नागपंचमी सण मराठी माहिती, Nag Panchami Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाग पंचमी सणावर मराठी निबंध (Nag Panchami information in Marathi). गुढी पाडवा वर लिहिलेला हा मराठी निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी नाग पंचमी मराठी माहिती (essay on Nag Panchami in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

नागपंचमी सण मराठी माहिती, Nag Panchami Information in Marathi

नाग पंचमी उत्सव श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात पंचमीला साजरी केली जाते. या दिवशी नाग देवताची पूजा केली जाते. हिंदू धर्माच्या मते, नाग हे देवाचे रूप आहे. म्हणूनच या दिवशी लोक नागाची पूजा करतात.

असा विश्वास आहे की जे या दिवशी सर्पाची उपासना करतात त्यांना कधीही साप नुकसान करत नाही. सर्पाच्या चाव्यामुळे तो कधीही मरत नाही.

सर्पाची काही नावे – अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, पंगल, शंखपाल, धृतराष्ट्र, कालिया, तक्षक, शंखपाल. नाग पंचमी दिवशी सर्पाची पूजा करणाऱ्या व्यक्तीचे घर नेहमीच संपत्तीने भरलेले असते.

नाग पंचमी संबंधित कथा

नाग पंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत. एकेकाळी लीलाधर नावाचा एक शेतकरी होता ज्याला तीन मुलगे आणि एक मुलगी होती. एक दिवस सकाळी तो शेतात नांगर चालवत असताना त्याच्या नांगराखाली येऊन एका सापाचा मृत्यू झाला. आपल्या मुलांचा मृत्यू पाहून नाग देवता यांना खूप राग आला आणि साप आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी गेला.

Nag Panchami Information in Marathi

रात्री शेतकरी व त्याचे कुटुंब झोपलेले असताना सर्पाने शेतकरी, त्याची बायको व मुले यांना चावा घेतला आणि सर्व मरण पावले. शेतकऱ्याच्या मुलीने सर्पाला काहीच केले नव्हते म्हणून सापाने तिला दंश केला नाही.

दुसऱ्या दिवशी पुन्हा साप शेतकऱ्याच्या मुलीला दंश करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्याच्या घरी गेला. सापाला पाहून शेतकऱ्याच्या मुलीने त्याच्या समोर एक दुधाने भरलेले भांडे ठेवले आणि हात जोडून सापाची माफी मागितली. तिने आपल्या आई वडिलांना माफ करावे यासाठी विनवणी केली.

हे सर्व बघून नाग देवता खुश झाली आणि तिने सर्वांना जीवन दिले. त्याशिवाय नाग देवतेने असा आशीर्वाद दिला की श्रावण शुक्ल पंचमीची जो कोणी उपासना करेल त्याच्या सर्व पिढ्या सुरक्षित राहतील. तेव्हापासून नाग पंचमीवर सापाची पूजा केली जात आहे.

अजून एक आख्यायिका आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. तेव्हापासूनच नागपूजा प्रचारात आली असे काही लोक म्हणतात.

नाग पंचमी साजरा करण्याची पद्धत

या दिवशी सकाळी आंघोळ करुन स्वच्छ कपडे घालून पूजा केली जाते. पूजा करण्याचे ठिकाण भिंतीवर गेरुद्वारे बनविलेले आहे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ नाग रंगविला जातो आणि त्याची पूजा केली जाते.

नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात हा उपवास करण्यामागे एक कथा आहे. प्राचीन काळात एक सत्येश्वरी नावाची एक देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता. आपल्या भावाच्या अशा अकाली जाण्याने सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे आणि प्रत्येक संकटातून त्याचे रक्षण व्हावे यासाठी या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात. सत्येश्वरीला आपला भाऊ हा एका नागदेवतेच्या रूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागदेवतेच्या रूपाला आपला भाऊ मानले. त्यावेळी नागदेवतेने तिला असे वचन दिले की, जी बहीण या दिवशी माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे मी सदैव रक्षण करेल. त्यामुळेच सर्व स्त्रिया या दिवशी नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करतात.

नाग पंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया आणि मुली नागदेवतेची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येतो. शहरी भागात शक्यतो स्त्रिया नागदेवतेचा फोटो घरामध्ये लावून त्याची पूजा करतात. नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

गावातील स्त्रिया या दिवशी सर्वजणी एकत्र मिळून पारंपरिक वेशभूषा करून नागदेवतेच्या वारुळाजवळ जातात आणि नागदेवतेची दूध वाहतात. नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी स्त्रिया व मुली झाडांना झोके बांधून झोके घेऊन आपला आनंद व्यक्त करतात. सर्वजणी फुगड्या खेळतात, हातात फेर धरून नागपंचमीची गाणी म्हणतात.

नाग पंचमीच्या दिवशी काय करू नये

नाग पंचमीदिवशी शेतकरी कोणतेही काम करत नाहीत. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये असे काही नियम आहेत. हे सर्व नियम आज सुद्धा पाळले जातात.

आपण काय करावे

भारतीय संस्कृतीत सापांना खूप महत्त्व आहे. साप मारले जातात आणि व्यावसायिक फायद्यासाठी विकले जातात. सापाची कातडी, विष इ. वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जातात. हेच कारण आहे की सरकार आणि वन्य, प्राणी खात्याद्वारे साप पकडणे, त्यांना विकणे प्रतिबंधित आहे. याशिवाय सरकार साप आणि इतर प्राण्यांचेही संरक्षण करण्यासाठी, त्यांना जीवन देण्यासाठी अनेक उपाय आणि सतत प्रयत्न करत असते.

नाग पंचामीच्या या पवित्र दिवशी आपण सर्प जाती वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे आणि सर्पाची कातडी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही उत्पादनाचा आपण वापर करणार नाही असा पूर्ण संकल्प करून हा उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

एवढेच नव्हे तर आपण सर्प आणि सर्प जाती कशा सुरक्षित ठेवता येतील याचा विचार केला पाहिजे. आपल्याला जर कुठे साप आढळून आला तर त्याला सर्पमित्रांच्या मदतीने अभयारण्यात किंवा जंगलाच्या ठिकाणी सोडावे.

आपण प्रवास करत असताना आपल्या गाडीखाली साप येऊन त्याचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी.

सर्पमित्रांकडून शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घ्यावे, सापांविषयीच्या लोकांमध्ये जनजागृती करावी जेणेकरून लोक सुद्धा सापाला आपला मित्र मानतील.

तर हा होता नाग पंचमी सणावर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास नाग पंचमी मराठी माहिती निबंध (essay on Nag Panchami in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment