मूर्ख उंटाची गोष्ट, Murkh Oont Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मूर्ख उंटाची गोष्ट (Murkh Oont story in Marathi). मूर्ख उंटाची गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी मूर्ख उंटाची गोष्ट Oont Gadhav story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

मूर्ख उंटाची गोष्ट, Murkh Oont Story in Marathi

एका जंगलात एक सिंह आपल्या मित्रांसोबत आनंदाने राहत होता. त्याचे मित्र होते एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता. रोज आपली भूक भागवण्यासाठी आणि आपल्या मित्रांना अन्न देण्यासाठी सिंह शिकार करत असे. सिंहाने शिकार केली कि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करत असत.

Murkh Oont Story in Marathi

एके दिवशी एक उंट आपला रस्ता चुकतो आणि चुकून सिंहाच्या गुहेजवळ पोचतो. उंट सिंहाला म्हणतो कि मला मारू नका, मी माझा रस्ता चुकल्यामुळे इकडे आलो आहे. मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही. सिंह उंटाला म्हणतो कि ठीक आहे तू सुद्धा आमच्यासोबत राहू शकतोस. मी, कावळा, कोल्हा आणि चित्ता आणि आता तू आपण सगळे इथे आनंदाने राहू.

एके दिवशी अशीच शिकार करत असताना सिंह खूप जखमी झाला. त्याला खूप लागल्यामुळे तो हळूहळू अशक्त होत जातो. जखमी असल्यामुळे त्याने आपली शिकार करणे थांबवलेले असते.

चित्ता आणि कोल्हा स्वतःला आणि सिंहाला पुरेल एवढी मोठी शिकार करू शकत नव्हते. त्यांनी या आधी कधी शिकार केली नसल्यामुळे कधी कधी ते परत रिकाम्या हातानेच कोणतीच शिकत न करता परत येत असत. दिवसेंदिवस शिकार न केल्यामुळे त्यांना जगणे खूप कठीण झाले होते.

एका वेळी त्यांना ३-४ दिवस काहीच शिकार मिळत नाही आणि सर्वजण भुकेने व्याकुळ झालेले असतात. एका संध्याकाळी कोल्हा सिंहाकडे जातो आणि त्याला म्हणतो महाराज आता आपण सर्व ४-५ दिवसांपासून उपाशी आहोत. आम्ही शिकार सुद्धा करू शकत नाही, त्यापेक्षा एक काम करा. तुम्ही मला खा आणि तुमचा जीव वाचवा.

हे ऐकून सिंह बोलला, नाही, मी तुला ठार मारून खाऊ शकत नाहीस. आपण सर्व मित्र आहे. कोल्हा गेला कि चित्ता येतो, चित्ता सुद्धा तेच बोलतो. तो कोल्हासारखीच सिंहाला आपल्याला खाण्याची विनंती करतो. पण सिंह त्याला सुद्धा मारण्याचे टाळतो.

शेजारीच उंट बसलेला असतो, तो सुद्धा विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच तो त्यांना मारत नाहीये. सिंहाचे माझयावर सुद्धा प्रेम आहे आणि मी असे बोललो तर सिंहाला सुद्धा बरे वाटेल आणि मी सुद्धा त्यांचा मित्र आहे असे सर्वांना वाटेल.

उंट सुद्धा सिंहाला जाऊन म्हणाला, महाराज मला तुम्ही खा, मी मोठा आहे आणि मला खाल्ले तर तुमचे सर्वांचे पोट भरेल. उंट असे बोलताच सिंह, कोल्हा, चित्ता त्याच्यावर तुटून पडतात आणि त्याला ठार मारतात. उंट आपल्या मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.

तात्पर्य – आपला अतिशहाणपणा आपल्या जीवावर बेतू शकतो.

तर हि होती मूर्ख उंटाची गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला मूर्ख उंटाची गोष्ट (Murkh Oont story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment