रवींद्र जडेजा माहिती मराठी, Ravindra Jadeja Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रवींद्र जडेजा यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Ravindra Jadeja information in Marathi). रवींद्र जडेजा यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रवींद्र जडेजा यांच्यावर मराठीत माहिती (Ravindra Jadeja biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

रवींद्र जडेजा माहिती मराठी, Ravindra Jadeja Information in Marathi

रवींद्र जडेजा हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या भारतीय संघातील मधल्या फळीतील तो एक डावखुरा आणि वेगाने धावा करणारा आणि फिरकी गोलंदाजी करणारा खेळाडू आहे.

पूर्ण नावरवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजा
जन्म6 डिसेंबर 1988, जामनगर , गुजरात , भारत
वडिलांचे नावअनिरुद्धसिंह जडेजा
आईचे नावलता जडेजा
बायकोचे नावरीवा सोलंकी
टोपणनावरॉकस्टार, जड्डू, सर जडेजा
विशेषता डाव्या हाताने फलंदाजी, डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी
क्रिकेट पदार्पण 8 फेब्रुवारी 2009 श्रीलंका विरुद्ध.
खेळलेले सामनेकसोटी - 54, एकदिवसीय - 168, टी २० - 50, प्रथम श्रेणी - 108
केलेल्या धावा कसोटी - 2,084, एकदिवसीय - 2,411, टी २० - 217, प्रथम श्रेणी - 6,140
शतके/अर्धशतकेकसोटी - 1/16, एकदिवसीय - 0/13, टी २० - 0/0, प्रथम श्रेणी - 10/33
सर्वोच्च धावसंख्याकसोटी - १००*, एकदिवसीय - 87, टी २० - 44*, प्रथम श्रेणी - 331
विकेट्सकसोटी - 221, एकदिवसीय - 188, टी २० - 39, प्रथम श्रेणी - 432
डावात 5 बळीकसोटी - 9, एकदिवसीय - 1, टी २० - 50, प्रथम श्रेणी - 27
सर्वोत्तम गोलंदाजी कसोटी - 7/48, एकदिवसीय - 5/36, टी २० - 3/48, प्रथम श्रेणी - 7/31

परिचय

रवींद्र जडेजा हा जेव्हा विराट कोहलीने मलेशिया मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक मध्ये भारताला विजय मिळवून दिला होता त्या संघाचा भाग होता.

Ravindra Jadeja Information in Marathi

त्याने फेब्रुवारी २००९ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ७७ चेंडूत नाबाद ६० धावा केल्या. त्याने आपले कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास ८ वर्षानंतर इंग्लंड विरुद्ध खेळताना केले.

वैयक्तिक जीवन

जडेजाचा जन्म हा ६ डिसेंबर १९८८ मध्ये एका गुजराती राजपूत घराण्यात झाला होता. त्याचे वडील अनिरुद्ध हे एका खासगी सुरक्षा एजन्सी मध्ये पहारेकरी म्हणून काम करत होते. त्याच्या वडिलांची इच्छा होती की जडेजाने सैन्यात भरती व्हावे. परंतु त्याची आवड हि क्रिकेटमध्ये होती. जडेजाची आई लता यांचे २००५ मध्ये एका अपघातात निधन झाले आणि त्याच्या आईच्या मृत्यूमुळे आपले क्रिकेट जवळपास बंद केले होते.

जडेजाने १ एप्रिल २०१६ रोजी रीवा सोलंकीशी लग्न केले. त्यांना आता एक मुलगी झाली आहे.

डोमेस्टिक कारकीर्द

आपल्या वयाच्या १६ व्या वर्षी जडेजाने २००५ मध्ये १९ वर्षाखालील भारतीय संघात प्रवेश केला. २००६ मध्ये १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात निवडले गेले. अंतिम सामन्यात जडेजाने पाकिस्तानविरुद्ध ३ बळी मिळवत भारताला उपविजेतेपद मिळविले. २००८ मध्ये १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात तो विजयी भारतीय संघाचा उप-कर्णधार होता. त्याने स्पर्धेत ६ सामन्यात १० गडी बाद केले.

