जसप्रीत बुमराह माहिती मराठी, Jasprit Bumrah Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Jasprit Bumrah information in Marathi). जसप्रीत बुमराह यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी जसप्रीत बुमराह यांच्यावर मराठीत माहिती (Jasprit Bumrah biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

जसप्रीत बुमराह माहिती मराठी, Jasprit Bumrah Information in Marathi

जसप्रीत जसबीरसिंह बुमराह हा एक नावाजलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. जसप्रीत बुमराह सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून खेळतो. जसप्रीत बुमराह उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे.

[table id=8 /]

परिचय

जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित केल्यांनतर त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. आपला साथीदार मोहम्मद शामी हा जखमी असल्यामुळे जसप्रीत बुमराहला संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले होते.

Jasprit Bumrah Information in Marathi

जसप्रीत बुमराहने एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांसाठी २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी डावात ५ बळी मिळवणारा जसप्रीत बुमराह हा पहिला आशियाई गोलंदाज झाला होता.  जसप्रीत बुमराह हा आपल्या क्रिकेटच्या पदार्पण वर्षातील झालेल्या कसोटी सामन्यांत ४८ बळी घेत तो तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.

वैयक्तिक जीवन

जसप्रीत बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ ला अहमदाबाद, गुजरात येथे झाला. तो ५ वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्या वडिलांच्या निधनांनंतर आई दलजित बुमराह त्याने वाढवले.

१५ मार्च २०२१ रोजी त्यांनी आपली प्रेयसी संजना गणेशनशी गोव्यात लग्न केले. संजना हि एक मॉडेल आणि स्टार स्पोर्ट्स प्रस्तुतकर्ता आहे. ती पुणे येथे राहणारी आहे. संजना गणेशन हि माजी मिस इंडिया फायनलिस्ट आहे. तिने २०१४ च्या एमटीव्हीच्या स्प्लिट्सविलामध्ये देखील भाग घेतला होता.

डोमेस्टिक क्रिकेट

जसप्रीत बुमराह हा गुजरात संघाकडून प्रथम श्रेणी डोमेस्टिक क्रिकेट खेळतो. त्याने ऑक्टोबर २०१३-१४ मध्ये विदर्भ संघाविरुद्ध खेळताना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्या सामन्यात तब्बल ७ गडी बाद केले होते आणि आपल्या संघाकडून सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

जसप्रीत बुमराह हा आपल्या अचूक गोलंदाजीमूळे गुजरातच्या संघाचा एक अविभाज्य भाग बनला. बुमराहने २०१२-१३ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध खेळताना टी -२० सामन्यात पदार्पण केले. अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या स्पेलमध्ये फक्त १४ धावा देत ३ गडी बाद केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

जसप्रीत बुमराहने २६ जानेवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना टी २० सामन्यात पदार्पण केले. २०१६ च्या एका कॅलेंडर वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २८ बळी मिळवण्याचा विक्रम त्याने केला.

जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या इंग्लंडच्या भारत दौर्‍यावर झालेल्या टी-२० मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात बुमराहने अचूक गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने आपल्या ४ ओव्हरमध्ये फक्त २० धावा देत दोन विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकात जेव्हा इंग्लंडला जिंकण्यासाठी ७ धावांची आवश्यकता असताना त्याने फक्त २ धावा देत २ गडी बाद केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याला त्याच्या या कामगिरीबद्दल सामनावीर चा पुरस्कार देण्यात आला.

२०१७ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना बुमराह हा पाच किंवा त्यापेक्षा कमी सामन्याच्या मालीकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने या दौऱ्यात तब्ब्ल १५ बळी मिळवले होते.

नोव्हेंबर २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले. पण तो एकही सामना खेळला नाही. जानेवारी २०१८ मध्ये न्यूझीलंड येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने कसोटी सामन्यात पदार्पण केले. जसप्रीत बुमराहने एबी डिव्हिलियर्सला ६५ धावांवर बाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला गडी बाद केला. तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ५४ धावा देत पाच बळी मिळवले.

बुमराहने दुसऱ्यांदा पाच बळी घेण्याची कामगिरी २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना केली. त्याने ८५ धावा देत इंग्लंड संघाचे ५ फलंदाज बाद केले आणि हा सामना भारताने २०३ धावांनी जिंकला.

