.

यानंतर आम्ही “मौत का कुआ” बघायला गेलो. यात २ बाईकस्वार खूप वेगाने बाईक चालवत होते आणि एका गोलाकार केलेल्या भागात आपली कौशल्ये दाखवत होते.सर्कस पाहता-पाहता कधी आमचे तीन चार तास गेले ते आम्हला कळले सुद्धा नाही. सर्कस हि एक प्रकारे शिस्तबद्ध मानवी कलाकृती आहे. थोडीशी चूकसुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. मी घरी आलो तरी मला अजून सुद्धा सर्कस आठवत होती. आता पुढच्या वर्षी कधी पुन्हा सर्कस आली कि मी नक्की बघायला जाणार असे आताच मी ठरवले आहे.

तर हा होता मी पाहिलेली सर्कस या विषयावर मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास मी पाहिलेली सर्कस हा निबंध माहिती लेख (mi pahileli circus Marathi nibandh) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment