बुडबुड घागरी मराठी गोष्ट, Bud Bud Ghagri Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बुडबुड घागरी मराठी गोष्ट (bud bud ghagri story in Marathi). बुडबुड घागरी मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी बुडबुड घागरी मराठी गोष्ट (bud bud ghagri story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

बुडबुड घागरी मराठी गोष्ट, Bud Bud Ghagri Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला चांगले आई वडील, मित्र, पुस्तके यांची सोबत असेल आवश्यक आहे. लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

बुडबुड घागरी मराठी गोष्ट

एकदा एक उंदीर फिरत फिरत जंगलात गेला. तिथे त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले. हळुहळू त्यांची घट्ट मैत्री जमली. एक दिवस त्यांनी काहीतरी चांगला बेत करण्याचे ठरवले. सर्व बोलणी करून झाल्यावर त्यांनी खीर बनविण्याचे ठरवले.

Marathi Story - Bud Bud Ghagri Story in Marathi

माकड म्हणाले मी साखर घेऊन येतो, मांजर म्हणाले दूध घेऊन येतो आणि उंदीर म्हणाला कि मी शेवया घेऊन येतो. तिघांनी खीर बनवायला सुरूवात केली. खीर जवळपास पातेलेभर झाली होती आणि खिरीला मस्त सुगंध सुटला होता, असे वाटत होता खीर खूप मस्त झाली आहे.

खीर खाण्याच्या आधी माकड उंदराला आणि मांजराला म्हणजे चला आपण सर्व आंघोळ करून येऊ आणि नन्तर खीर खायला बसू. पण खिरीचा वास घेऊन मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते आणि त्याला आताच खीर खायची इच्छा झाली होती.

मांजर त्यांना म्हणाली तुम्ही दोघे जावा, मी इकडे थांबते आणि हि मी खीर चांगली शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे आणि हे बोलून ते दोघे आंघोळ करण्यासाठी निघून जातात.

मांजरीच्या तोंडाला आधीच पाणी सुटले होते, ते गेले आहेत हे बघताच मांजराने विचार केला थोडी खीर खाऊन बघते. थोडी खाली तरी यांना काही समजणार नाही. तिने थोडी खीर खाली पण तिला आता अजून खीर खवावी वाटली.

तिने पुन्हा थोडी खीर घेतली असे करत करत सगळी सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर अंघोळ करून आले आणि पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे. त्यात खीर नव्हती. त्या दोघांनी मांजराला विचारले कि खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले कि मला पण माहित नाही, तुम्ही गेल्यावर मी थोडा वेळ झोपले होते.

मग माकडाने खीर कोणी खाली आहे याचा तपास लावण्यासाठी एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी ठेवली. त्यावर माकड उभे राहिले आणि म्हणाले हुप हुप करी, वरचे डोंगरी, जर मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही.

माकड आला कि मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी. पण तेव्हा सुद्धा घागर काही बुडाली नाही.

आता मांजराची बारी होती. मांजर हे आधीच घाबरले होते. ते घाबरत घाबरतच घागरीवर उभे राहिले व म्हणाले म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, जर मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी.

मांजराने हे बोलताच घागर बुडू लागली. मांजर पाण्यात बुडाली, माकड आणि उंदराने तिला मदत सुद्धा केली नाही. अशाप्रकारे चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.

तात्पर्य

नेहमी खरे बोलावे.

तर हि होती बुडबुड घागरी मराठी गोष्ट. मला आशा आहे की बुडबुड घागरी मराठी गोष्ट (bud bud ghagri story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment