आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्मार्ट व्हिलेजला भेट मराठी निबंध, smart village la bhet Marathi nibandh. स्मार्ट व्हिलेजला भेट मराठी निबंध हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी स्मार्ट व्हिलेजला भेट मराठी निबंध, smart village la bhet Marathi nibandh वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
स्मार्ट व्हिलेजला भेट मराठी निबंध, Smart Village La Bhet Marathi Nibandh
स्मार्ट व्हिलेज ही भारतातील राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक सरकारांनी स्वीकारलेली संकल्पना आहे, जी महात्मा गांधींच्या आदर्श ग्राम आणि आत्मनिर्भरता या संकल्पनेतून साकारलेल्या सर्वांगीण ग्रामीण विकासावर केंद्रित एक उपक्रम आहे.
परिचय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधींच्या जन्मदिनी संसद आदर्श ग्राम योजना, स्मार्ट सिटीज आणि डिजिटल इंडिया व्यतिरिक्त, भारतासाठी एक विकास कार्यक्रम म्हणून चालू केली. प्रत्येक खासदार आणि मंत्री यांनी एक ग्रामीण गाव दत्तक घेणे आणि २०१९ पर्यंत अशी गावे आणि शहरे एक आदर्श म्हणून विकसित करणे हे संसदपटूंच्या आदर्श गाव योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
एकदा असेच आम्ही दिवाळीची सुट्टी पडण्याआधी आंम्हाला आमच्या सरांनी एका आदर्श गावात भेट द्यायला तुम्हाला घेऊन जाणार आहे असे सांगितले. आम्ही सर्वजण खूप उत्साही होतो. कधी तो दिवस येणार आहे याची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो.
स्मार्ट व्हिलेजला आमची भेट
शेवटी तो दिवस उजाडला, आम्ही सर्व शाळेत जमा झालो. आम्ही पुण्याजवळ एका स्मार्ट गावात जाणार होतो. आम्हा सगळ्यांना जाण्यासाठी शाळेने एक बसचे नियोजन केले होते. साधारण १ तास बसचा प्रवास केल्यांनतर आम्ही गावात पोचलो. गावाच्या सुरुवातीपासूनच सर्व वातावरण हे पूर्णपणे वेगळे होते. आम्हाला असे वाटले कि आम्ही सर्व एका वेगळ्या ठिकाणी आलो आहोत.
शहरामध्ये राहत असताना जीवन इतक्या वेगाने पुढे सरकते की रहिवाशांना वेळ कधी जातो काळात सुद्धा नाही. वाहने सर्वत्र दिसतात. प्रत्येकजण ठिकाणाहून दुसरीकडे धावताना दिसतो. प्राणी आणि पक्षी खूप कमी प्रमाणात दिसतात.
स्मार्ट व्हिलेजचे रूप
आतापर्यंत अशा आदर्श गावाला ही माझी पहिलीच भेट होती. गावातील लोकांना ये जा करण्यासाठी बसची चांगली सोय होती. रस्त्याच्या आजूबाजूला हिरवीगार शेतं होती. शेतकऱ्यांनी हिवाळी पिकाची पेरणी केली होती आणि झाडांना काळजीपूर्वक पाणी देत होते. इतका विस्तीर्ण हिरवागार पसारा मी शहरात कुठेही पाहिला नव्हता.
बस एका तलावाजवळ थांबली जिथे काही शेतकरी काम करत होते. ऊस, कापूस अशी अनेक बागायती पिके दिसत होती. आम्हाला एका शाळेत पोहोचायचे होते. शाळेचे सर्व रस्ते सिमेंटचे होते. शाळा हि संपूर्ण सीसीटीव्ही ने नियंत्रित केली होती. शाळेची इमारत तीन मजली होती.
एक शिक्षक काही मुलांची कसरत करून घेत होते. त्याच्याभोवती काही मुलं खेळत होती. मी एका मुलाला शाळेबद्दल विचारले असता त्याने खूप काही सांगितले. शाळा बघून झाल्यावर आम्ही गावात फेरफटका मारू लागलो.
गावाचे ग्रामपंचायत कार्यालय हे संगणकीकृत होते. ऑफिसच्या बाहेर सुद्धा सीसीटीव्ही होते. संपूर्ण गावात सौरऊर्जा पॅनल बसवले असल्यामुळे गावात विजेची कधीच कमतरता नसते असे आम्हाला समजले. गावात १ बँक, १ छोटा दवाखाना सुद्धा होता जेणेकरून कोणाची सुद्धा गैरसोय होऊ नये.
सर्व फिरून झाल्यांनतर आम्ही आता जेवण करण्याचे ठरवले. गावच्या सरपंचानी आम्ही येणार आहे म्हणून आमच्या सर्वांना आधीच जेवण तयार करून ठेवले होते. हे सर्व पाहून मला त्या गावाबद्दल खूप खूप आनंद वाटला.
गावात मोजकेच तरुण दिसत होते, चौकशी करता असे समजले कि गावात शक्यतो सर्वजण चांगले शिकलेले असून अनेक मोठ्या पदांवर कार्यान्वित आहेत. गावच्या वार्षिक यात्रा, गणपती, होळी अशा सणांना ते सर्व येतात.
सर्व गाव पाहून झाल्यावर मला खूप प्रसन्न वाटले. मी सुद्धा आता ठरवले होते कि मी मोठे झाल्यावर आमच्या गावचा सुद्धा असाच विकास कारेन.
निष्कर्ष
गाव हे महत्त्वाचे आहे कारण ते आपल्या देशासाठी कृषी उत्पादनाचे प्राथमिक क्षेत्र आहे. गाव हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यातही त्याची मोठी भूमिका आहे. अशीच गावे जर स्मार्ट आणि आदर्श असतील तर सर्वच बाकीची गावे अशांना आदर्श मानून आपला देश जगात नावारूपाला येईल.
तर हा होता स्मार्ट व्हिलेजला भेट मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास स्मार्ट व्हिलेजला भेट मराठी निबंध, smart village la bhet Marathi nibandh हा लेख आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.