याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.

Santosh Bangar, Shiv Sena MLA from Hingoli broke his FD of 90 lakhs to help Covid-19 patients – हि आहे शिवसेना, याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन आणण्यासाठी शिवसेना आमदाराने मोडली 90 लाख रुपयांची एफ.डी.

शिवसेना म्हणजे नक्की काय

गेल्या पन्नास वर्षपासून फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आपला ठसा उमटवणारा, चळवळीतून उभा राहिलेला शिवसेना. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलेल्या तत्वावर शिवसेना पक्ष सुरु झाला.

खरा शिवसैनिक आणि शिवसेना म्हणजे नक्की कोण हे आज हिंगोली जिल्ह्यातील एका शिवसेनेच्या आमदाराने दाखवून दिले.

Santosh Bangar

कोरोनाचे संपूर्ण राज्यात थैमान

सध्या संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दवाखाने, बेड, आणि त्यासाठी लागणाऱ्या औषधांसाठी वणवण फिरावे लागत आहे. या सर्व परिस्थितीला हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवस रात्र मेहनत करत आहे आणि महाविकास आघाडी पक्ष सुद्धा त्यांना तेवढेच सहकार्य करत आहेत.

महाविकास आघाडीचे शर्थीचे प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व लोकांना जसे जमेल तसे लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या मुख्यमंत्र्याचे आवाहन मनावर घेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी तात्काळ दखल घेत आपल्या मतदारसंघातील लोकांना कोरोनासाठी लागणारी औषधे, रेमडेसिवीर इंजक्शन जास्त धावपळ न करता मिळावीत यासाठी आपली ९० लाखांची एफडी मोडून सर्व आमदारांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अवस्था

देशात कोरोनाच्या दुसरा लाटेने थैमान घातले आहे. त्याला महाराष्ट्र सुद्धा अवपाडा राहिला नाही, कोरोबा रुग्णांना बेड,रेमडेसिवर इंजेक्शन यांचा खूप मोठा तुटवडा भासत आहे. आज हजारो रुग्ण रेमडीसीविर या इंजेक्शनसाठी तडफडत आहेत. हिंगोली जिल्हातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सुद्धा जिल्हा प्रशासन रक्कमेच्या अभावी रेमडीसीविर हे इंजेक्शन आणण्यास हतबल झाले होते. यावेळी, पैशापेक्षा आपला मतदार राजा हा जास्त महत्वाचा आहे हे ओळखून हिंगोली जिल्हातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे धावून आले.

संतोष बांगर यांची मदत

कोरोना रुग्णांना वेळेवर रेमडीसीविर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी चक्क स्वतःची एफ.डी मोडून नव्वद लाख रूपये हे इंजेक्शनच्या वितरकांना दिले. आमदार बांगर यांच्या या कृतीमुळे सामान्य जनतेतून त्यांच्याप्रती समाधान व्यक्त करण्यात येत आहेत. आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव वाचवण्यासाठी शिवसेनेच्या या आमदाराने आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे.

याआधी सुद्धा केली होती मदत

सुरुवातीच्या काळात जेव्हा रेमडीसीविर इंजेक्शन्स ९०० रुपये दराने होती तेव्हा त्यांनी कोरोना रुग्णांना हि इंजेक्शन्स मोफत वाटली होती. मात्र त्यानंतर या इंजेक्शन्सचा तुटवटा निर्माण झाला अन् इंजेक्शन्सचे दर सुद्धा वाढले. त्यानंतर १८०० रुपयांनी इंजेक्शन्स होऊन सुद्धा त्यांनी काही इंजेक्शन्स वाटले. लोकांना आमदार संतोष बांगर यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात हे समजायला लागल्यावर त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या. त्यातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला.

आपली स्वतःची ९० लाखांची एफ. डी. मोडली

जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे असेल तर आधी आपल्याला पैसे गुंतवावे लागतील आणि एवढी मोठी रक्कम परत लवकर भेटली नाहीतर काय करायचे म्हणून एकही वितरक हे इंजेक्शन्स मागवत नव्हता. त्यातच हि गोष्ट आमदार संतोष बांगर यांच्या कानावर ही बाब गेली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील ९० लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली.

संजय बांगर यांचे विचार

आमदार संतोष बांगर यांच्या या मदतीमुळे शकडो कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार असून उद्या सोमवारपासून प्रत्यक्ष इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबावर संकट कोसळले आहे. त्याचे सुखाचे संसार विस्कटून गेले आहेत. आपल्याच मतदारसंघातील लोक, नातेवाईक, आप्तेष्ठ मृत्यूशी झुंज देत असतांना त्यांना वाचवण्यासाठी मी एक छोटा प्रयत्न केला असे संतोष बांगर म्हणाले.

4 thoughts on “याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.”

  1. मनापासून कौतुक. इतरांनीही असेच काम केले पाहिजे.

    Reply
  2. माननीय श्री आमदार संतोष बांगर साहेबांना जे जमले ते बाकीच्या आमदारांना का जमत नाही.

    Reply

Leave a Comment