आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रेल्वे स्टेशनवर एक तास मराठी निबंध (railway station varil ek taas Marathi nibandh). रेल्वे स्टेशनवर एक तास या विषयावर लिहलेला हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रेल्वे स्टेशनवर एक तास मराठी निबंध (railway station varil ek taas Marathi nibandh) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
रेल्वे स्टेशनवर एक तास मराठी निबंध, Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh
आजकाल धकाधकीच्या जीवनात सर्वजण लवकर ऑफिस जाण्याचा प्रयत्न करत असतात. मुंबई मध्ये असा कोणी एक सुद्धा माणूस नसेल ज्याने आज पर्यंत ट्रेन बघितली नसेल आणि रेल्वे स्टेशन वर गेले नसाल.
मुंबईमध्ये लोकांच्या दिवसाची सुरुवातच हि रेल्वे स्टेशन पासून होते. रेल्वे प्लॅटफॉर्म हे स्वतःमध्ये एक वेगळेच जग आहे. श्रीमंत आणि गरीब, सुशिक्षित आणि निरक्षर तसेच तरुण आणि वृद्धांचे जाण्याचे सोपे आणि वेगवान ठिकाण म्हणजे रेल्वे.
परिचय
दिवाळीला आम्ही सर्व जण गावी कोकणात जाण्याचे ठरले होते. आम्ही नेहमी बस ने जात असतो पण या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे रस्ते खराब आहेत असे वडील सांगत होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी ट्रेनने जाण्याचे ठरवले.
आमची ट्रेन हि रविवारी सकाळी १० वाजताची होती आणि आम्ही सर्व सकाळी ८ वाजता घरातून निघालो. साधणं १५-२० मिनिट रिक्षा ने प्रवास केल्यानंतर आमी रेल्वे स्टेशनवर पोचलो.
रेल्वे स्टेशनवरील जीवन
रेल्वे प्लॅटफॉर्मवरील जीवन खूप वेगाने पुढे जात असल्याचे दिसते. लोकांची आजूबाजूला गर्दी दिसत होती, काही ट्रेन येण्याच्या किंवा सुटण्याच्या वेळेची तपासणी करत होते, तर काही तिकिटे किंवा खाण्यायोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी जातात.
रेल्वे स्टेशनवरील प्रवासी
काही इतर लोक रेल्वे स्टेशनभोवती फिरतात आणि त्यांचे नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करतात. काही ट्रेनमधून उतरणारे लोक मालवाहक शोधात होते, तर तिकीट चेक करणारे लोक लोकांचे तिकीट चेक करत होते.
प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या वस्तू विकायला ठेवल्या होत्या. लहान मुले रडत होती, त्याच्या आई त्यांना शांत करत होत्या.
सर्व लोकांनी जे बाहेर फिरायला जाणार होते त्यांनी नीटनेटके कपडे घातले होते. त्यापैकी बरेच जण त्यांच्या नवीन शूज किंवा नवीन ड्रेसमध्ये वेगळेच दिसत होते.
काही लोक प्रवासी शुल्कावरून भांडताना दिसत होते. काही लोक मोठ्याने हसत होते. काही लोक आपल्या बायकोला सोडायला आले होते तर काही लोक आपल्या आई वडिलांना घ्यायला आले होते. काही सैनिक संम्मावर जात आहेत असे वाटत होते.
रेल्वे स्टेशन वर अनेक फेरीवाले ग्राहकांना आकर्षित करत होते. ते मोठ्याने ओरडून आपले वस्तू, समोसे, खेळणी विकत होते.
हळूहळू आमची ट्रेन आली. जसजशी ट्रेन जवळ येत होती , लोकांची गडबड होत होती. फेरीवाले जोरात ओरडत होते. लोक आपले मित्र आणि नातेवाईकांना भेटत होते. आम्ही आमची बॅग उचलली आणि ट्रेन मध्ये चढलो.
निष्कर्ष
रेल्वे स्टेशन वर घालवलेला एक तास एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. तिथे अनेक प्रकारचे लोक भेटतात. लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या घोषणा लक्ष विचलित करतात. रेल्वे प्लॅटफॉर्म वरील आयुष्य हे एक वेग्लासायच दुनियेतील असल्यासारखे वाटते.
तर हा होता रेल्वे स्टेशनवर एक तास मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास रेल्वे स्टेशनवर एक तास हा मराठी माहिती निबंध लेख (railway station varil ek taas Marathi nibandh) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.