बहिणाबाई चौधरी मराठी माहिती, Bahinabai Chaudhari Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बहिणाबाई चौधरी मराठी माहिती निबंध (Bahinabai Chaudhari information in Marathi). बहिणाबाई चौधरी हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी बहिणाबाई चौधरी मराठी माहिती निबंध (Bahinabai Chaudhari information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

बहिणाबाई चौधरी मराठी माहिती, Bahinabai Chaudhari Information in Marathi

बहिणाबाई चौधरी किंवा बहिणाबाई नथुजी चौधरी या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी कवयित्री होत्या.

परिचय

बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे गावात एका महाजन कुटुंबात झाला. तिच्या आईचे नाव भीमाई आणि वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.

Bahinabai Chaudhari Information in Marathi

तिची कविता राज्याच्या त्या भागात बोलल्या जाणाऱ्या अहिराणी बोलीतून आहेत. शेतकरी कुटुंबातील, तिच्या बहुतेक कविता शेती, जमीन, शेतकरी, झाडे, प्राणी आणि निसर्ग यांच्या सुख-दु:खावर आधारित आहेत.

वैवाहिक जीवन

बहिणाबाई वयाच्या वयाच्या १३ व्या वर्षी तिचा विवाह जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी यांच्याशी झाला. १९१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर, विधवापणामुळे उद्भवलेल्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे तिने अतिशय कठीण जीवन जगले. तिला काशी नावाची मुलगी आणि मधुसूदन आणि सोपानदेव हे दोन मुलगे होते.

आपल्या वयाच्या ३० व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना काहीच लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या खूप कविता कोणीच लिहून ठेवल्या नव्हत्या. त्यांच्या काही कविता या त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी आणि काही कविता त्यांच्या मावसभावाने लिहून ठेवल्या होत्या. जरी त्या अशिक्षित असल्या तरी त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. आपले रोजचे शेतकाम आणि घरकाम करताना त्या ओव्या व कविता गात असत.

सोपानदेव चौधरी यांना जमेल तेव्हा त्या सर्व कविता लिहून ठेवल्या. बहिणाबाईंनी ज्या सर्व वस्तूंवर काम करताना कविता केल्या आहेत त्यातील काही वस्तू या आजही त्यांच्या घरी जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराला संग्रहालयाचे रूप देण्यात आले आहे.

बहिणाबाईंचा कविता संग्रह

बहिणाबाईंचे पुत्र सोपानदेव चौधरी हे एकदा आपल्या आईच्या मृत्त्यूनंतर काहीतरी शोधात असताना त्यांना आपण लिहून ठेवलेल्या आईच्या सर्व कविता सापडल्या. त्या सर्व कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखविल्या. आचार्य अत्रे यांनी या कवितांना सोने म्हंटले आणि त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.

अत्रे यांच्या पुढाकाराने बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये पहिली आवृत्ती आणि दुसरी आवृत्ती १९६९ मध्ये प्रकाशित झाली. यामुळे या महान कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत.

बहिणाबाईंच्या कवितांचे विषय

बहिणाबाईंच्या कविता या खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत लिहल्या गेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय हे प्रामुख्याने माहेर, संसार, शेतीची कामे, शेतीची साधने, कापणी, मळणी इ., मोठमोठे सण जसे कि दिवाळी, दसरा, पोळा, असे आहेत.

बहिणाबाईंच्या काव्य रचनेची वैशिष्ट्ये

बहिणाबाईंनी आपल्या लेवा गणबोली म्हणजेच खानदेशी भाषेतून आपल्या सर्व कविता गायल्या. खानदेशातील असोदे हे त्यांचे गाव. त्या गावचा परिसर, तिथे बोलली जाणारी भाषा त्यांच्या कवितेतुन जिवंत होते.

त्यांनी गायलेल्या काही प्रसिद्ध कविता

त्याच्या सर्वच कविता या जिवंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करीत असत.

राजा शेतकरी, चाललारे आळवाणी,
बघा तयाच्या पायाखाले, काते गेले वाकिसानी

आला सास, गेला सास, जीव तुझा रे तंत्र
आरे जगना-मरणा एक सासाचा अंतर

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताले चटके, तव्हा मीयते भाकर’

मानवी जीवनाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी बहिणाबाईंच्या या कविता खूप मोलाच्या आहेत.

बहिणाबाईंचा मृत्यू

बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.

बहिणाबाईंचा सन्मान

बहिणाबाई चौधरींच्या नावारूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे.

निष्कर्ष

मुख्यतः आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यामुळेच बहिणाबाईंची ही अनमोल कविता जगाला वाचता आली. बहिणाबाई पूर्णपणे निरक्षर असल्या तरी त्या एक कुशल कवयित्री होत्या. लेवा गणबोली भाषेतील त्यांच्या कविता तिच्या सभोवतालच्या निसर्ग आणि मानवी जीवनाबद्दलचे तिचे सूक्ष्म निरीक्षण प्रतिबिंबित करतात.

तर हा होता बहिणाबाई चौधरी मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास बहिणाबाई चौधरी हा निबंध माहिती लेख (Bahinabai Chaudhari information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment