आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चंदन वंदन किल्ला मराठी माहिती निबंध (Chandan Vandan fort information in Marathi). चंदन वंदन किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी चंदन वंदन किल्ला मराठी माहिती निबंध (Chandan Vandan fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
चंदन वंदन किल्ला माहिती मराठी, Chandan Vandan Fort Information in Marathi
सातारा आणि महाबळेश्वरच्या सीमेवर चंदन वंदन हे दुहेरी किल्ले साधारणपणे ३८०० फूट उंचीवर आहेत. हे किल्ले साताऱ्याकडे जाणाऱ्या वाटांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने बांधले गेले.
परिचय
चंदन वंदन हे किल्ले सातारा जिल्ह्यात आहेत. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य कड्यावरून एका डोंगरावर वसलेला आहे. या किल्ल्याना ट्रेकर्स आणि यात्रेकरू वारंवार भेट देतात. पायथ्याशी असलेली गावे ऊस व इतर शेतीने समृद्ध आहेत. चंदन आणि वंदन हे लगतचे किल्ले आहेत. दोन्ही गडाचा ट्रेक एका दिवसात सहज पूर्ण करता येतो.
चंदन वंदन किल्ल्यांचा इतिहास
हस्तलिखितांच्या पुराव्यानुसार चंदन आणि वंदन किल्ले शिलाहार वंशाचा राजा भोज-द्वितीय याने ११९१-११९२ मध्ये बांधले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७३ मध्ये हे किल्ले विजापूर आदिलशाही कडून जिंकून घेतले.
अफझलखानाच्या वधानंतर महाराजांनी साताऱ्याचा किल्ला जिंकून हे किल्ले सुद्धा जिंकले होते. या गडांची आधी नावे शूरगड आणि संग्रामगड होती ती त्यांनी बदलून चंदन वंदन अशी ठेवली.
१६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत काबीज केल्यांनतर सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांच्या सोबतीला चंदन-वंदन हे २ किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले.
पुढे संभाजी राजांच्या कार्यकाळात १६८५ मध्ये अमानुल्लाखानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. पुढे १६८९ सालापर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता.
किल्ल्यावर काय पाहू शकता
दोन्ही किल्ले हे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. मुख्य प्रवेशद्वार सुस्थितीत आहे, गडावर दर्गा, पाण्याचे टाके आणि बुरुज आहे. गडावरची वाट झाडीझुडपातून जाते. गडाच्या दक्षिणेला दगडात बांधलेला दर्गा आहे. तीन खोल्या असलेला सरकारवाडा नावाची रचना आहे. दर्ग्याच्या गेटवर अरबी भाषेत एक शिलालेख लिहिलेला आहे.
चंदनगडावर पाहण्याची ठिकाणे
- महादेव मंदिर
- दगडी मिनार
- दगडी चौथरा
- शिवलिंग असलेली समाधी
वंदनगडावर पाहण्याची ठिकाणे
- खंदक
- पाच तलाव
- महादेव मंदिर
- काळूबाई मंदिर
- राजवाडा
- बालेकिल्ला
चंदन वंदन किल्ल्यावर कसे पोहचाल
या किल्ल्याजवळ सर्वात जवळचे शहर भुईंज आहे जे NH-४ वर पुण्यापासून ८७ किमी अंतरावर आहे . किल्ल्याजवळ चांगली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स नाहीत.
गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट दुधनवाडी गावातून सुरू होते जी सर्वात सोपी आहे आणि दुसरी बेलमाचीपासून. दुधनवाडीला जाण्यासाठी भुईंजपासूनचा रस्ता किल्ल्याच्या टेकडीभोवती वळसा घालून जातो.
तुमची वाहने तुम्हाला गावात ठेवावी लागतात आणि पुढे १ तासाचा ट्रेक करून चंदन किल्ल्यावर जातो. मुख्य मार्गापासून दुभंगलेली अरुंद वाट वंदन किल्ल्याकडे जाते. किल्ल्यावर पिण्यायोग्य पाण्याचे साठे नाहीत.
निष्कर्ष
सह्याद्री पर्वताची एक डोंगररांग म्हणून महादेव डोंगर ओळखली ओळखली जाते. याच डोंगररांगेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. या किल्ल्यांमुळे या भागातील नद्या कृष्णा आणि वसना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये पडतो.
तर हा होता चंदन वंदन किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास चंदन वंदन किल्ला हा निबंध माहिती लेख (Chandan Vandan fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.