तहानलेला कावळा मराठी गोष्ट, Thirsty Crow Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तहानलेला कावळा मराठी गोष्ट (thirsty crow story in Marathi). तहानलेला कावळा मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी तहानलेला कावळा मराठी गोष्ट (thirsty crow story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

तहानलेला कावळा मराठी गोष्ट, Thirsty Crow Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

तहानलेला कावळा मराठी गोष्ट

उन्हाळ्याचे दिवस होते. खूप गरम होत होते. एक कावळा कित्येक तास आकाशात उडत होता. कडाक्याच्या उन्हामुळे आणि सततच्या उडण्यामुळे त्याला खूप तहान लागली होती.

Thirsty Crow Story in Marathi

आपली तहान शमवण्यासाठी तो थोडा खाली उतरला आणि इकडे तिकडे पाणी शोधू लागला. पण त्याला जवळपास कुठेच पाणी दिसले नाही. त्याची अशी अवस्था झाली होती कि लवकर पाणी मिळाले नाही तर तो मारून जाईल.

तेवढ्यात अचानक कावळ्याला दूरवर पाण्याचे भांडे दिसले. उडत उडत तो लगेच तिथे पोहोचला आणि घागरीत डोकावू लागला.

घागरीत पाणी होते, पण ते भांड्यात इतके कमी होते की कावळा तिथे चोच लावून पाणी पिऊ शकत नव्हता.

कावळा काळजीत पडला आणि विचार करू लागला – ‘आता मी काय करू? मी माझी चोच पाण्यापर्यंत कशी पोहोचवू?’

तेव्हा त्याच्या मनात एक कल्पना आली.

भांड्याजवळ काही खडे पडलेले होते. कावळा चोचीत खडे घेऊन मडक्याजवळ पोहोचला आणि खडे भांड्यात टाकले. त्याने घागरीत अनेक खडे टाकले.

हळुहळु हळुहळु घागरीतील पाण्याची पातळी वाढू लागली हे पाहून त्याला आनंद झाला. आता पाणी प्यायला मिळेल अशी आशा कावळ्याने उठवली. या युक्तीच्या यशाने खूश होऊन त्यांनी दुप्पट उत्साहाने घागरीत खडे टाकण्यास सुरुवात केली.

शेवटी त्याची मेहनत फळाला आली. पाण्याची पातळी घागरीच्या तोंडापर्यंत वाढली. आता कावळा सहज पाणी पिऊ शकत होता. कावळ्याने आपल्या चोचीने पाणी प्यायले आणि तृप्त होऊन पुन्हा आकाशात उड्डाण केले.

तात्पर्य

जर आपण आपली युक्ती वापरली तर काहीही साध्य होऊ शकते.

तर हि होती तहानलेला कावळा मराठी गोष्ट. मला आशा आहे की तहानलेला कावळा मराठी गोष्ट (thirsty crow story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

2 thoughts on “तहानलेला कावळा मराठी गोष्ट, Thirsty Crow Story in Marathi”

    • खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशाच कमेंट्समुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असते.

      Reply

Leave a Comment