आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रविचंद्रन अश्विन यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Ravichandran Ashwin information in Marathi). रविचंद्रन अश्विन यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रविचंद्रन अश्विन यांच्यावर मराठीत माहिती (Ravichandran Ashwin biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.
रविचंद्रन अश्विन माहिती मराठी, Ravichandran Ashwin Information in Marathi
रविचंद्रन अश्विन हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. रविचंद्रन अश्विन हा एक अष्टपैलू खेळाडू असून तो नाही कोण उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करतो आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.
[table id=6 /]
परिचय
रविचंद्रन अश्विन हा भारतीय संघ सोडून तामिळनाडू क्रिकेट इंडियन प्रीमियर लीग मध्ये दिल्ली संघाकडून सुद्धा खेळतो. कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद पद्दतीने ५०, १००, १५०, २००, ३००, ४०० विकेट्सचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय आहे.
तो सध्या कसोटी क्रिकेटमधील मानांकनानुसार सर्वोच्च क्रमांकाचा फिरकीपटू आहे, आणि आयसीसी प्लेयर रँकिंगमध्ये भारताकडून पहिल्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 8 वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत जे आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमले नाही.
वैयक्तिक जीवन
अश्विनचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी एका तामिळ कुटुंबात झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव रविचंद्रन आणि आईचे नाव चित्रा होते. रविचंद्रन हे एक वेगवान गोलंदाज म्हणून क्लबमध्ये क्रिकेट खेळले आहेत. रविचंद्रन अश्विनचे प्राथमिक शिक्षण पद्मा शेषाद्री बाल भवन आणि सेंट बेडे यांच्या अँग्लो इंडियन उच्च माध्यमिक शाळेत झाले. रविचंद्रन अश्विनने माहिती तंत्रज्ञानामध्ये बीटेक केले आहे.
१३ नोव्हेंबर २०११ रोजी अश्विनने त्याची बालपणाची मैत्रीण प्रीति नारायणन हिच्यासोबत लग्न केले. त्यांना २ मुली आहेत.
करिअर
रविचंद्रन अश्विन हा आधी तमिळनाडू आणि दक्षिण विभागाकडून गोलंदाज म्हणून खेळत असे. तो २०१० साली चेन्नई सुपर किंग्स कडून खेळला आणि त्या वर्षी त्याने चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना सर्वाधिक विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच्या या खेळाच्या जोरावर त्याला सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय करिअर
२०१० च्या इंडियन प्रीमियर लीगमधील रविचंद्रन अश्विनच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर अश्विनची निवड मे-जून मध्ये होणाऱ्या झिम्बाब्वे दौर्यासाठी करण्यात आली. त्याने आपले एकदिवसीय करिअरची सुरुवात जून २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध केली. या सामन्यात त्याने ३२ चेंडूत ३८ धावा केल्या आणि ५० धाव देऊन २ विकेट्स घेतल्या.
अश्विनने टी -२० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना हरारे येथे केले. हा सामना भारताने सहज जिंकला. या झालेल्या सामन्यात त्याने चार षटकांत फक्त २२ धावा देत १ गडी बाद केला. नंतर ऑक्टोबरमध्ये, निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा अश्विनला खेळण्याची संधी दिली. या सर्व सामन्यात अश्विन हा सर्वात चांगला गोलंदाज ठरला. त्याने नऊ षटकांत फक्त ३४ धावा देत १ विकेट घेतली आणि भारताला विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.
नोव्हेंबर ते डिसेंबर २०१० मध्ये न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावर झालेल्या सर्व ५ सामन्यात अश्विन खेळला. हे पाचही सामने भारतने जिंकले होते. या मालिकेत अश्विनने सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या. अश्विन हळू हळू भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून उदयास आला.
नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडीजच्या भारत दौऱ्यावर अश्विनने तेव्हापर्यंतचा आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवला. या दौऱ्यात तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांचे आयोजन होते. तेव्हा अश्विन आणि ओझा हे दोन भारतीय संघात फिरकीपटू होते. अश्विनने पहिल्या डावात 8१ धाव देत ३ आणि दुसऱ्या डावात ४७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने हा सामना सहन जिंकला. त्याला सामनावीराचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि आपल्या कसोटी पदार्पणात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
कोलकाता येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात अश्विनने एकूण चार विकेट्स घेतल्या जिथे भारताने एक डावाच्या फरकाने विजय नोंदविला. मुंबईतील तिसर्या कसोटी सामन्यात त्याने १५६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्या सामन्यात वेस्ट इंडीजने एकूण ५९० धावा केल्या होत्या. अश्विनने भारताच्या पहिल्या डावात ११8 चेंडूंत १०3 धावा कुटत आपले पहिले कसोटी शतक झळकावत भारताची एकूण धावसंख्या ४८२ वर नेली. अश्विन हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. अश्विन हा एकाच सामन्यात शतक आणि ५ गडी बाद करणारा तिसरा भारतीय बनला. अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला सामनावीर तसेच मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विन पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने ३१ आणि ५४ धावा देत अनुक्रमे ६ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात त्याने ६९ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या गोलंदाजीमुळे भारताने हे दोन्ही सामने जिंकले.
अश्विन हा फेब्रुवारी-मार्च २०११ दरम्यान झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या भारत दौर्यावर अत्यंत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चेन्नई येथे पहिल्या सामन्यात १०३ धावा देऊन ७ आणि ९५ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात ६३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. मोहाली येथे झालेल्या कसोटीत त्याने एकूण ४ विकेट्स घेतल्या. दिल्ली येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात त्याने ५७ धावा देऊन ५ आणि ५५ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. अश्विनने घेतलेल्या २९ विकेट्सच्या जोरावर भारताने सलग ४ सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाला प्रथमच व्हाईट वॉश केले.
नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फ्रिडम चषक कसोटी मालिकेत अश्विनने चांगली कामगिरी केली. या मालिकेच्या दरम्यान, तो कसोटी क्रिकेटमधील १५० गडी बाद करणारा सर्वात वेगवान भारतीय खेळाडू ठरला. नागपुरातील तिसर्या कसोटी सामन्यात त्याने ९८ धावा देऊन १२ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने हि मालिका २-० ने सहज जिंकली.
डिसेंबर २०१६ मध्ये अश्विन ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसीचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आणि आयसीसीचा सर्वश्रेष्ठ कसोटी खेळाडू म्हणून निवडले. २०१६ मध्ये त्याने केलेल्या कामगिरीसाठी त्याला आयसीसीने अंतिम वर्ल्ड टेस्ट ११ खेळाडूंमध्ये निवडले होते.
अश्विनने इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारी २०२१ रोजी चेन्नई मधे आपले पाचवे कसोटी शतक झळकावले. हे त्याच्या कॅरीरमध्ये तिसऱ्यांदा झाले जेव्हा त्याने शतक मारून ५ गडी सुद्धा बॅड केले होते. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याने जोफ्रा आर्चरला बाद करून आपला 400 बळींचा टप्पा पूर्ण केला.
इंडियन प्रीमियर लीग करिअर
अश्विनने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात २००९ मधे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळून केली होती. २०१० आणि २०११ मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जबरोबर त्याने सलग दोन आयपीएल विजेतेपद जिंकले. प्रत्येक मोसमात त्याने अनुक्रमे १३ आणि २० बळी घेतले.
चेन्नई सुपर किंग्ज संघावर बंदी घालण्यात आल्यानंतर २०१६ आणि २०१७ हंगामात पुणे सुपरजायंट्स कडून खेळला. २०१८ सालचा हंगाम तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला. २०१९ मधे त्याला दिल्लीच्या टीमने विकत घेतले आणि आता तो दिल्ली संघाकडून खेळात आहे.
करिअर मधील महत्वाचे टप्पे
अश्विनने केवळ ४५ कसोटी सामने खेळताना २५० बळी मिळवले आहेत. अश्विनने अवघ्या ६६ कसोटी सामन्यांमध्ये ३५० बळी मिळवले आहेत.
अश्विन हा एकाच कसोटी सामन्यात शतक झळकावणारा आणि त्याच कसोटी सामन्यात पाच बळी घेणारा पहिला क्रिकेटपटू आहे. अशी कामगिरी अश्विनने ३ वेळा केली आहे.
अश्विन हा तिसरा असा खेळाडू आहे, ज्याला पदार्पणात सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.
२०१३ मध्ये चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत अश्विनने सर्वाधिक २८ विकेट्स घेऊन भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या विक्रमाला ला मागे टाकले.
२०१३ मध्ये रोहित शर्मा आणि अश्विन यांच्यातील २८० धावांची भागीदारी हि सातव्या विकेटसाठी आतापर्यंची सर्वोच्च भागीदारी आहे.
२०१६ मध्ये रविचंद्रन अश्विन टी -२० मधे ५० बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
भारताच्या २०१६-१७ मधे अश्विनने १३ कसोटी सामन्यांत ६४ विकेट्स घेतल्या आणि कपिल देवच्या १० कसोटी सामन्यात ६३ बळींचा विक्रम मोडला.
नोव्हेंबर २०१५ मधे तो सर्वात जलद गतीने १५० विकेट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज बनला होता.
२७ नोव्हेंबर २०१७ रोजी, श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात अश्विनने आपल्या ५४ व्या कसोटी सामन्यात ३०० बळी मिळवण्याचा विक्रम केला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये तो कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळी घेणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला.
मिळालेले पुरस्कार
- २०१४ मध्ये अर्जुन पुरस्कार
- २०१३, २०१५, २०१६, २०१७ मध्ये आयसीसी टेस्ट टीम ऑफ द इयर पुरस्कार
- २०११-२० मध्ये आयसीसी टेस्ट टीम ऑफ द डीकेड पुरस्कार
- २०१०-११ आणि २०१५-१६ मधे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा बीसीसीआयचा दिलीप सरदेसाई पुरस्कार
- २०१२-१३ मध्ये बीसीसीआयचा वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी पॉली उमरीगर पुरस्कार
- २०१६ मध्ये आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टेस्ट प्लेअर पुरस्कार
- २०१६ मध्ये आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार
- २०१६-१७ मध्ये सीएट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार
तर हा होता रविचंद्रन अश्विन यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास रविचंद्रन अश्विन यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Ravichandran Ashwin information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.