मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट, Mungi ani Kabutar Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट (nila kolha story in Marathi). मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट (nila kolha Story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट, Mungi ani Kabutar Story in Marathi

एका मुंगीला खूप तहान लागली होती म्हणून ती बाजूला असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि मुंगी पाण्यात पडली. पाण्यात पडताच मुंगी बुडू लागली. हे जवळच शेजारच्या एका झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले. बुडणाऱ्या मुंगीची पाहून कबुतराला मुंगीची दया आली.

Mungi ani Kabutar Story in Marathi

त्याने मुंगीला वाचवण्याचे ठरवले. पटकऩ त्याने झाडाचे एक पान मुंगीजवळ फेकले. मुंगी हळूहळू त्या पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती पानावर तरंगत तरंगत काठावर पोहोचली. आपले प्राण वाचवले म्हणून मुंगीने कबुतराचे आभार मानले.

तेवढ्यात मुंगीला जंगलात एक शिकारी दिसला. तो कबुतराला पकडण्यासाठी आला होता. शिकारी कबुतराला पकडनार आणि कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगीने फासेपारध्याच्या पायाला जोरात चावा घेतला.

आपल्या पायाला मुंगी चावल्यामुळे तो खूप जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकताच कबुतर सावध झाले व उडून गेले. अशा प्रकारे कबुतराने मुंगीला केलेल्या मदतीचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले.

तात्पर्य: आपण लोकांना केलेली मदत कधीच वाया जात नाही.

तर हि होती मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट (nila kolha story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

6 thoughts on “मुंगी आणि कबुतर यांची गोष्ट, Mungi ani Kabutar Story in Marathi”

    • खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशाच कमेंट्समुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असते.

      Reply

Leave a Comment