२०१८ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉक्सिंग डे कसोटीमध्ये बुमराहने त्याच्या तिसऱ्या वेळी ५ बळी घेण्याची किमया केली. त्याने ३३ धावा देत ६ गडी बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला १५१ धावात गुंडाळले. त्याचा वर्षी तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या सर्व संघाविरुद्ध पाच विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज देखील ठरला. बॉक्सिंग डे कसोटी मालिकेत त्याने तब्बल २१ बळी घेऊन सर्वाधिक विकेट्स घेतले. त्याने त्याचा वर्षी सर्वाधिक ४८ बळी घेत पदार्पण केलेल्या एका वर्षात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला होता.

२०१८ मध्ये त्याने केलेल्या बहारदार कामगिरीच्या जोरावर त्याला आयसीसीने वर्ल्ड टेस्ट इलेव्हन आणि वनडे इलेव्हन या दोन्ही संघात स्थान दिले. ईएसपीएन क्रिकइन्फोने त्याला कसोटी इलेव्हन संघात स्थान दिले तर क्रिकबझने एकदिवसीय इलेव्हनच्या संघात स्थान दिले.

एप्रिल २०१९  मध्ये त्याची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्या वर्षीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पाच प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये त्याची निवड केली होती.

५ जून २०१९ रोजी, तो दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चालू असलेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात आपला ५० वा एकदिवसीय सामना खेळला. ५ जुलै २०१९ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना आपला १०० वा बळी घेतला. तो मोहम्मद शामीनंतर जलदगतीने १०० बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे.

बुमराहने आपल्या अचूक गोलंदाजीतून आणि योग्य ठिकाणी यॉर्कर्स टाकून अंतिम ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताचा कोणताही कर्णधार अंतिम ओव्हर्समध्ये बुमराहलाच प्राधान्य देतो. बुमराह सरासरी १४२ किमी / ताशी गती वेगाने गोलंदाजी करतो.

आयपीएल करिअर

कोच जॉन राईटने बुमराहची गोलंदाजी बघून २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात निवड केली. जसप्रीत बुमराहने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आपल्या पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि इतर २ फलंदाजांना तंबूत परत पाठवले.

जसप्रीत बुमराह आयपीएल २०१३ मध्ये फक्त दोनच सामने खेळला. २०१४ मध्ये सुद्धा तो जास्त सामने खेळू शकला नाही. त्याने एकूण १६ सामन्यांत आठ गडी बाद केले. बुमराह हा २०१७ च्या आयपीएल सिजनमध्ये चमकला. त्याने १६ सामन्यात एकूण २० गडी बाद केले.

पुढच्या दोन हंगामांत बुमराहने आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर २०१९ मध्ये १९ विकेट्स घेत मुंबई इंडियन्सला आपल्या चौथ्या विजेतेपदांपर्यंत पोचवले.

केलेले रेकॉर्डस्

  • बुमराहने ५८ सामन्यांमध्ये १०४ एकदिवसीय विकेट घेतल्या आहेत.
  • सर्वात वेगवान १०० एकदिवसीय विकेट्स घेणारा तो शामीनंतर दुसरा गोलंदाज आहे.
  • बुमराहने आपल्या कारकीर्दीत ४ वेळा पाच गडी बाद केले आहेत.
  • त्याने १२ कसोटी सामन्यांमध्ये ६२ बळी घेतले आहेत
  • बुमराह हा कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे.
  • एकाच वर्षात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकाच कसोटी सामन्यात ५ बळी मिळविणारा तो पहिला आशियाई गोलंदाज आहे.
  • आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील आपल्या पदार्पण वर्षात भारतासाठी त्याने सर्वाधिक ४८ विकेट्स घेतल्या आहेत

मिळालेले पुरस्कार

  • २०१७, २०१८ मध्ये  आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर
  • २०१८ मध्ये आयसीसी कसोटी टीम ऑफ द इयर
  • २०११-२० या दशकाचा आयसीसी पुरुष टी -20 संघ मध्ये निवड

तर हा होता जसप्रीत बुमराह यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास जसप्रीत बुमराह यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Jasprit Bumrah information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment