निळ्या कोल्ह्याची गोष्ट, Nila Kolha Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे निळ्या कोल्ह्याची गोष्ट (nila kolha story in Marathi). निळ्या कोल्ह्याची गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी निळ्या कोल्ह्याची गोष्ट (nila kolha Story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

निळ्या कोल्ह्याची गोष्ट, Nila Kolha Story in Marathi

एका जंगलामध्ये एक लबाड कोल्हा राहत होता. एके दिवशी भूक लागली असताना तो एका गावात शिरला. गावात त्याला काही कुत्र्यांनी बघताच सर्व कुत्रे त्याच्या मागे लागले. लांडगा आपला स्वत: चा जीव वाचवण्यासाठी वाट मिळेल तिकडे पळू लागला. कुत्री जोरात धावत त्याचा पाठलाग करीत होती.

जीवाच्या आकांताने धावणारा कोल्हा आता गावाच्या टोकाला राहणाऱ्या एका घराजवळ जाऊन पोहचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या एका धोब्याचे होते.

Nila Kolha Story in Marathi

त्या धोब्याचे आणलेल्या कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या टाकीत भरपूर नीळ आणि पाणी एकत्र करून ठेवले होते.

कोल्हा दुसरा कोणताच वाचण्याचा मार्ग शिल्लक नसल्यामुळे धोब्याच्या घरात शिरला आणि त्याने सरळ घरात उडी मारली. कोल्ह्याने उडी मारताच तो निळीच्या टाकीत पडला. लांडगा घाबरला पण त्या भांड्यात बराच वेळ लपून बसला. त्याचा पाठलाग करणारी कुत्री त्याचा शोध घेत राहिली आणि थोड्या वेळाने निघून गेली.

सकाळ होताच कोल्ह्याने आधी घराबाहेर बघितले तर त्याला कोणीच दिसले नाही, तो घराबाहेर पडला आणि जंगलात पळून गेला. आपण निळीच्या टाकीत उडी मारल्यामुळे आपला रंग हा पूर्णपणे निळा झाला आहे हे त्याला माहितच नव्हते. कोल्हा जंगलात जाताच त्याला बघून अनेक प्राणी घाबरून पळून गेले. असा निळ्या रंगाचा प्राणी याआधी जंगलात त्यांनी बघितला नव्हता, ते असा प्राणी प्रथमच बघत होते. कोल्ह्याला सुद्धा काहीच समजत नव्हते कि हे मला मारायला टपून असलेले सगळे प्राणी आपल्याला का घाबरत आहेत?

चालत चालत तो एका नदीजवळ गेला. नदीमधील पाण्यात त्याने स्वत:चे प्रतिबिंब पाण्यात बघितले. त्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. आपले स्वत:चे निळे प्रतिबिंब बघून आता त्याला समजले होते कि जंगलातील सर्व प्राणी आपणास का घाबरत आहेत. त्याने या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले.

त्याने दुसऱ्या दिवशी सर्व प्राण्यांना बोलावले आणि मी या जंगलाचा राजा आहे असे घोषित केले. सर्व घाबरलेल्या प्राण्यांनी मान्य केले. तेव्हापासून कोल्हा म्हणेल तसे होऊ लागले, तो म्हणेल ते त्याला खायला मिळू लागले. त्याचे दिवस एकदम मजेत चालले होते.

अशाच एका रात्री जंगलातले काही कोल्हे कळपाने एकत्र आले आणि जोरजोरात ओरडू लागले. त्यांची कोल्हेकुई एकटाच निळा कोल्हा सुद्धा आपण सर्वांना खोटे बोलून राजा झालो आहे ते विसरला आणि त्याने सुद्धा ओरडणे चालू केले. निळ्या कोल्ह्याचा आवाज ऐकताच जंगलातील सर्व प्राण्यांना तो कोण आहे ते समजले. आपल्या सर्व कोल्हयाने मूर्ख बनवले आहे ते त्यांना कळून चुकले. सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी कोल्ह्याला खूप खूप मारले आणि जंगलातून हाकलून दिले.

तात्पर्य – खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही.

तर हि होती निळ्या कोल्ह्याची गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला निळ्या कोल्ह्याची गोष्ट (nila kolha story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment