अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयची धाड

CBI Raids on Anil Deshmukh House – माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तेवर सीबीआयने छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

CBI Raid On Anil Deskmukh Home

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यावर दिलीप वळसे-पाटील यांना महाविकास आघाडीने गृहमंत्रीपद दिले आहे.

महाविकास आघाडीची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक

अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली.

हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

सर्व काही समोर येईल आणि अनिल देशमुख निर्दोष सुटतील अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी छापेमारी करणे म्हणजे भाजपाने महाविकास आघाडीच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेले कट-कारस्थान आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना केला.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

हे छापे आणि करण्यात आलेली कारवाई हा एक कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या धाडी टाकून सरकारला बदनाम करण्याचा प्रकार होत आहे आणि त्याचा जाहीर निषेध व्हायला हवा असे त्यांनी मत व्यक्त केले. अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, सर्व चौकशीला संपूर्ण सहकार्य केले आहे. या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल अजूनपर्यंत तरी आला असल्याचे मी ऐकले नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा निषेध

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी याचा जाहीर विरोध केला आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचे पथक आले असून धाडसत्र चालू असल्याची बातमी वाऱ्यासारखी नागपुरात पसरली. हि बातमी कळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी धाव घेतली.तेथे जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी या धाडींचा निषेध करीत घोषणाबाजी केली.

Share on:

आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.

error: Content is protected !!