साप आणि मुंगी मराठी गोष्ट, Snake and Ants Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे साप आणि मुंगी मराठी गोष्ट (snake and ants story in Marathi). साप आणि मुंगी मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी साप आणि मुंगी मराठी गोष्ट (snake and ants story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

साप आणि मुंगी मराठी गोष्ट, Snake and Ants Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

साप आणि मुंगी मराठी गोष्ट

एका जंगलात एका उंच झाडावर एक मोठा साप राहत होता. तो दररोज पक्ष्यांची अंडी, उंदीर, बेडूक आणि छोटे प्राणी खाऊन तो आपले पोट भरायचा. तो खूप आळशीही होता. एके ठिकाणी पडून राहिल्यामुळे तो काही दिवसातच खूप लठ्ठ झाला. जसजसा तो बलवान होत गेला तसतसा त्याला खूप गर्व झाला.

Snake and Ants Story in Marathi

एके दिवशी सापाला वाटले, “मी जंगलात सर्वात शक्तिशाली आहे. म्हणूनच मी जंगलाचा राजा आहे. आता मी माझ्या प्रतिष्ठेला आणि आकाराला साजेशा मोठ्या ठिकाणी असायला हवे.”

असा विचार करून त्याने राहण्यासाठी एक मोठे झाड निवडले. झाडाजवळ मुंग्यांच्या वसाहती होत्या. त्यांना पाहून त्याने रागाने त्यांना सांगितले, “मला ही घाण आवडत नाही. तुम्ही इथून निघून कुठे पण जा.”

तो मुंग्यांना म्हणाला – “मी नागराज आहे, या जंगलाचा राजा, मी तुम्हाला आदेश देतो की लवकरात लवकर तुम्ही इथून निघून जावा”. सापाला पाहून तिथे राहणारे इतर लहान प्राणी थरथरू लागले. पण त्याच्या या दादागिरीचा छोट्या मुंग्यांवर काहीही परिणाम झाला नाही.

हे पाहून सापाला खूप राग आला आणि त्याने आपल्या शेपटीने मुंग्यांच्या बिळावर फटका मारला. तसे अनेक मुंग्या मरण पावल्या. त्यामुळे मुंग्या खूप चिडल्या. काही क्षणातच हजारो मुंग्या बिळातून बाहेर आल्या आणि त्या सापाच्या अंगावर चढल्या आणि त्याला चावू लागल्या.

सापाला असे वाटले की जणू हजारो काटे त्याच्या अंगाला टोचत आहेत. तो असहाय वेदनेने ओरडला. असंख्य मुंग्या त्याला चावत होत्या.

त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तो धावपळ करू लागला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काही काळ तो असाच धडपडत राहिला, पण नंतर असहाय वेदनांमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतरही मुंग्यांनी त्याला सोडले नाही आणि त्याचे पूर्ण मांस खाऊन टाकले.

तात्पर्य

कुणालाही लहान समजून त्याला त्रास देऊ नये. अनेक छोट्या गोष्टी एकत्र येऊन एक मोठी शक्ती बनतात.

तर हि होती साप आणि मुंगी मराठी गोष्ट. मला आशा आहे की साप आणि मुंगी मराठी गोष्ट (snake and ants story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment