Nawazuddin Siddiqui slams celebrities posting Maldives vacation pictures – दिवसेंदिवस कोरोना आपला विळखा अजून घट्ट करत असताना शनिवारी मुंबईत ५,८८८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. याच महिन्यात ४ एप्रिल रोजी सर्वाधिक ११,१६३ कोव्हीड रुग्णांची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत मुंबईची आकडेवारीही २० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या आठवड्यात नोंदविलेल्या गेलेल्या रुग्णामध्ये दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या दर १८ टक्क्यावरून १५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
याच दरम्यान मुंबईला आपली जन्मभूमी, कर्मभूमी मानणाऱ्या बॉलीवूडमधील खूप अभिनेते आणि अभिनेत्री यांनी देश कोरोनाच्या संकटात असताना बाहेर देशात जाऊन सुरक्षित राहण्यात धन्यता मानली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सारा अली खान, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुट्टीसाठी मालदीवला जाणे पसंत केले आहे आणि तिकडे करत असलेल्या मौज मजेचे फोटो सुद्धा टाकायला ते विसरले नाहीत.
विदेशी सुट्टीची हि सर्वे छायाचित्रे, ते करत असलेली मौजमजा पाहून चाहत्यांनी त्यांनी टाकलेल्या छायाचित्रांवर आपला राग व्यक्त केला आहे. जेव्हा कोव्हीड सर्व देशभर आपले फासे टाकत असताना, देशभरातील खूप लोक त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लढा देत असताना हे असंवेदनशील लोक सर्व काही विसरून आपल्याच जगात रमून गेल्याने अनेकांनी त्यांना फटकारले.
बॉलीवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सेलेब्रिटींना त्यांची छायाचित्रे शेअर करताना लाज कशी वाटली नाही म्हणून टिप्पणी केली. ते पुढे म्हणाले, ते मोठे लोक आहे, त्यांना दुसरे काय बोलणार? मानवतेसाठी कृपया या सुट्ट्या बाजूला ठेवा. सर्वांना त्रास होत आहे. कोव्हीडची प्रकरणे वाढत आहेत. एक समुदाय म्हणून ज्या भारतात आपण मनोरंजन करीत आहोत त्या सर्वांची आज आपली गरज आहे. सुट्टीसाठी बाहेरच्या देशात जाण्याची शक्यता नाकारतांना ते सध्या आपल्या कुटुंबासमवेत आपल्या मूळ गावी बुधाना येथे असून त्यांनी आपल्याच गावाला मालदीव म्हटले आहे.