ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट, Sasa Ani Kasav Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट (sasa ani kasav story in Marathi). ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट (sasa ani kasav story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट, Sasa Ani Kasav Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट

एका जंगलात ससा आणि कासव २ मित्र होते. सशाला आपल्या वेगवान गतीचा खूप गर्व होता. तो भेटेल त्याला शर्यत करण्याचे आव्हान देत असे.

Sasa Ani Kasav Story in Marathi

कासवाने त्याचे आव्हान स्वीकारले. शर्यत झाली. ससा वेगाने पळत सुटला आणि बराच पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले, कासव कुठेच दिसत नव्हते, त्याने स्वतःशीच विचार केला की कासवाला इथे यायला खूप वेळ लागेल, आपण थोडा वेळ आराम करू या, आणि तो एका झाडाजवळ आला. आणि विचार केला कासव अजून खूप मागे आहे, तोपर्यंत आपण थोडा वेळ झोप काढू. ससा झोपी गेला.

कासव संथ पण स्थिर चालत राहिले. कासव येऊन पोचले तर बघतो तर काय ससा झोपी गेला होता. कासव तसेच चालत राहिले.

बर्‍याच वेळाने सशाचे डोळे उघडले तेव्हा कासव अंतिम रेषेपर्यंत पोहोचणार होते. ससा वेगाने धावला, पण खूप उशीर झाला होता आणि कासवाने शर्यत जिंकली.

ही कथा आपल्या सर्वांना माहित आहे, आता पुढील कथा पाहूया.

शर्यत हरल्यानंतर, ससा निराश होतो, तो आपल्या पराभवाचा विचार करतो आणि त्याला समजते की तो अतिआत्मविश्वासामुळे आपण शर्यत हरलो. त्याने त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर थांबायला हवे होते.

दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कासवाला शर्यतीचे आव्हान देतो. कासव, पहिली शर्यत जिंकल्यानंतर, आत्मविश्वासाने भरलेला असतो आणि लगेच सहमत होतो.

शर्यत सुरू होते, यावेळी ससा न थांबता शेवटपर्यंत धावतो आणि कासवाला मोठ्या फरकाने पराभूत करतो.

यावेळी कासवाने थोडा विचार केला आणि त्याला समजले की सध्या ज्या प्रकारे शर्यत सुरू आहे, ती कधीही जिंकू शकत नाही.

तो पुन्हा एकदा सशाला नवीन शर्यतीचे आव्हान देतो, परंतु यावेळी तो त्याच्यानुसार शर्यतीचा मार्ग ठेवण्यास सांगतो. ससा तयार होतो.

शर्यत सुरू होते. ससा ठरलेल्या जागेकडे वेगाने धावतो, पण त्या वाटेने एक मोठी नदी वाहत असते, बिचार्‍या सश्याला तिथेच थांबावे लागते कारण त्याला पोहता येत नसते. कासव हळू चालत तिथे पोहोचतो, आरामात नदी पार करतो आणि लक्ष्य गाठतो आणि शर्यत जिंकतो.

इतक्या शर्यतींनंतर आता कासव आणि ससा चांगले मित्र बनले होते आणि एकमेकांची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेऊ लागले होते. दोघांनी मिळून विचार केला की जर आपण एकमेकांना साथ दिली तर आपण कोणतीही शर्यत सहज जिंकू शकतो.

त्यामुळे दोघांनीही पुन्हा एकदा शेवटची शर्यत एकत्र धावण्याचा निर्णय घेतला, पण यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी म्हणून नाही तर एक संघ म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

शर्यत सुरु झाली कि ससा कासवाला उचलून वेगाने पळू लागला. दोघे काही वेळातच नदीच्या काठावर पोहोचले. आता कासवाची पाळी होती, कासवाने सशाला पाठीवर बसवले आणि दोघांनी आरामात नदी पार केली.

आता पुन्हा एकदा सश्याने कासवाला उचलून अंतिम रेषेकडे धाव घेतली आणि त्यांनी मिळून विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली. दोघेही खूप आनंदी आणि समाधानी होते, आजच्या आधी शर्यत जिंकल्यावर इतका आनंद त्यांना कधीच मिळाला नव्हता.

तात्पर्य

कधीच कोणाला कमी समजू नका. कोणती पण गोष्ठ जर आपण मिळून केली तर कमी वेळात आणि लवकर होते.

तर हि होती ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट. मला आशा आहे की ससा आणि कासवाची शर्यत मराठी गोष्ट (sasa ani kasav story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment