मी झाड बोलतोय, झाडाची आत्मकथा मराठी निबंध, Tree Autobiography Essay in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे झाडाची आत्मकथा या विषयावर मराठी निबंध (Tree autobiography essay in Marathi). झाडाची आत्मकथा या विषयावर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मी झाड बोलतोय या विषयावर मराठीत माहिती (Tree autobiography essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

मी झाड बोलतोय, झाडाची आत्मकथा मराठी निबंध, Tree Autobiography Essay in Marathi

निसर्गाने आपल्याला अनेक वरदान दिले आहेत आणि त्यात सर्वात महत्वाची भेट म्हणजे झाडे. झाडे हे आपल्याला अनेक प्रकारे मदत करत असतात. परंतु आता होत असलेल्या वाढत्या आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात लोक वृक्षतोड करत आहेत. म्हणूनच आपल्या सर्वांना झाडांचे महत्व समजायला हवे.

परिचय

सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना आज रस्त्यावर कोणीच नव्हते. आज तास लवकरच आलो होतो म्हणून सुद्धा कोणीच नव्हते बहुदा. हळूहळू चालायला सुरुवात केली असता अचानक पाठीमागून कोणीतरी आवाज दिल्यासारखे वाटले. आजूबाजूला कोणीच नव्हते म्हणून थोडे घाबरल्यासारखे वाटू लागले. तेवढ्यात एक आवाज आला मी झाड बोलतोय. त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते.

Tree Autobiography Essay in Marathi

मी जवळ जाताच झाड मला म्हणाले अरे, बरेच दिवसांपासून मला कोणाशी तरी बोलायचे होते, माझ्या मनातले सांगायचे होते. पण कोणीच माझ्याकडे लक्ष देत नव्हते, कोणालाच माझा आवाज ऐकू येत नव्हता. अन आज तू माझा आवाज ऐकलास, मला माझे मन हलके करायचे आहे.

झाडाचा जन्म आणि बालपण

एका छोट्या बीमधून माझा जन्म झाला. खूप दिवस मी जमिनीवर असाच एका मातीच्या ढिगाऱ्यात पडून होतो. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. काही दिवसांनी, जेव्हा पावसाळा आला, काही दिवसांनी पाऊस पडला, मला खूप बरे वाटले. जणू काही मला कोणीतरी एखाद्या थंड ठिकाणी नेऊन ठेवले आहे असे वाटू लागले. पावसाच्या ओलाव्याने मी हळूहळू बी मधून बाहेर आलो आणि सर्वात आधी हे जग पाहिले.

जेव्हा मी लहान होतो, तेव्हा जरी मला एकदम छोटा आवाज आला तरी मला भीती वाटायची. मला असे वाटायचे कि काही प्राणी, पक्षी किंवा मानव मला तोडतील किंवा मला त्यांच्या पायाखाली चिरडतील. पण हळू हळू दिवस जाय चालले आणि मी हळूहळू मोठा झालो.

झाडाने जीवनात केलेला संघर्ष

काही वर्षांनी मी आजूबाजूचे वातावरण माहिती करून घेण्यास सुरुवात केली, माझा जीव वाचवण्यासाठी मला अनेक अडथळे पार करावे लागले. उन्हाळ्यात उन्हाचा कडक उन्हाळा, कधी हिवाळ्यात कडाक्याची थंडी तर कधी जोरदार वादळे आली, कधी गारपीट झाली, तर कधी माणसांना माझ्या फांद्यांचा त्रास झाला म्हणून त्यांनी माझ्या फांद्या मोडल्या. या सर्व अडथळ्यांनी मला खूप त्रास झाला पण या अडथळ्यांनी मला इतके मजबूत केले आहे की आता मी कोणत्याही अडथळ्याचा सामना करू शकतो.

पण आता मी खूप मोठा झालो आहे. आधी मी लहान असल्यामुळे प्राणी माझा पाला खात असत पण आता मला यापुढे कोणताही प्राणी पाने खाऊ शकत नाही आणि मला त्यांची भीती वाटत नाही. आता मी उष्णता आणि थंडी देखील सहन करू शकतो. मी खूप उंच असल्यामुळे लोक माझ्या फांद्या तोडू शकत नाहीत. आता काही फुले आणि फळे माझ्यावर वाढू लागली आहेत. माझी फुले देवाच्या चरणी अर्पण केली जातात, जे मला खूप आवडते.

झाडाने केलेली सेवा

मुले माझी फळे खाण्यासाठी धावत येतात. माझी फळे खाल्ल्यानंतर लहान मुले खूप आनंदी होतात, हे पाहून मला खूप आनंद होतो. आपल्यामुळे कोणीतरी आनंदी होत आहे हे बघून माझ्या मनाला खूप शांती मिळते. मी तसेच माज्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व झाडांचा खरा हेतू हा आहे की आपण आयुष्यभर या पृथ्वीच्या प्राण्यांना काहीतरी देत ​​राहतो. आता माझ्या सर्व फांद्या मजबूत झाल्या आहेत. सोसाट्याचा वारा आला कि मला असे वाटते कि वारा जणू काही मला आनंदाने कुशीत घेऊन जोरात झोका देत आहे.

हळूहळू मी पूर्वीपेक्षा खूप मोठा आणि मजबूत होत गेलो, माझ्या सर्व फांद्या दूरवर पसरत होत्या. उन्हाळ्यात, जेव्हा एखादा वाटसरू उन्हाचा त्रास टाळण्यासाठी माझ्या खाली येऊन बसायचा, तेव्हा मी त्याला थंड सावली द्यायचो आणि फांद्या हलवून त्यांना हवा द्यायचो. पावसाळ्यात वाटसरू येतात आणि पावसापासून वाचवण्यासाठी माझ्या खाली उभे राहतात.

अनेक पक्षी माझ्या प्रचंड फांद्यांवर बसतात, माझी फळे खातात आणि त्यापैकी काही माझ्या फांद्यांवर घरटे बनवतात. काही पक्ष्यांना उडताना कंटाळा यायचा, म्हणून ते माझ्या डहाळ्याच्या वर विश्रांती घेतात आणि पुन्हा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जातात. ज्या पक्ष्यांनी माझ्या फांद्यांवर आपले घर बांधले होते ते रोज सकाळी आपल्या गोड आवाजाने मला सुद्धा उठवतात. सर्व पक्षी सकाळी आपल्या पिल्लांना खाऊ आणायला जातात आणि संध्याकाळी त्यांच्या घरट्यात परततात.

पक्षी गेल्यावर मी दिवस भर त्या लहान पिल्लांकडे पाहत राहायचो. मला त्या पक्ष्यांबद्दल एक अतुलनीय प्रेम निर्माण झाले होते जसे की आपण एक लहानसे कुटुंब झालो होतो.

झाडाचे शेवटचे दिवस

जसजसा वेळ जात होता तसतसे मी म्हातारा होत चाललो होतो आणि माझ्या काही शाखा सुकू लागल्या पण त्यांच्या जागी नवीन शाखा येत होत्या. माझे आयुष्य चांगले चालले होते. पण काहींनी माझ्या जाड फांद्या पाहून मला कापण्याचा विचार करायला सुरुवात केली. हे ऐकून मला खूप दुःख वाटले, मी आयुष्यभर माणसांना सर्व काही दिले परंतु आज तेच लोक त्यांच्या स्वार्थासाठी मला कापायचे असे बोलत होते.

काही दिवसांनी काही लोक आले आणि त्यांनी मला कापण्यास सुरुवात केली. मला खूप वेदना होत होत्या पण मी माझे दुखणे सुद्धा व्यक्त करू शकलो नाही. त्यांनी मला पूर्णपणे कापले आणि नंतर माझ्या फांद्यांमधून लाकडे बाजूला करून पाने इथेच जाळून टाकली. त्या दिवशी मला खूप रडू आले. पण मला गर्व आहे की मी आयुष्यभर प्रत्येकाची सेवा केली आणि माझ्या मृत्यूनंतरही माझे लाकूड लोकांसाठी उपयुक्त होते.

झाडाला पडलेला प्रश्न

पण आजही माझ्या मनात एक प्रश्न आहे, आपण मानवाला सूर्यापासून वाचवण्यासाठी भरपूर फळे, फुले, लाकूड, सावली दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मानवाच्या जीवनासाठी ऑक्सिजन दिला आहे, ज्याशिवाय मानव जगू शकत नाही. आम्ही आहे म्हणून पृथ्वी हिरवी आहे, तिचे सौंदर्य अजून सुद्धा टिकून आहे. पृथ्वीच्या वातावरणात विरघळनारा विषारी वायू सुद्धा आम्ही घेतो. तरीही मानवाने त्यांच्या थोड्या स्वार्थामुळे आम्हाला कापले. आम्हाला झाडांना याबद्दल खूप वाईट वाटते.

आम्हाला असे वाटते पण माणसांची अशी विचारसरणी आहे की जोपर्यंत तो कोणाकडून काही मिळत असते, तोपर्यंतच तो त्याला विचारतो आणि त्याचे काम झाले कि तो त्याच्याशी आपला संबंध तोडून टाकतो.

शेवटचे शब्द

शेवटी मी असे म्हणू इच्छितो की मी लहान असताना मला प्राण्यांची खूप भीती वाटत होती. प्राणी आपल्याला खातील आणि मला प्राण्यांची भीती वाटायची पण जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मला समजले की आम्हाला माणसांपासून धोका आहे आणि प्राण्यांपासून नाही. शेवटी मी एकाच सांगेन कि झाडे कापू नका जेणेकरून आपण या पृथ्वीला अजून समृद्ध करू शकू.

एवढे बोलून झाडाने झाडाने आपले बोलणे थांबवले. माझ्या मनात मात्र त्याचाच विचार चालू राहिला. जे काही झाडाने सांगितले रे सर्व खरे होते.

तर हा होता झाडाची आत्मकथा या विषयावर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास झाडाची आत्मकथा या विषयावर मराठी निबंध (Tree autobiography essay in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा निबंध आवडला असेल तर हा निबंध आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment