मूर्ख गाढव गोष्ट, Murkh Gadhav Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मूर्ख गाढव हि गोष्ट (Murkh Gadhav story in Marathi). मूर्ख गाढव हि गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी मूर्ख गाढव हि गोष्ट (Murkh Gadhav story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

मूर्ख गाढव गोष्ट, Murkh Gadhav Story in Marathi

एका गावात एक मिठाचा व्यापारी राहत होता. त्याच्याकडे त्याने एक गाढव पाळले होते. तो रोज आपल्या गाढवाच्या पाठीवर मिठाचे ओझे टाकत असे आणि आणि ते पोते नंतर बाजारात जाऊन विकत असे. त्यांना त्या बाजारात जाण्यासाठी एक लहान ओढा लागत असे, रोज त्यांना ओढा पार करावा लागत असे.

Murkh Gadhav Story in Marathi

एक दिवस असेच ओढा पार करत असताना गाढवाचा पाय पाण्यात चालताना दगडावरून घसरतो आणि गाढव पाण्यात पडते. गाढव पाण्यात पडताच खूप मीठ पाण्यात विरघळून जाते. व्यापारी त्याला उठविण्यास मदत करतो पण खूप प्रमाणात मीठ विरघळून गेल्यामुळे आता गाढवाला खूप हलके हलके वाटत होते. गाढव खूप आनंदी झाले आणि रमत गंमत त्याने बाजाराची वाट धरली.

आता गाढवाला कळून चुकले कि पाण्यात पडले कि आपले ओझे कमी होते. रोज गाढव मुद्दाम पाण्यात पडू लागले आणि आपले ओझे कमी करून घेऊ लागले. गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून व्यापाऱ्याला समजले कि गाढव आता आपल्याला रोज असाच फसवत आहे. त्याने गाढवाला चांगलाच धडा शिकवायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर मिठाचे ओझे न ठेवता कापसाचे ओझे ठेवले. गाढव नेहमीप्रमाणे ओढा आला कि मुद्दाम पाण्यात पडले. गाढव पाण्यात पडताच व्यापाराने त्याला उठण्यास मदत केली. गाढवाला वाटले नेहमीप्रमाणे ओझे हलके होईल पण झाले उलटेच.

व्यापारी त्याला उठवण्यास मदत करतो पण गाढवाला काही उठताच येत नाही. कारण कापसाने पाण्यात पडल्याने सर्व पाणी शोषून घेतलेले असते. त्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी खूप जड झालेले होते. व्यापाऱ्याने हसत हसत गाढवाकडे बघितले. गाढवाला सुद्धा कळून चुकले कि आपल्याला व्यापाऱ्याने चांगलीच अद्दल घडवली आहे. गाढव त्या दिवशी बाजारात जाता जाता एकदम रडकुंडीला आले. अशा प्रकारे गाढवाला त्याच्या आळशीपणाबद्दल चांगलीच शिक्षा मिळाली.

तात्पर्य – आपण नेहमी आपल्या कामाशी प्रामाणिक राहावे.

तर हि होती आळशी गाढव हि गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला मूर्ख गाढव हि गोष्ट (Murkh Gadhav story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment