सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर (DCC Bank Satara elections 2021) आज सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांची नावे हि सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.
DCC Bank Satara Elections 2021, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक २०२१
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज आज भरले गेले होते. त्या संदर्भात, बँकेचे विद्यमान संचालक मंडळ सुद्धा हजार होते. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नेते रामराज नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले. सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा समावेश होता.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी कोण
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीनदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनिल देसाई यांना उपाध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आपली निवड व्हावी म्हणून सातारा जावळी मतदारसंघाचे विद्यमान मदत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती.
शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा पत्ता कट
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन मंडळामध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटाने शिवेंद्रसिंह राजे भोसले पुन्हा बँकेचे अध्यक्ष होतील असा आग्रह धरला होता. तर गेल्या वर्षी अध्यक्षपदाची संधी हुकलेल्या नितीन पाटील यांना अध्यक्ष करावे हि मागणी राष्ट्रवादी पक्षातून झाली होती.
पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार ज्यांनी अलीकडेच हे स्पष्ट केले की सहकारी निवडणुका या स्थानिक पातळीवर होत आहेत आणि पक्षपाती पातळीवर नाहीत. त्यामुळे काही लोकांना असे वाटले होते कि ते पुन्हा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना अध्यक्ष पदाची संधी देतील. शेवटी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नितीन पाटील यांना अध्यक्षपदाचा मान दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कशी झाली, DCC Bank Elections
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोठ्या प्रमाणात चुरशीची झाली. ११ जागा बिनविरोध असल्या तरी १० जागांवर खूप मोठ्या प्रमाणात राजकारण झाले होते. तथापि, निवडणुकीच्या घोषणेनंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केवळ निवडणूकच नव्हे तर बँकेचे अध्यक्षपद सुद्धा घेण्याची योजना आखली होती.
निवडणुकींमधील धक्कादायक निकाल
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल हा एकदम धक्कादायक ठरला होता. पाटण तालुक्यातुन लढत असलेले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि जावली तालुक्यातुन लढत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता.
पाटण तालुक्यातून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना हरवून सत्यजितसिंह पाटणकर तर जावली तालुक्यातुन शशिकांत शिंदे यांना हरवून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले होते.
आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना होती पहिली पसंत
शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशिवाय किंवा त्याच्या निर्णयावर अवलंबून बँकेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्या कोणाचा विचार करणे शक्य होणार नाही असे बोलले जात होते. बँक राजकारणावर त्यांची मजबूत पकड, इतर लोकांची असलेले संबंध, राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्याशी घेतलेली भेट आणि सर्व मतांचा विचार करन निर्णय घेणे यामुळे तेच अध्यक्ष होतील असे बोलले जात होते.
नितीन पाटील कोण आहेत
नितीन पाटील हे (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. नितीन पाटील हे सलग तीन वेळा बँकेच्या संचालक पदावर निवडून आले आहेत. आपल्या मतदारसंघातील जागा बिनविरोध करून नितीन पाटील यांनी मतदारसंघावर आपली भूमिका सिद्ध केली होती. अध्यक्षीय शर्यतीत नितीन पाटील यांनी सुद्धा कठोर परिश्रम केले होते म्हणून त्यांच्या नावावर चांगली चर्चा झाली.
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेकडे लक्ष लागून राहिलेले हाेते. अखेर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नितीन पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे.