सोनेरी शिंगाचे हरिण गोष्ट, Soneri Shingache Harin Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोनेरी शिंगाचे हरिण हि गोष्ट (soneri shingache harin story in Marathi). सोनेरी शिंगाचे हरिण हि गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी सोनेरी शिंगाचे हरिण हि गोष्ट (soneri shingache harin Story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

सोनेरी शिंगाचे हरिण गोष्ट, Soneri Shingache Harin Story in Marathi

एका जंगलात एक सुंदर हरीण रहात होते. त्या हरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या हरणाला सोनेरी शिंगे होती. आपल्या सोनेरी शिंगांचा त्याला खूप गर्व होता. पण हे असूनही तो कधीही आनंदी नव्हता. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याचे पाय खूप काळे आणि विद्रूप होते. जेव्हा कधी तो आपल्या शिंगाकडे पाहत असे तेव्हा त्याला खूप आनंद होत असे. पण जेव्हा जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जायचे तेव्हा तेव्हा त्याला आपल्या पायांचा खूप राग येत असे. तो नेहमी विचार करत असे कि जर आपले पाय सुद्धा सोनेरी असते तर किती बरे झाले असते.

Soneri Shingache Harin Story in Marathi

असेच एक दिवस हरिण हे जंगलातील एका झऱ्यावर तहान लागल्यामुळे पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याचे लक्ष आपल्या सोनेरी शिंगांकडे गेले. त्याला पाण्यात आपली सोनेरी शिंगे दिसली. आपली सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला.

तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला आणि त्याने मागे वळून पहिले तर सर्व प्राणी पळत जात होते. त्याला सुद्धा समजले कि एक शिकारी जंगलात आला आहे. त्याने पाहिले कि शिकारी हा त्याच्यावरच नेम लावून आहे. शिकाऱ्याला पाहून हरिण खूप घाबरले आणि त्याने जोरात पळायला सुरुवात केली.

शिकारी सुद्धा हरणाचा पाठलाग करू लागला. हरीण खूप वेगाने पळत होते. ज्या पायांचा तो नेहमी राग करायचा त्यांच्यामुळेच आज तो जोरात पळू शकत होता. खूप पळाल्यानंतर एका काटेरी वनात पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. त्याने खूप प्रयत्न केले पण त्याची शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी हरणाचा पाठलाग करत आला आणि त्याने हरणाला पकडले.

हरणाला खूप रडायला आले आणि तो स्वत: शीच बोलू लागला. ज्या पायांबद्दल मी आयुष्यभर राग करत होतो त्यांनी मला वाचवले आणि ज्यांना मी आयुष्यभर जपत होतो त्यांनी मला मरणाच्या दारात नेऊन सोडले.या शिंगांमुळेच शिकाऱ्याने आज मला पकडले.

तात्पर्य – कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करून नका आणि कोणाला कमी लेखू नका.

तर हि होती सोनेरी शिंगाचे हरिण हि गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला सोनेरी शिंगाचे हरिण हि गोष्ट (soneri shingache harin story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment