माकड आणि मगरीची गोष्ट, Monkey and Crocodile Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हुशार माकड आणि मूर्ख मगर यांची गोष्ट (Monkey and Crocodile story in Marathi). माकड आणि मगरीची हि गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी माकड आणि मगरीची गोष्ट (Monkey and Crocodile story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

माकड आणि मगरीची गोष्ट, Monkey and Crocodile Story in Marathi

काही वर्षांपूर्वी, एका नदीच्या किनारी एक गुलाबी सफरचंदाच्या झाडावर एक माकड राहत होते. माकड हे एकटेच राहत होते. त्याला कोणीच मित्र नव्हता.

Monkey and Crocodile Story in Marathi

एक दिवस नदीतून एक मगर बाहेर आली. मगर हळूहळू झाडावर चढली आणि त्या माकडाला म्हणाली की मी खूप लांब प्रवास करून आलो आहे आणि खूप भुकेला असल्याने अन्नाच्या शोधात आहे. दयाळू माकडाने त्याची दया आली. त्याने त्याला काही गुलाबी सफरचंद खायला दिली. मगरीने त्याचे आभार मानले आणि त्याला विचारले की तो पुन्हा माकडाला असाच भेटेल का?

माकडाला सुद्धा आनंद झाला, माकड सुद्धा एकटेच असल्याने त्याने लगेच होकार दिला.

अशाप्रकारे मगर दररोज माकडाला भेटायला येऊ लागले. माकड रोज त्याला गुलाबी सफरचंद देत असत. माकड आणि मगर सफरचंद खात अनेक गोष्टींवर बोलत बसत.

मगरीने त्या माकडाला सांगितले की त्याला एक पत्नी आहे आणि ते नदीच्या दुसऱ्या बाजूला राहत आहे. आपल्या पत्नीसाठी म्हणून मगरीने सफरचंद मागितले आणि माकडाने सुद्धा त्याला बरीच गुलाबी सफरचंद आणून दिली.

मगरीच्या बायकोला सुद्धा गुलाबी सफरचंद आवडत होते. हळूहळू मगरीच्या बायकोने आपल्या नवऱ्याकडून रोज सफरचंद मागवून खाण्यास सुरुवात केली.

एकदा मगरीच्या पत्नीने असा विचार केला की जर माकड फक्त हे गोड सफरचंद खातो तर त्याचे शरीरही गोड असले पाहिजे. त्याचे काळीज सुद्धा किती गोड लागेल. तिने माकडाचे काळीज खाण्याचा निर्धार केला.

तिने तिच्या नवऱ्याला माकडाला त्याच्या मित्राला घरी बोलवायला सांगितले जेणेकरून ती त्याला भेटू शकेल आणि त्याला मारून त्याचे काळीज खाऊ शकेल. पण मगर माकडाला असे सहजासहजी घरी बोलावणार नव्हते, त्यासाठी काहीतरी युक्ती शोधावी म्हणून मगरीच्या बायकोने खूप आजारी पडल्याचे सोंग घेतले. तिने मगरीला सांगितले की, मी जर माकडाचे काळीज खाल्ले तरच आता बरी होईल असे मला डॉक्टरांनी सांगतिले आहे. जर आता तुम्हाला आता माझा जीव वाचवायचा आहे तर मला माकडाचे काळीज आणून द्या असे तिने सांगितले.

मगर सुद्धा मूर्ख होता, त्याने लगेच आपल्या पत्नीवर विश्वास ठेवला. त्या दिवशी तो माकडाला भेटायला गेला. त्याने आपल्या पत्नीने तुला भेटायला बोलावले आहे असे माकडाला सांगितले. माकडाला सुद्धा खूप आनंद झाला. त्याने सोबत सफरचंद घेतले आणि जायला निघाला.

मगरीने माकडाला सांगितले की तो नदीच्या पलीकडे राहतो, म्हणून तू माझ्या पाठीवर बस. नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर मगरीने त्याला सांगितले कि माझ्या बायकोला तुझे काळीज खायचे आहे म्हणून मी आज तुला घेऊन जात आहे.

हे ऐकून माकडाला धक्का बसला आणि त्याने विचार करण्यास सुरवात केली. त्याने मगरीला सांगितले की मी तुझ्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी नक्की काळीज देईन. मी तुझा खरा मित्र आहे, पण मी तुला काळीज देणार कसा? मी माझे काळीज हे झाडात ठेवून आलो आहे. त्याने मगरीला सांगितले कि आपण परत जाऊ, काळीज घेऊन आणि पटकन परत येऊ.

मूर्ख मगरीने लगेच माकडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा माकडाच्या ठिकाणी आला. किनारी पोहचताच माकडाने मगरीच्या पाठीवरून उडी मारली आणि सरसर वेगाने झाडावर चढला.

जेव्हा माकड सुरक्षिततेसाठी झाडावर चढले त्याने मगरीकडे खाली पाहिले आणि म्हणाले, आता तू तुझ्या बायकोकडे परत जाऊ शकतोस आणि तिला सांग की तिचा नवरा या जगातील सर्वात मोठा मूर्ख आहे. कोणी आपले काळीज काढून ठेवत नाही. आपल्या पत्नीसाठी तू माझा जीव घेण्यास तयार झालास.

अशाप्रकारे माकडाने युक्ती वापरून स्वतःची सुटका करून घेतली.

तात्पर्य: मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू कधीही चांगला असतो.

तर हि होती माकड आणि मगर यांची गोष्ट. मला आशा आहे की माकड आणि मगर यांची गोष्ट (Monkey and Crocodile story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment