हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट, Hushar Kolhaa Ani Murkh Kavla Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट (hushar Kolha ani murkh kavla story in Marathi). हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट (hushar Kolha ani murkh kavla story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट, Hushar Kolhaa Ani Murkh Kavla Story in Marathi

एका शेतात एक शेतकरी दुपारच्या वेळी शेताच्या झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि लहान मुलगा सुद्धा जेवण करत असतो. तिथेच एका झाडावर एक कावळा बसलेला असतो. त्याला सुद्धा खूप भूक लागलेली असते.

Hushar Kolhaa Ani Murkh Kavla Story in Marathi

तो कावळा नजरचुकीने मुलगा जेवत असताना त्याच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. कावळा भाकरीचा मोठा तुकडा तोंडात घेऊन उंच उडून जातो. तुकडा तोंडात ठेवत तो एका उंच झाडावर जाऊन बसतो. तिथेच इज कोल्हा सुद्धा बसलेला असतो. त्याला सुद्धा खूप भूक लागलेली असते.

कावळ्याला पाहून तो कोल्हा त्या झाडाखाली जातो आणि आणि आपल्याला कावळ्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा मिळावा म्हणून नवीन युक्ती लढवू लागला. तो कावळ्याच्या सौंदर्याची खोटी प्रशंसा करू लागला. कोल्हा कावळ्याला म्हणाला अरे माझ्या मित्रा मी तुला खरेच सांगत आहे मी या संपूर्ण जंगलात तुझ्यासारखा देखणा पक्षी आजपर्यंत कधीच पहिला नाही. तुझी पिसे किती सुंदर आहेत, तुझे अंग किती तेजस्वी वाटत आहे, तुला बघून तुझ्या समोर मोर सुद्धा मला फिका वाटत आहे. जर तुझे एवढे शरीर सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल?

एवढे बोलून कोल्हा कावळ्याला म्हणाला एक काम कर ना माझ्या मित्रा, माझ्यासाठी एकदा गाणे गाऊन दाखव ना. जर तुझा आवाज खरोखरच खूप गोड असेल, तर तुझी बरोबरी कोणीच करू शकत नाही. जर तुझा आवाज गोड असेल तर मी संपूर्ण जगाला ओरडून सांगेन कि तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही.

आपली ही स्तुती ऐकून आपण कोण आहे हे कावळा विसरला आणि कोल्ह्याच्या बोलण्याला फसला. तो सुद्धा मनात विचार करू लागला कि जर कोल्हा एवढे बोलतोय तर मी असेल खूप सुंदर. आजपर्यंत मीच स्वतःला नीट ओळखले नसावे. त्याने आपण गाऊन दाखवूया असा विचार केला.

गाण्यासाठी तोंड उघडताच कावळ्याने आपल्या तोंडात धरून ठेवलेला भाकरीचा तुकडा खाली पडला. भाकरीचा तुकडा खाली पडताच कोल्हा धावत गेला आणि तो तुकडा खाल्ला. तो कावळ्याला म्हणाला, अरे मूर्ख तुला स्वतःला माहित नाही का तू किती सुंदर आहेस ते? आता कावळ्याला पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरले नव्हते.

तात्पर्य – आपल्या खोटया स्तुतीला फासून जर आपण लबाड लोकांच्या नादी लागलो तर आपली फसवणूकच होणार.

तर हि होती हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट (hushar Kolha ani murkh kavla story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Related Posts

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍

Leave a Comment

error: Content is protected.