सेंड ऑफ स्पीच मराठी, Send Off Speech in Marathi For School, Teacher, Office

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सेंड ऑफ स्पीच मराठी, निरोप समारंभ असताना करायचे भाषण (send off speech in Marathi ). सेंड ऑफ स्पीच मराठी, निरोप समारंभ या विषयावर लिहलेले हे भाषण मुलांसाठी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा, महाविद्यालयीन किंवा ऑफिस निरोप समारंभ कार्यक्रमाच्या वेळी सेंड ऑफ स्पीच, निरोप समारंभ वर मराठीत भाषण (send off speech in Marathi ) बोलू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये भाषणे आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

सेंड ऑफ स्पीच मराठी, Send Off Speech in Marathi For School, Teacher, Office

ज्या ठिकाणी आपण अनेक वर्षे शाळा शिकलेले असतो, आपले शिक्षक आपल्याला ज्ञान देत असतात किंवा आपले कर्मचारी अनेक वर्षपासून आपल्या सोबत काम करत असतात. अशा वेळी आपल्या जवळच्या लोकांना निरोप देणे खूप कठीण आहे.

परिचय

शाळेतुन आपले आवडते शिक्षक, मुख्याध्यापक, आपले सहकारी यांचा आपल्या सोबतचा दिवस हा चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी निरोप समारंभ आयोजित करून सेंड ऑफ भाषण केले जातात. अशा भाषांत नेहमी आपण त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचे, कर्तृत्वाचे नेहमीच वर्णन केले पाहिजे. त्यांचे वर्तन, वागणूक, विचार आणि व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्ये देखील भाषणात समाविष्ट केली गेली पाहिजेत. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रभाव असलेल्या आपल्या सहकाऱ्यांसाठी निरोप भाषण लिहिले जाते.

Send Off Speech in Marathi

शिक्षक, ज्येष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थी, तुमच्या ऑफिस मधील तुमचे सहयोगी अशा सर्वांसाठी निरोपाचा दिवस खास असतो. कनिष्ठ म्हणजे जे वरिष्ठांसाठी निरोपाची पार्टी आयोजित करतात. ते वरिष्ठांना त्यांच्या आगामी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात आणि त्यांच्या चांगल्या भविष्याची प्रार्थना करतात.

निरोप समारंभ भाषण, Send Off Speech in Marathi

निरोप समारंभ म्हणजे वर्गाच्या वतीने वरिष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी बोलण्याची वेळ. या दिवशी तुम्हाला तुमच्या वर्गाच्या वतीने बोलण्याची संधी मिळू शकते. बरेच विद्यार्थी भाषणाच्या नावाने घाबरतात परंतु प्रत्यक्षात हे खुप सोपे सुद्धा आहे.

मुलांसाठी निरोप समारंभ भाषण, Send Off Speech For School in Marathi

आदरणीय, प्राचार्य महोदय, शिक्षक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो. मी प्रताप पाटील, मी इयत्ता ७ वी अ तुकडीचा विद्यार्थी आहे. आज या शाळेत आमच्या वर्गाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आम्ही ७ वि चे सर्व विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या शाळेला जाणार आहोत. आमच्या निरोपाच्या दिवशी भाषण देण्याची जबाबदारी माझ्या वर्गशिक्षकांनी मला दिली. मी पहिल्यांदाच भाषण देत आहे त्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा.

मला माझ्या वर्गाच्या वतीने त्यांच्या नवीन कल्पना शिकवणार्‍या शिक्षकांचे आभार मानायचे आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही दररोज नवीन गोष्टी शिकतो. सागर सर आणि त्यांचे क्लास आम्ही एकच टेबल कधीच विसरणार नाही, आम्हाला नवीन पद्धतीने शिकवल्याबद्दल तुमचे आभार.

आम्ही जरी आज जात असलो तरी आम्हाला तुमच्या सारख्या प्रेमळ शिक्षकांची उणीव भासेल जे कधीही हार मानत नाहीत. विशेषतः आमच्या वर्गशिक्षिका गायकवाड मॅडम, त्या खूप छान आहेत आणि आमच्या क्लासमधील कोणाचा सुद्धा वाढदिवस वर्गात साजरा करायला त्या कधीच विसरत नाहीत आणि आमच्या मोकळ्या वेळेत त्या नेहमी आमच्यासोबत खेळायच्या.

मी आमच्या क्रीडा आणि सांस्कृतिक शिक्षकांचे देखील आभार मानू इच्छितो, त्यांनी आम्हाला त्यांच्या संघात सामील होण्याची संधी दिली आणि आम्ही गेल्या वर्षी आमच्या वर्गासाठी एका खो खो, कबड्डी, क्रिकेट मध्ये पूर्ण शाळेत प्रथम क्रमांकाने जिंकलो होतो. आमच्या वर्गातील बहुतेक विद्यार्थी आता सांस्कृतिक कार्यात भाग घेण्यासाठी नेहमी तयार असतात.

मी आमच्या प्राचार्य सरांचे आभार मानू इच्छितो जे खूप मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. शाळेत असताना आम्हाला नेहमी घरच्यासारखे वाटते.

आमच्या सर्व शिक्षकांना अभिमान वाटावा यासाठी आम्ही आमच्या नवीन शाळेत आमची वाटचाल अशीच चालू ठेवू आणि आपल्या शाळेचे नाव तिकडे सुद्धा काढू अशीच अशा व्यक्त करतो. तुमच्या मार्गदर्शन आणि प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचे आभार.

शिक्षकांसाठी निरोप समारंभ भाषण, Send Off Speech For Teacher in Marathi

आदरणीय, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्रिय सहकारी, आणि मित्रपरिवार यांना सुप्रभात.

आज तुम्ही जो काही थोडक्या वेळात कार्यक्रमी आयोजित करून आपण जो काही मुलांचा सत्कार केलात त्याबाबद्दल खूप खूप आभार. आज मी माझ्या मनातील संमिश्र भावनेने बोलत आहे. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे कारण आज माझे सगळे विद्यार्थी मोठे झाले आहेत आणि आता ते पुढील शिक्षणासाठी पुढे जात आहेत पण हे विद्यार्थ्यांचे ओळखीचे चेहरे माझ्या डोळ्यासमोरून जाताना मलाही वाईट वाटते.

तुम्हा सर्वांना माहीत आहे की, आज आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आलो आहोत, जे कॉलेजमधील १२ वी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शाळा सोडत आहेत. आज तुम्ही या शाळेतून बाहेर पडून नवीन जग पाहण्यासाठी पुरेसे मोठे झालेले पाहून मी भारावून गेलो आहे. मी १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो कारण त्यांचा या शाळेतील प्रवास लवकरच संपणार आहे. टूर स्टडीज, इतर उपक्रम आणि स्पर्धांशी संबंधित गेल्या वर्षांमध्ये तुम्ही सर्व आव्हानांना तोंड दिले असूनही तुम्ही नवनवीन यशाची शिखरे गाठावीत अशीच उच्च ठेवतो. तुमचा शिक्षक या नात्याने, मला माहित आहे की तुम्ही आमच्या नवीन महाविद्यालयाचा अभिमान देखील वाढवाल.

आज या सभागृहात तुमचे ज्युनियर्सही आमच्यासोबत आहेत. त्यांनी तुमच्या निरोपाची सर्व व्यवस्था केली आहे. जेव्हा तुमचा कनिष्ठ तुमच्या पावलावर पाऊल ठेवतो आणि आमची शाळा या अभिमानास्पद क्षणाची साक्षीदार असते तेव्हा यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही.

प्रिय विद्यार्थ्यांनो, शिक्षक होणे हे सोपे काम नाही. आगामी अडचणी हाताळण्यासाठी तुम्हाला पुरेसे सक्षम बनवण्यासाठी आम्ही तुमच्याशी कठोर वागणे सुद्धा आवश्यक आहे. आता तुम्ही उच्च महाविद्यालयात प्रवेश घ्याल तेव्हा तुमच्या शिक्षणाचीही परीक्षा असेल. शेवटी, मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. मला आशा आहे की तुम्ही आमच्याप्रमाणे तुमच्या नवीन शिक्षकांनाही अभिमान वाटेल.

ऑफिससाठी निरोप समारंभ भाषण, Send Off Speech For Office in Marathi

तुम्हा सर्वांना खूप शुभ संध्याकाळ, तुम्हाला आज आपल्या आजच्या कामांमधून इथे का बोलावले आहे ते तुमच्या पैकी बहुतेक लोकांना माहित असेलच. ज्या नवीन लोकांना माहिती नाही त्या सर्वांना मी माझा एक छोटा परिचय देतो. मी प्रताप पाटील, गेल्या २२ वर्षांपासून आपल्या कंपनीचा एक भाग आहे आणि हि कंपनी माझे एक दुसरे घरच आहे. मला अजूनही आठवते २००० च्या दिवाळी नंतर मी कंपनीत जॉईन झालो होतो. आजसुद्धा मला असे वाटत आहे कि मी कंपनीत रुजू झालो तेव्हा कालचा दिवस होता आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे आणि माझे निरोपाचे भाषण देत आहे.

होय, तुम्ही सर्वांनी ते बरोबर ऐकले आहे, मी आज कंपनीतून निवृत्त होणार आहे. जॉईन केल्याच्या पहिल्या दिवशी, एक दिवस मी निरोप देईन असे कधीच वाटले नव्हते आणि ते खरे आहे पण मी माझ्या नोकरीतून निवृत्त होत आहे.

कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचारी ते कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर हा प्रवास माझ्यासाठी खूप आव्हानात्मक राहिला आहे. मला कंपनीकडून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या, विशेषत: आमच्या वरिष्ठांकडून, ते नेहमीच सपोर्टिव्ह होते आणि कधीही माझ्यावर कोणत्याही कामासाठी दबाव आणत नाहीत, हे फक्त मी आणि माझ्या वरिष्ठांमधील परस्पर समंजसपणामुळे आहे.

आज, मला मदत करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी नेहमीच उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो, अगदी माझ्या कनिष्ठ सहकाऱ्यांचे, जे आताच कंपनीमध्ये जॉईन झाले आहेत आणि त्यांना विविध गोष्टी माहित आहेत आणि मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो.

या कंपनीचा एक भाग असणं हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. मी तुम्हाला येथे शिकलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगेन, म्हणजे वेळेचे व्यवस्थापन आणि चांगले निर्णय घेणे आणि हे दोन्ही गुण मला भविष्यात मदत करतील. मी या कंपनीसोबत आणि माझे सर्व सहकारी ज्या क्षणांमध्ये जगलो ते सर्व क्षण माझ्यासोबत कायमस्वरूपी सोबत राहतील.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता आणि तुमच्या सर्वांना तुमच्या स्वतःच्या आणि कंपनीच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

निष्कर्ष

तर हे होते सेंड ऑफ स्पीच मराठी, निरोप समारंभ वर मराठीत भाषण, मला आशा आहे की आपणास सेंड ऑफ स्पीच मराठी, निरोप समारंभ या विषयावर मराठी भाषण (send off speech in Marathi ) आवडले असेल. जर आपल्याला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment