सौरव गांगुली माहिती मराठी, Sourav Ganguly Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सौरव गांगुली यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Sourav Ganguly information in Marathi). सौरव गांगुली यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी सौरव गांगुली यांच्यावर मराठीत माहिती (Sourav Ganguly biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

सौरव गांगुली माहिती मराठी, Sourav Ganguly Information in Marathi

भारतीय संघाला क्रिकेटच्या जागतिक स्तरावर खरी ओळख कोणी मिळून दिली असे तर तो आहे सौरव गांगुली. सौरव गांगुलीला सर्व लोक दादा म्हणून हाक मारतात.

परिचय

सौरव गांगुली हा एक प्रसिद्ध भारतीय खेळाडू आहे ज्याने आपल्या फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजाचे तोंडचे पाणी पळवले होते. फलदांजी व्यतिरिक्त तो एक चांगला समालोचक अजून सध्या भारतीय क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष आहे. आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत गांगुलीने स्वत:ला जगातील आघाडीचा फलंदाज आणि भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नाव कमवले होते.

Sourav Ganguly Information in Marathi

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तो ८ वा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर आणि इंझमाम उल हक नंतर सर्वात लवकर १०,००० धावांचा टप्पा गाठणारा गांगुली हा तिसरा फलंदाज आहे.

वैयक्तिक जीवन

सौरव गांगुली यांचा जन्म ८ जुलै १९७२ रोजी कलकत्ता येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव चंडीदास होते आणि आईचे नाव निरुपा होते. गांगुलीचे वडील हे एक छपाईचा व्यवसाय करत होते. लहानपणी गांगुली हा फुटबॉल खेळाकडे आकर्षित झाला. कोलकातामध्ये खूप लोक फुटबॉल खेळतात. त्याच्या फुटबॉल किंवा क्रिकेट खेळण्याला कोणीच समर्थन दिले नाही पण त्याचा भाऊ स्नेहाशीषने आपल्या भावाचे कौशल्य ओळखले. त्याने आपल्या वडिलांना सांगून गांगुलीला क्रिकेट कोचिंग शिबिरात दाखल करण्यास सांगितले.

सौरव गांगुलीने आपली मैत्रीण डोना गांगुलीसोबत १९९७ मध्ये लग्न केले. ती एक भारतीय ओडिसी नृत्यांगना आहे. डोना गांगुलीची दीक्षा मांजरी नावाची नृत्य शाळा आहे. त्यांना एक सना नावाची मुलगी आहे.

क्रिकेटची सुरुवात

गांगुली हा डाव्या हाताने फलंदाजी करायला शिकला. क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंगमध्ये तो आणि त्याचा भाऊ स्नेहाशिष खेळाचा सराव करत असत. त्याने १५ वर्षाखालील ओरिसा संघाविरूद्ध खेळताना आपले पहिले शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीनंतर त्याला सेंट झेवियर्स शाळेच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले. गांगुली हा आधीपासूनच खूप आक्रमक होता. त्याच्या लहानपनापासून राहणीमुळे त्याला १२ वा खेळाडू म्हणून बाकी खेळाडूंना पाणी देणे, बॅट देणे हे आवडायचे नाही. त्याच्या चांगल्या खेळामुळे त्याला १९८९ मध्ये बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण

१९९०-९१ च्या चांगल्या रणजी मोसमानंतर १९९२ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातगांगुलीने पदार्पण केले. त्याने त्या सामन्यात फक्त तीन धावा केल्या. त्या सामन्यादरम्यान त्याने आपल्या सहकार्यांना पाणी दिले नाही असे बोलले गेले. यामुळे त्याला संघातून काढून टाकण्यात आले.

तो पुन्हा डोमेस्टिक क्रिकेट खेळात राहिला. १९९३ ते १९९५ च्या रणजी सिजनमध्ये त्याने खूप धावा केल्या. १९९५-९६ मध्ये केलेल्या दुलीप करंडक चषकातील १७१ धावांच्या खेळीनंतर त्याला १९९६ मध्ये इंग्लंड विरुद्ध संघात निवडण्यात आले. त्यात तो एकच सामना खेळला.

लॉर्ड्स येथे चालू असलेल्या तीन कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात गांगुलीने आपले कसोटी कारकिर्दीचे पदार्पण केले. इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेची पहिली कसोटी जिंकली होती. दुसऱ्या सामन्यात त्याने पहिल्या डावात शतक झळकावले आणि पदार्पणात लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला. त्याने पदार्पणात केलेल्या १३१ धावा हा अजूनही सर्वोच्च स्कोर आहे. हा सामना अनिर्णित राहिला. ट्रेंट ब्रिज येथे पुढील कसोटी सामन्यात त्याने १३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या दोन डावात प्रत्येकी शतक ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकरबरोबर २५५ धावांची भागीदारी केली. त्यावेळी भारताच्या देशाबाहेर कोणत्याही विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली होती.

१९९९ ची विश्वचषक स्पर्धा

गांगुली १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचा भाग होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना गांगुलीने १५३ चेंडूंत १८३ धावा केल्या. त्याच्या या खेळात त्याने तब्बल १७ चौकार आणि सात षटकार ठोकले. विश्वचषकातील इतिहासातील हि दुसर्‍या क्रमांकाची आणि त्यावेळी एका स्पर्धेत भारतीयांकडून सर्वोच्च धावसंख्या होती. विश्वचषकातील राहुल द्रविडबरोबरची त्यांची ३१८ धावांची भागीदारी हि आजपर्यंतची सर्वात अधिक भागीदारी आहे.

कर्णधारपद म्हणून निवड

२००० मध्ये भारतीय संघातील काही खेळाडूंनी केलेल्या मॅच फिक्सिंग घोटाळ्यानंतर गांगुलीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. त्याने कर्णधार म्हणून खूप चांगली कामगिरी केली आणि भारताला पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर मालिकेत विजय मिळवून दिला. २००० च्या आयसीसी नॉकऑट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला नेले. त्याने या स्पर्धेत दोन शतके ठोकली, परंतु अंतिम सामन्यात न्यूझीलंडने चार विकेट्सने विजय मिळविला.

२००१ च्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाच्या तीन कसोटी आणि पाच सामन्यांच्या एकदिवसीय दौर्‍यावर तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. लॉर्ड्समध्ये २००२ मध्ये झालेल्या नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यादरम्यान युवराज सिंग आणि कैफ सामना जिंकून दिल्यानंतर गांगुलीने आपला शर्ट सार्वजनिकपणे उतरवला आणि आपला आनंद साजरा केला. २००३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ नंतर प्रथमच विश्वचषक फायनलमध्ये प्रवेश केला, पण भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव झाला. गांगुलीने या स्पर्धेत तीन शतकांसह ४६५ धावा केल्या.

कसोटी संघात पुनरागमन

२००६ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये झालेल्या खराब कामगिरीमुळे आणि दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेतील ४-० असे हरल्यानंतर गांगुलीने कसोटी संघात पुनरागमन केले. भारताची अवस्था ३७/४ वर असताना गांगुलीने ८३ धावांची खेळी केली आणि भारताला हा सामना जिंकून दिला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जोहान्सबर्गमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ५१ धावा करत दक्षिण आफ्रिकेतील संघासाठीचा पहिला कसोटी सामना भारताला जिंकून दिला.

१२ डिसेंबर २००७ मध्ये गांगुलीने पाकिस्तानविरुद्ध खेळताना कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्याने मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २३९ धावा केल्या. युवराज सिंगबरोबर पाचव्या विकेटसाठी त्याने ३०० धावांची भागीदारी केली.

आयपीएल कारकीर्द

फेब्रुवारी २००८ मध्ये गांगुली इंडियन प्रीमियर लीग मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळू लागला. तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. बंगलोर रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी १४० धावांनी विजय मिळविला.

दुसऱ्या वर्षाच्या आयपीएलच्या हंगामानंतर गांगुलीला कर्णधारपदावरून काढून टाकले. त्या वर्षी संघ हा शेवटच्या क्रमांकावर होता. आयपीएलच्या तिसर्‍या सत्रात गांगुलीला पुन्हा एकदा केकेआरची कप्तानी देण्यात आली होती. केकेआरसाठी गांगुलीने ४० सामने खेळताना १०३१ धावा केल्या आणि आठ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या चौथ्या सत्रात त्याला पुणे वॉरियर्स इंडिया संघाने खरेदी केले. त्याने चार सामने आणि तीन डावांमध्ये फक्त ५० धावा केल्या. २ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याने पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा आणि खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

केलेले रेकॉर्डस्

  • सलग चार एकदिवसीय सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू
  • एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा नववा आणि ११,363 धावाांसह भारतीयांमध्ये तिसरा क्रमांक
  • क्रिकेट विश्वचषकात एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज, धावा १८३
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज, धावा ११७
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात ३ शतके ठोकणारा पहिला खेळाडू
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा, १०० बळी आणि १०० झेल मिळवणारा ६ मधील एक खेळाडू
  • गांगुलीची कसोटी फलंदाजीची सरासरी कधीही ४० च्या खाली गेली नाही
  • परदेशातील भारतातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार, त्याने नेतृत्व केलेल्या २८ पैकी ११ कसोटी सामने भारताने जिंकले आहेत
  • पदार्पणात शतक झळकावणारा आणि त्याच्या अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद एकमेव फलंदाज

मिळालेले पुरस्कार

  • १९९८ मध्ये स्पोर्टस्टार पर्सन ऑफ द इयर – स्पोर्टस्टार मॅगझिन
  • १९९८ मध्ये क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार
  • १९९९ मध्ये सिएट क्रिकेटर ऑफ द इयर
  • २००१ मध्ये सिएट इंडियन कॅप्टन ऑफ द इयर
  • २००४ मध्ये पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार

तर हा होता सौरव गांगुली यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास सौरव गांगुली यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Sourav Ganguly information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment