कशी मिळाली होती सचिन तेंडुलकरला क्रिकेटमध्ये ओपनिंग करण्याची संधी

Sachin Tendulkar Birthday Special – क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या देशासाठी २०० कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ३२९ डावांमध्ये ३३ वेळा नाबाद राहून १५,९२१ धावा केल्या आहेत. त्याने ५१ शतके, ६ दुहेरी शतके आणि ६८ अर्धशतके ठोकली आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४६३ सामन्यांमध्ये १८,४२६ धावा केल्या आहेत ज्यात ४९ शतके, १ दुहेरी शतक आणि ९६ अर्धशतके केली आहेत.

कशी मिळाली सचिनला ओपनिंग करायची संधी

आपल्या करिअरमध्ये ओपनिंग ला खेळायला येऊन सर्वाधिक धावांचा विक्रम करणारा सचिन जेव्हा क्रिकेट मध्ये पदार्पण करत होता तेव्हा तो सलामीला खेळायला येत नव्हता. त्याला हि संधी अपघाताने मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले आणि इतिहास रचला.

Sachin Tendulkar Birthday

१ नोव्हेंबर १९८९ रोजी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिनला पदार्पणानंतर बरीच वर्षे आपल्या नावाला साजेशी खेळी करता आली नव्हती. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मधल्या फळीत फलंदाजी केली.

जवळपास ६ वर्षे सचिन तेंडुलकर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळला, पण एकदा नवज्योतसिंग सिद्धू जखमी झाल्यामुले सचिनने कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला विनंती केली की मला एकदा डाव सुरू करायची संधी द्या. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सचिनला सलामीवीर म्हूणन खेळायला परवानगी दिली आणि वस्तुस्थिती बदलून गेली.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने सलामीला सुरुवात केली आणि रोज नवीन नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करायला सुरुवात केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ९ सप्टेंबर १९९४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. तथापि, त्याने १९९० मध्येच कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते.

सचिन तेंडुलकरने १९८९ ते २०१२ पर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळले आणि दरम्यानच्या काळात सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकांचा विश्वविक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्येही अशीच परिस्थिती होती. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम सचिनने नोंदविला. याशिवाय त्यांच्याकडे अनेक जागतिक विक्रमदेखील आहेत.

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव असे म्हणतात कारण त्यांच्या नावावर अजूनही असे अनेक विक्रम आहेत जे या दशकात मोडणार नाहीत.

सचिनच्या नावावर असलेले काही मोजके विक्रम

सर्वाधिक कसोटी सामने

खेळाच्या इतिहासातील सर्वात युवा कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या सचिनने आपल्या २४ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत टीम इंडियासाठी २०० कसोटी सामने खेळले आहेत. वेगवेगळ्या दुखापतीमुळे त्याला अगणित सामन्यांमध्ये खेळता आले नाही. अन्यथा, तेंडुलकर सहजतेने २२५ पेक्षा अधिक कसोटी सामने खेळू शकले असते.

सर्वाधिक कसोटी धावा

सचिन २०० कसोटी सामने खेळले असल्याने सचिन हा एकमेव फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये १५००० धावांचा टप्पा पार केला आहे.

सगळ्यात जास्त वर्ल्ड कपमध्ये खेळले गेलेले सामने

एखाद्या खेळाडूने त्याच्या कारकीर्दीत किती विश्वचषक खेळायचे हे ठरविण्यात फिटनेस आणि वय महत्त्वाची भूमिका बजावतात. आतापर्यंत वर्ल्ड कपच्या १२ आवृत्त्या झाल्या आहेत, पण त्यापैकी फक्त २ खेळाडू असे आहेत जे ६ वर्ल्ड कप खेळले आहेत. ६ वर्ल्ड कपमध्ये भाग घेणारा पहिला खेळाडू जावेद मियांदाद होता. आणि सचिनने २०११ मध्ये त्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण

सचिनने वयाच्या १६ वर्ष आणि २०५ दिवसांच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि आतापर्यंतचा सर्वात युवा भारतीय म्हणून कामगिरी केली.

वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावा

सचिनने सर्वाधिक विश्वचषक खेळल्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याकडे आहे. सचिनने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये २२७९ धाव बनवल्या आहेत. इतर कोणताही फलंदाज १००० धावांचा टप्पा पार करू शकला नाही.

Leave a Comment