प्रथम श्रेणी क्रिकेट

जडेजाने २००६-०७ च्या दुलीप करंडक स्पर्धेत खेळत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१२ मध्ये जडेजा हा आपल्या कारकीर्दीत तीन प्रथम-श्रेणी तिहेरी शतक ठोकणारा आठवा खेळाडू आणि पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याचा पहिला सामना नोव्हेंबर २०११ मध्ये ओरिसाविरुद्ध झाला. त्याने ३७५ चेंडूत ३१४ धावा केल्या. त्याने दुसरा सामना गुजरात विरुद्ध खेळताना नाबाद ३०३ धावा केल्या. आपल्या तिसऱ्या सामन्यात ५०१ चेंडूत ३३१ धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२००८-०९ च्या आपल्या रणजी चषकातील अष्टपैलू कामगिरीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष त्याने वेधून घेतले. त्याने त्या वर्षी ७३९ धावा करत ४२ गडी बाद केले. ८ फेब्रुवारी २००९ मध्ये त्याने मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले.

तिसऱ्या सामन्यात त्याने जोरदार पुनरागमन केले. त्याने लंडनच्या ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह ११२ धावांची भागीदारी केली. त्याने या सामन्यात ७८ धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याने ४२ धावा देत २ गडी बाद केले. त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार दिला.

फेब्रुवारी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यात दुसऱ्या टी -२० सामन्यात मध्ये जडेजाने आपल्या ३ षटकांत फक्त १६ धावा देत १ गडी बाद केला. भारताने हा सामना जिंकला आणि जडेजाला क्षेत्ररक्षणातील केलेल्या कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

कोची येथे झालेल्या भारत-इंग्लंड मालिकेतील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात जडेजाने अवघ्या ३७ चेंडूंत ६१ धावा फटकावत भारताची एकूण धावसंख्या २८५ वर नेली. दुसऱ्या डावात त्याने १२ धावा देत २ गाडी बाद केले. टायच्या या कामगिरीमुळे इंग्लंडला भारताने १२७ धावांनी पराभूत केले.

फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील जडेजाने २४ विकेट्स घेत भारताला ४-० असा विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला मालिकेतील सहापैकी पाच वेळा बाद करून त्याने अष्टपैलू म्हणून संघात आपले स्थान निश्चित केले. २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या स्पर्धेत सर्वाधिक १२ विकेट्स घेतले.

२०१७ मध्ये रविचंद्रन अश्विन सोबत तो आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी त्याने कसोटीत पहिले शतक झळकावले. मार्च २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात जडेजा भारतासाठी २,००० धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० धावा करणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला.

ऑक्टोबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाने कसोटी क्रिकेटमधील आपला २०० वा बाली घेतला.

इंडियन प्रीमियर लीग कारकीर्द

२००८ मध्ये रवींद्र जडेजा याची राजस्थान रॉयल्स संघात निवड झाली. त्याने त्या वर्षीच्या राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. जडेजाने १४ सामन्यात १३५ धावा केल्या. २०१० च्या आयपीएलमध्ये जडेजा खेळला नाही. २०११ मध्ये त्याला कोची टस्कर्स केरळने विकत घेतले. २०१२ च्या आयपीएल प्लेयरच्या लिलावात जडेजाला चेन्नई सुपर किंग्जने अंदाजे 9.8 कोटी रुपये देऊन खरेदी केले. त्या वर्षाचा लिलाव करणारा जाडेजा हा सर्वात महागडा खेळाडू होता.

आयपीएल २०१५ च्या झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना त्याने ११ धावा देऊन चार बळी घेतले होते. २०२१ मध्ये १९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध खेळताना त्याने शेवटच्या षटकात हर्षल पटेलविरुद्ध ३७ धावा केल्या होत्या. त्याने त्या सामन्यात २८ चेंडूत ६२ धावा केल्या आणि ३ बळी मिळवले.

मिळविलेले पुरस्कार

  • २०१३, २०१६ मध्ये आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर पुरस्कार
  • २००८ मध्ये सर्वाधिक विकेटसाठी माधवराव सिंधिया पुरस्कार
  • २०१९ मध्ये अर्जुन पुरस्कार

तर हा होता रवींद्र जडेजा यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास रवींद्र जडेजा यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Ravindra Jadeja information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Related Posts

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍

आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.

1 thought on “रवींद्र जडेजा माहिती मराठी, Ravindra Jadeja Information in Marathi”

Leave a Comment

error: Content is protected.